Skip to main content

मांडणी

नं पाठवलेलं पत्रं

लेखक Pradeep Phule यांनी रविवार, 09/09/2018 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
प्लीज, इकडे बघ ना..! मला तुझ्या हातांकडून वचन हवय, कि तू हे पत्रं फाडणार नाहीस. या पत्रातुन जणू मीच तुझ्याशी बोलत आहे. प्रत्यक्ष बोलायचं तर खूप आहे, पण त्यासाठी हवा एकांत, आणि तोहि मिळणे कठीण, म्हणून हा सारा खटाटोप. लिहायचं खूप आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा लिहायला बसतो, आणि मग शब्द ययाती मधल्या अल्के सारखे गट्टी फू करून बसतात. आणि मी सगळं काही विसरून जातो. मी तुला या शुल्लक पानासोबत एक छानस कार्ड ही देऊ शकलो असतो, पण असं केल्यामुळे मी तुला आणखी एकदा विनवणी करत आहे कि काय, असा तुझा गैरसमज झाला असता, आणि तू हे पत्र फाडून टाकल असतं.

यात्रा

लेखक शाली यांनी गुरुवार, 06/09/2018 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा सगळा पट्टा तसा सधन. पावसावर होणारी शेती अगदीच नावाला किंवा मग गरजेपुरती. म्हणजे बाजरी, ज्वारी यासाठी. आमच्या वरच्या भागात मात्र पावसाचे प्रमाण जास्त. त्यामुळे तेथे मात्र भातशेतीच प्रमुख. हा भाग म्हणजे माळशेज घाटाचा परिसर. साधारण घाटाच्या अलीकडील, म्हणजे कोळेवाडी, मढ, करंजाळे वगैरे. पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरच्या कुशीत वसलेली गावे. भात खावा तर याच भागातला. आजी सांगायची “भाताच्या पेजेत वात वळून लावली तर दिवा पेटायचा आणि भात शिजलेला साऱ्या गावाला कळायचे असा सुवास पसरायचा.” अर्थात पिढ्या दर पिढ्या सगळ्याच गोष्टींचा दर्जा घसरत गेला.

फ्रायडे नाईट

लेखक लौंगी मिरची यांनी गुरुवार, 06/09/2018 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार आला कि अगदि सकाळपासुनच ह्याची तयारी चालु असते . सगळ्यात पहिली स्टेप माझी मानसिक तयारी करणे , जी लवकर होत नै . मी फारच आढेवेढे घेते , तो तेवढावेळ माझ्या मागेपूढे गोंडा घोळत असतो . सकाळपासुनच “ आज जरा रीलॅक्स व्हायचय , खुप काम केलं आठवडाभर “ . मी गप्प . परत एक दिड तासांनी ,“ थोडेसे हात पाय दाबुन देतेस का , नैतं तो पेन रीलिफ स्प्रे मारुन दे पाठीवर “ . मी गप्प . मग अजुन थोडा वेळ वाट बघुन ,“ आज रात्री तु मस्त चिकनचा रस्सा बनव , अगदि सेम तुझ्या आई सारखा “ ह्यावर मी फक्त “ ह्म्म “ एवढं बोलते . आजकाल त्याने जास्त युक्त्या काढल्यात .

बदमाश अँथनी स्मिथ भाग २

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 04/09/2018 03:23 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराजांच्या सुरतच्या लुटीच्या कारवाईची मोहीम पाद्री रेव्हरंड एल इस्कालियट एका पत्रात म्हणतो, 'अँथनी स्मिथ सुटून आल्यावर सांगत असे कि काय आणि किती लूट केली होती शिवाने. तो म्हणाला, मी पाहिलं ना, अश्शा थप्प्या लागल्या होत्या पैशांच्या राशींच्या! २० - २५ (हंड्रेड थाउजंड) लाख तरी रोकड लुटले रोकड! शिवाय ३०० हमालांकरवी मोठ्या पिशव्यात, पोत्यात हिरे, मोती, माणके, असे जड जवाहिरे गच्च भरायच्या कामाला लागले होते त्यांचे सैनिक. विरजी व्होरा, जो त्या वेळी जगातला सर्वात श्रीमंत व्यापारी होता त्या एकट्या कडून ८० लाखाचा माल जप्त केला होता.

