Skip to main content

मांडणी

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ४

लेखक शेखरमोघे यांनी शुक्रवार, 12/04/2019 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे) भाग १: http://www.misalpav.com/node/44368 भाग २ : http://www.misalpav.com/node/44372 भाग ३: http://www.misalpav.com/node/44375 दिल्ली शहरांत घुसण्याकरता शहराचे दरवाजे किंवा तट उध्वस्त होऊन शहरांत घुसता येण्याइतके खिंडार पडल्यावर लगेचच पुरेसे सैनिकदेखील त्या खिंडारांतून घुसण्याकरता तयार असायला हवे होते.

आकाशाची मोतीमाळ – स्वाती व सप्तर्षी नक्षत्रे

लेखक हेमंत ववले यांनी गुरुवार, 11/04/2019 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
भर्तृहरी एक राजा व महाकवि देखील होता. त्याच्या उत्तरकाळात त्याने तीन मुख्य काव्यरचना केल्या. त्यापुढे शतकत्रयी नावाने प्रसिध्दीस पावल्या. यातीलल एक आहे नीतिशतकम. या मध्ये एक रचना येते ती अशी सागरशुक्तिसंपुटगतं सन्मौक्तिकं जायते ! याचा अर्थ असा की स्वाति नक्षत्रामध्ये होणा-या पावसाचे थेंब जर शिंपल्यांमध्ये गेले तर त्याचे मोती होतात. भर्तृहरीचा काळ ठरविण्यात अजुनही अभ्यासकांची एकवाक्यता नाहीये. पण १५०० ते २००० वर्षापुर्वीचा त्याचा काळ असावा असा अंदाज आहे.

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग ३

लेखक शेखरमोघे यांनी गुरुवार, 11/04/2019 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
(या आधी भाग १ लिहितांना मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे) भाग १: http://www.misalpav.com/node/44368 भाग २ : http://www.misalpav.com/node/44372 दिल्लीत अशी वाढती बेबंदशाही पसरत असतांना सैनिकांचा सगळ्यात मोठा जथा बरेलीहून दिल्लीत पोहोचला.

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दयार में ,,,,,,,, भाग २

लेखक शेखरमोघे यांनी बुधवार, 10/04/2019 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
(या आधी मालिकेचे शीर्षक टंकतांना नजरचुकीने "दयार" लिहिण्याऐवजी "दरार" लिहिले गेले होते. ती चूक आता सुधारली आहे) भाग १: http://www.misalpav.com/node/44368#comment-1030023 १८५७ सालाच्या काही काळ आधी दिल्लीच्या भवितव्याबद्दलच्या इंग्रजांच्या काही हालचाली पडद्यामागे सुरू होत्या. कांही वर्षांपासूनच मुघल बादशाहीचा भारतावरचा जो काही पगडा शिल्लक राहिला होता तो देखील कसा कमी होईल किंवा काढूनच टाकता येईल आणि "बहादूरशहानंतर काय" हा विचार इंग्रजांच्या डोक्यांत सुरू झाला होता.

लगता नहीं हैं जी मेरा, उजडे हुए दरार में ,,,,,,,, भाग १

लेखक शेखरमोघे यांनी मंगळवार, 09/04/2019 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
१८५७ साली हिंदुस्थानांत इंग्रजांच्या विरुद्ध घडलेल्या घटनांना नक्की काय नांव द्यावे याबद्दलची मतें त्यानंतर १०० वर्षे तरी पक्की होऊ शकली नव्हती. हिंदुस्थानचे त्याकाळातले सर्वेसर्वा "कंपनी सरकार" किंवा "कंपनी बहादूर" आणि नंतरचे "राजे" असलेल्या इंग्रजाना ते अर्थातच हिंदुस्थान शिपायांचे बंड वाटत राहिले. जरी त्यानंतर बऱ्याच स्वातंत्र्यवीरांना ते वर्ष "स्वातंत्र्यसमराची सुरवात" असे वाटले तरी बराच काळ स्वतंत्र भारतांतील शासकीय अभ्यासक्रमांच्या पुस्तकांत १९४७ नंतर सुद्धा - इंग्रजांनी घालून दिलेल्या आराखड्याना अनुसरून- १८५७ मध्ये भारतांत घडलेल्या घटनांचा उल्लेख अंमळ संदिग्ध आणि संक्षिप्तच राहिला.

