हा कुणाचा फोटो आहे ? ( स्पर्धेबाहेरची शशक १ )
लेखनप्रकार
" अजून चहा दिला नाही हिने . हिचं ना कालपासून मी बघतोय लक्षच नाही आहे. वृषा, ए वृषे , काय झालंय तरी काय हिला. बहिरी झाली आहे का ? का, माझ्याच घरात मलाच किंमत उरली नाही आहे ? " मी स्वतःशी म्हणालो.
वृषा : " सोनू , पिल्लू , उठा चला , दोन घास खाऊन घ्या . कालपासून पोटात अन्नाचा कण नाही आहे. आपल्याला लवकर पोहोचायचं आहे तिथे "
काहीच समजत नाही आहे मला . अरे काय चाललंय काय ? चहाचा पत्ता नाही आणि हि इथे फोटो कुरवाळत बसलीय. अरे हे काय ,हि तर माझा फोटो बघून रडतेय.
सिद्धेश्वर विलास पाटणकर
वाचने
4555
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
सुंदर आहे ! शेवटच्या वाक्यात धक्का देण्याचा शशकचा मूलभूत गूण मस्तं पकडलाय.
धक्कातंत्र जबरी !!!
आवडली
शशक आवडली.
---
शंभरला फक्त दोन शब्द कमी पडल्याने स्पर्धेबाहेर झालेय बहुतेक ही कथा.
काही कळला नाही बॉ. कुणी उलगडून सांगेल का?
सर्व प्रतिसादकांचे खूप खूप आभार. मला वाटलं होत कि जमतंय कि नाही , म्हणून घाबरत घाबरतच टंकली होती . पण ठीक आहे , चांगले आणि नावाजलेल्या लोकांकडून अभिप्राय आले कि समजायचं , काहीतरी चांगलं टंकल गेलंय. धन्यवाद ..
@ प्रसाद_१९८२
नाही ओ, मला नाही वाटत दोन शब्द कमी पडले म्हणून . आणि तशी पण हि स्पर्धेसाठी नव्हतीच . मला हा लेखन विभाग आवडला म्हणून , म्हंटल या शशक गंगेत थोडे हात धुवून घ्यावेत ..
@ वकील साहेब
चहा मागणारा कालच वर गेलाय (मरण पावलाय ) .
आवडली
पैजारबुवा,
खिलजीभाऊ
धन्यवाद पै बु काका आणि श्वेता तै
धन्यवाद पै बु काका आणि श्वेता तै
सोनू, पिल्लूने गोंधळ होतोय.
सुंदर आहे ! शेवटच्या वाक्यात