हारासाठी काही पण ........... ( शशक २)
लेखनप्रकार
ती : दोघांसाठी वर्षाला तीन लाख , म्हणजे जर अतीच होतंय .
तो : हो ग , पण सुविधा एकदम मस्त आहेत . जरा बरे वाटेल नि आपल्यालाही काळजी नसेल .
ती : मी मागे हार मोडून दुसरा बनवते बोलले तर तुम्ही केव्हढं बोलला होता .
तो : तुला योग्य वाटतं ते कर. एक मात्र नक्की पैसे दिल्यावाचून आपली यातून सुटका नाही . अगं वेडे
चोवीस तास सुरक्षा आहे तिथे. आपलं काय , दोघेही कामावर आणि मुलं शाळेत . कोण आहे इथे ?
ती : परवा कळेल तुम्हाला.
ठळक बातम्या : क्रूरकर्मा सासूसासऱ्याना पोस्कोअंतर्गत अटक . न्यायालयीन चौकशी सुरु आहे .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
वाचने
5115
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
काय बी कल्ला नाय
काहीच कळालं नाही नेमकं काय सांगायचंय ते.
वृद्धाश्रमा ऐवजी जेल ?
+१
"पोक्सो कायदा(इंग्लिश:POCSO ACT) म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ हा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने २०१२ साली तयार केलेला कायदा आहे. पोक्सो हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्च्युअल ओफेन्सेसचे लघुरूप आहे.(विकिपीडिया)"
या कायद्याखाली सासूसासर्यांना अटक करवून वृद्धाश्रमासाठी द्यावे लागणारे तीन लाख वाचवले. *हारासाठी काहीपण* असा अर्थ असावा. धक्कातंत्र जमलं आहे.
बरोब्बर ओळखलंत रांचो साहेब आणि पलाश साहेब .. धन्यवाद सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे
धक्कातंत्र जमलंय.
स्पर्धेसाठी हीच पाठवायला हवी होती.
धक्कातंत्र फसल्यासारखं वाटलं, पहिल्या वाचनामध्ये पटकन समजत नाही.
शशक साठी कायपण
पैजारबुवा,
मस्त रे मित्रा.
मस्त
धन्यवाद सर्व प्रतिसाद्क आणि वाचक मंडळींचे. मजा येतेय , मस्त शशक मौसम चालू आहे. सर्वानी निदान स्पर्धेत नाही तर इथे या गंगेत तरी न्हाऊन घ्यावं .
केवळ एका हाराकरता??
काय बी कल्ला नाय