(दाराआडचा कुत्रा)

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 04/04/2019 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
Amachee preraNA एक कुत्रा दाराआडुन बघतो आहे बाहेर किती बाहेर? स्वतःच्या बाहेर , कुंपणाच्या पार तिथे एक मांजर बसली आहे स्तब्ध, करत असेल ती कसला विचार? सकाळी चोरुन प्यायलेल्या दुधाचा, पाठीत बसलेल्या रट्ट्याचा, की रात्री भेटलेल्या बोक्याचा? साखळी बांधलेला कुत्रा बाहेर येउ शकत नाही मग तो अस्वस्थपणे भुंकुन त्याचे अस्तित्व बाहेर कळवतो ते ऐकुनही मांजर शांतपणे बसुन राहते, डोळे मिटुन बसुनच राहते
काव्यरस

ते दोघे

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 16/02/2019 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीने रेखीव झालेल्या त्या प्रचंड वृक्षातळी ते दोघे होते मघामघाशी तर! मी पाहीले त्यांना बराच वेळ खाली मान घालून एकमेकांमध्ये साखरेइतके अंतर ठेवून चालताना, कुठेही न थांबता त्यांना एकमेकांकडे बघताना, अन् तेव्हा रस्ता हसताना... मी पाहिले त्या दोघांना , हात हातात घेताना 'बाहों के बाहर नजरों से ओझल होना ही लकिरों पे लिखा है तो वो लकिरे ही मिटा देते हैं' त्याने एवढेच म्हणलेले मला ऐकायला आले नंतर मला ते दिसले नाहीत... पानगळीने रेखीव झालेल्या प्रचंड वृक्षामागे मला नंतर कुणीच दिसले नाही... -शिवकन्या

हारासाठी काही पण ........... ( शशक २)

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 07/02/2019 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
ती : दोघांसाठी वर्षाला तीन लाख , म्हणजे जर अतीच होतंय . तो : हो ग , पण सुविधा एकदम मस्त आहेत . जरा बरे वाटेल नि आपल्यालाही काळजी नसेल . ती : मी मागे हार मोडून दुसरा बनवते बोलले तर तुम्ही केव्हढं बोलला होता . तो : तुला योग्य वाटतं ते कर. एक मात्र नक्की पैसे दिल्यावाचून आपली यातून सुटका नाही . अगं वेडे चोवीस तास सुरक्षा आहे तिथे. आपलं काय , दोघेही कामावर आणि मुलं शाळेत . कोण आहे इथे ? ती : परवा कळेल तुम्हाला. ठळक बातम्या : क्रूरकर्मा सासूसासऱ्याना पोस्कोअंतर्गत अटक . न्यायालयीन चौकशी सुरु आहे . सिद्धेश्वर विलास पाटणकर

हा कुणाचा फोटो आहे ? ( स्पर्धेबाहेरची शशक १ )

लेखक खिलजि यांनी सोमवार, 04/02/2019 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
" अजून चहा दिला नाही हिने . हिचं ना कालपासून मी बघतोय लक्षच नाही आहे. वृषा, ए वृषे , काय झालंय तरी काय हिला. बहिरी झाली आहे का ? का, माझ्याच घरात मलाच किंमत उरली नाही आहे ? " मी स्वतःशी म्हणालो. वृषा : " सोनू , पिल्लू , उठा चला , दोन घास खाऊन घ्या . कालपासून पोटात अन्नाचा कण नाही आहे. आपल्याला लवकर पोहोचायचं आहे तिथे " काहीच समजत नाही आहे मला . अरे काय चाललंय काय ? चहाचा पत्ता नाही आणि हि इथे फोटो कुरवाळत बसलीय. अरे हे काय ,हि तर माझा फोटो बघून रडतेय. सिद्धेश्वर विलास पाटणकर

तुझी कविता

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 18/01/2019 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यापाशी जन्मलेली माझी हट्टी, खोडकर, अल्लड कविता तू डोळ्यांत सांभाळून घेऊन ये.... येता येता वाट चुकली तर मला जागं कर...पण मी माझ्याच तंद्रीत असेन तर माझ्या कवितेला वाट विचार.... ती आधी मस्करी करेल, तुला चकवा घालेल, घनघोर गप्पा मारेल, निळावंती होऊन, वाटेवरले झाडमाड प्राणीपक्षी दाखवेल, लपूछपू म्हणत पाठीत गुद्दे घालेल, मिठीत शिरता शिरता एकदम वारा होऊन तुझ्या गळ्यात पडेल, शेवटी थकून तुझ्या दुमडलेल्या हातावर निर्धास्त झोपी जाईल, तेव्हा तू तिला परत डोळ्यांत साठव.... अशी थकून झोपलेली, झोपेतही तुझ्याच डोळ्यांत राहणारी माझी कविता सांभाळून घेऊन ये.... मी असेनच कवितेच्या आसपास. -शिवकन्या