कार्यालय

Taxonomy upgrade extras
कार्यालय इथे पहायला मिळतील नमुने एकाहून एक भारी फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी कुणालाही राहिलं नाही कुंणाचंही भय काम कोणी करत नाही तरी कार्यालय - विनोद इंगळे

जराशी खिडकी उघडा राव..!

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पाऊस कधीचा साद घालतोय, जराशी खिडकी उघडा राव..! आले तर येऊ देत दोन थेंब आत तेवढाच जरा भिजायला वाव..! भिजला तर भिजू दे कोट, उद्या पुन्हा वाळेल ना..! पण आजचा असाच पाऊस उद्या पुन्हा मिळेल का ? आम्ही आपले देतोय म्हणून खाऊ नका इतका भाव..! पाऊस कधीचा साद घालतोय, थोडीशीच खिडकी उघडा राव..! तुम्हाला आपली एकच काळजी बिघडेल आपली कडक इस्त्री. पण कधी शोधून पहा ना धुक्यामधली अनोखी मिस्ट्री..! एटीकेट आणि फ़ॉर्मॅलिटीजची नकोच तुमची डराव डराव..! पाऊस कधीचा साद घालतोय, जरा तरी खिडकी उघडा राव..! एसी मध्ये बसून बसून जीव अगदी शीणला आहे. बघू आकाशाने कसा इंद्रधनू विणला आहे. खरं सौंदर्य पाहू आता स्क्

(माउस)

ओट्यावरती तुझ्या किती बघ घुटमळला माउस..! झाडू घेऊन आलो तरि ना अडखळला माउस..! मला न जमले ठोकायाला तेव्हा मिश्किल हसला, मनीपुढे पण स्वतः कसा बघ डळमळला माउस..! कधी उगाचच रुसला, आणिक माळ्यावरती दडला. रॅट किलर च्या गोळ्यांनी ना विरघळला माउस..! अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..! नव्यानव्या कवितांची लागण, विडंबनांची बाधा, कळफलकाच्या जोडीने मग सळसळला माउस..! घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी. भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..! प्रेरणा: वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा

शाळा

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
शाळा अथांग सागर यांच्या आठवणी या कवितेमुळे आम्हाला ही शाळेची आठवण झाली ------------------------------------------------------------------------- शाळे समोरुन जाताना बालपण मनात गवसत वर्गात डोकाऊन पहाताना आठवणींनी मन भरतं मागे वळुन पहाताना वाटत तिथेच आहोत आज तेच सर्व मित्र अन् तोच बसायचा बाक आठवणी असतात अभ्यासाच्या मार दिलेल्या गुरु़जींच्या मधल्या सुट्टीत गंमत भारी होती शाळा माझी न्यारी. माझ्याही आहेत अनेक आठवणी शाळे मधल्या गमतीच्या खेळामधल्या मस्तीच्या सहलीतल्या सफरीच्या ह्रदयात त्या रुजल्या आहेत कायमच्या घर करुन बसल्या आहेत

देवाची मुलाखत

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
स्वप्नात साक्षात ईश्वर दिसला म्हणला माग काय मागायचे तुला देवा एक मुलाखत द्या मला का कलीयुगात जगाला विसरला? तुम्हीच तर वचन दिले गीतेतून दुष्टांच्या विनाशा याल परतून काय मिळाले ह्या विश्वासातून? धर्म रसातळाला चालला जगातून
अजाण आहेस तू, ईश्वर हसला अरे माझे बोल आठवतात मला धर्माची ग्लानी कुठे झाली म्हणायला? पुन्हा मी धरतीवर अवतरायला
संकटात का होइना, लोक हात जोडतात धर्माच्या नावाने दान करतात चर्च, मशीदी, मंदीरात ध्यान करतात तरीही धर्म बुडतोय का म्हणतात?

(तनःशांती!)

लेखनविषय:
ॐकारशेठचा 'मनःशांती' चा शोध वाचला आणि आम्हाला पूर्वीचे अथक प्रयत्न आठवले! ;) तनःशांतीचा शोध घेत होतो रात्रंदिवस 'फिटनेस'वर शोधले, 'वेटलॉस'वर आलो जाऊन 'बुलवर्कर' धुंडाळले 'टर्बो बॅग' काढली बुकलून 'केक' पाहिले बदलून 'लो कॅलरी'ही शोधत राहिलो 'ट्रेडमिल' झाले फिरवून 'स्पिनिंग' करत फिरलो निवांत क्षणी एका लकाकले डोळे, फिटली भ्रांती 'लॅपटॉप' वर कोक-बर्गर आला सापडली तनःशांती! 'भार'नियमनाचा मला कळलेला हा एकमेव फायदा बाकी तीच झोप, तेच घोरणे आणि तोच वायदा चतुरंग

निवृत्तीनाथ केशवसुमारास...

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
निवृत्तीनाथ केशवसुमारास... विडंबने तव सर्व जुनी मी स्मरतो आहे मनापासूनी आज तुला मी लिहितो आहे हक्कच होता! तुजला टाळ्या खूप मिळाल्या `कवी' तरीपण कशामुळे घुसमटतो आहे? कसल्या प्रतिमा? कसले जाळे?

(निवृत्ती)

लेखनविषय:
चार दिवस गावाला गेलो होतो येऊन बघतो तो काय निवृत्ती? गुरुवर्य केशवसुमारांच्या ह्या'निवृत्ती'ने आमच्या भावना उचंबळून आल्या. घेतला वसा टाकणे ही तर विडंबनाशी प्रतारणाच, शिवाय गुरुवर्यांना काय वाटेल?

कैदी आणि अंकूर

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जी ए कुलकर्णी ह्यांच्या 'स्वामी' कथेतील एका प्रसंगाचे कवितेत रुपांतर. काळकोठडी मध्ये टाकला एक बंदिवान काळ्या दगडात विसरला काळाचे भान आहे ठाऊक पक्के त्याला, नशीब ह्या जन्मीचे सुटण्यासाठी सहाय्य, केवळ मिळेल मरणाचे किती खोल अन् कुणास ठाऊक, खोली तुरूंगाची तसूभरही ना दुसरे जीवन, न चाहुल कोणाची भिंतीमधली झडप उघडुनी, ताट येतसे आत तोच एक आवाज जगाचा, बाकी सारी मयत आंधाराहून कृष्ण छाया, स्वतःचीच पाहतो नीरव अश्रू विना हुंदके, अंतरीच दाबतो बाह्यजगाशी एकच नाते, नलीका हवेसाठी तिच्याच योगे जगते आहे, शरीराची काठी क्षीण कवडसा कधी उतरतो, नलीकेतून खाली मित्रची जणू येई भेटाया, दुर्गम बंदीश

आली फिरून उत्कंठा जगण्याची

लेखनविषय:
(अनुवादीत. कवी-शैलेंद्रसिंग) पदर ओढिला काट्यानी चाळ तोडिला पायानी उडत्या माझ्या मनाला कुणि आता नका आवरूं चालले होऊन माझे मन जणू वाऱ्या वरचे पाखरूं आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा गत रात्रीच्या कभिन्न अंधारातून देखिले चोहिकडे नयन मिचकावून बहरले जीवन फुला फुलातून निश्चय झाला मग हे देखून आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा का भारावलेले असे माझे जीवन का मोकाट सुट्लेले मी असे तुफान मन होई साशंक करीता जीवन प्रवास वाटे जाईन हरवून मी तुझा सहवास आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा श्रीकृष्ण सामंत
Subscribe to कविता