सुरतच्या वखारीतील बदमाश अँथनी स्मिथ भाग १

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 03/09/2018 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
'त्या अँथनी स्मिथपेक्षा जगात इतका नास्तिक नालायक इसम जगायच्या लायकीचा नसावा' हे वाक्य आहे सुरतच्या कौन्सिल ने इस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या ३१ मार्च १६६५ च्या पत्रातील आहे! गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या Shivaji : His Life and Times या इंग्रजी ग्रंथातून सुरतच्या वखारीतील मुख्य कार्यालयातील हकिकती वाचताना आणखी एका गणंगाची रंजक माहिती हाती आली. ती सादर... त्यामधून शिवाजी महाराजांच्या सूरत लुटीच्या कारवाईची माहिती समजून घ्यायला सोपे जाते. शिवाय त्या निमित्ताने दोन बंगाली इतिहासकारांच्या मधील मतांतरे समजतात.

उचापतखोर हेनरी रेव्हिंग्टन

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 01/09/2018 01:04 या दिवशी प्रकाशित केले.

उचापतखोर हेनरी रेव्हिंग्टन

इतिहास तज्ज्ञ गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या ‘श्री राजाशिवछत्रपती भाग 1 व 2 आणि इंग्रजीतील ग्रंथ Shivaji His life and Times’ या तीन संदर्भातून साकार एक उपद्रवी व्यक्तिमत्व...

पन्हाळ्यावरून महाराजांच्या सुटकेचा व पावनखिंडीतील लढ्याचा भाग “मिलिटरी कमांडरांच्या नजरेतून - वाटाडे” या लेखमालेतून सादर केला होता. त्यावेळी इंग्रजांनी तोफातून गोळे दागायाला सुरवात केल्यावर महाराजांना गडावरून लवकर सुटका करायला आखणी करावी लागली असावी, असे म्हटले गेले होते.

गूगल आणि मायक्रोसॉफ्ट स्पर्धेची क्षेत्रे

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 30/08/2018 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
मायक्रोसॉफ्ट आणि गूगल या सध्याच्या सॉफ्टवेअरमधल्या दोन मोठ्या कंपन्या. मायक्रोसॉफ्ट मुख्यतः डॉस नावाच्या ऑपरेटिंग सिस्टीमपासून प्रसिद्धीस यायला सुरुवात झाली.

निघताना....

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 23/08/2018 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनाशी होईन तेव्हा तू चौकट ओलांड, आणि निघताना..... आपल्या हसल्याबोलल्या आवाजांची फूले घेऊन ये आपल्यातल्या गहिवरांचे कढ, न हिंदकळता आण मी न ओलांडलेली अंतरे तू सहजच पार करुन ये माझे न उच्चारलेले नाव चारचौघांत सरळच घे सगळे उठून जातील तेव्हा आपल्यातल्या शब्दांची आरास मांड त्यानंतर आपोआप दिवा लागेल तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल मग मी मुक्त होऊन रेषा होईन तुझ्या तळहातांवर खोल रुतेन.. तू हळूहळू पण निश्चितपणे पार दिसेनासा होऊन माझ्याजवळ पोहचेपर्यंत... Shivkanya

आत्ते-मामे भावंडे

लेखक नर्मदेतला गोटा यांनी सोमवार, 30/07/2018 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
मनामधे काही शंका आहेत. 1. आत्ते मामे भावंडांमधे लग्न केल्यामुळे नेमका काय फायदा होतो ? (मामे बहीण, आत्ते भाऊ) नात्यातल्या इतर लग्नांमधे काही साईड इफेक्टस् असतात तसे इथे असतात का ! की काहीच धोके नसतात ? 2. पुरुष कितव्या वर्षापर्यंत बाप बनू शकतो आणि स्त्री कितव्या वयापर्यंत आई बनू शकते ?

थक्क करणारी कामगिरी

लेखक सोमनाथ खांदवे यांनी शनिवार, 21/07/2018 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशी भाज्यांचे पिक घेऊन शेतकऱ्याने मिळवले वार्षिक 6 कोटींचे उत्पन्न . एका अवलीयने आयटी मधील चकचकीत इमारतीत आपली भाजी विकायची असे स्वप्न पाहिले होते, तेच स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. आयटी क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्यांसह देश-विदेशात ते या वेगवेगळ्या भाज्या पोहचवतात. मूळ परदेशात पिकवल्या जाणाऱ्या या भाज्यांचे पिक घेऊन एका वेगळ्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकले आहे. या भाज्यांच्या पिकातून त्यांना थोडेथोडके नाही तर वार्षिक ६ कोटी रुपये उत्पन्न मिळते. सगळा खर्च जाऊन त्यांना १ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.