मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निवृत्तीनाथ केशवसुमारास...

अविनाश ओगले · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
निवृत्तीनाथ केशवसुमारास... विडंबने तव सर्व जुनी मी स्मरतो आहे मनापासूनी आज तुला मी लिहितो आहे हक्कच होता! तुजला टाळ्या खूप मिळाल्या `कवी' तरीपण कशामुळे घुसमटतो आहे? कसल्या प्रतिमा? कसले जाळे? मला कळेना लिहावेस तू पुन्हा म्हणूनी धडपडतो आहे कविता नंतर; आधी विडंबन वाचत होतो आठवणींनी त्या सार्‍या गलबलतो आहे `रवि न देखे' ते ही कवी हा पाहू शकतो विडंबने करण्यास कशा घाबरतो आहे? घे विश्रांती; थांबव `क्षण'भर या कोलांट्या पण निवृत्तीचा मूड मला ना कळतो आहे सुचेल तेव्हा लिहीत जावे, काव्य-विडंबन हेच मागणे, हीच विनवणी करतो आहे म्हणून म्हणतो, बदला निर्णय; आणि म्हणा की- `आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे'

वाचने 3612 वाचनखूण प्रतिक्रिया 8

वरदा Mon, 07/21/2008 - 21:30
अगदी हेच हेच म्हणायचं होतं..... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्राजु Mon, 07/21/2008 - 21:49
ओगले साहेबांनी... आम्हा सर्वांच्या मनातलए विचार केशवा पर्यंत पोचवले... के सु करा विचार याचा आणि येऊद्या फर्मास विडंबन.. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग Mon, 07/21/2008 - 21:53
मस्तच! काय सुरेख भावनाविष्कार केलाय, मानलं बुवा! एका कवीने दुसर्‍या कवीला केलेले आर्जव असावे तर असे! (मिपावर काव्यप्रतिभा एवढी भरुन आहे हे बघून मन खरंच भरुन आलं!) चतुरंग

सर्किट Mon, 07/21/2008 - 23:42
ओगले साहेब, आपली "आधारित" रचना (ह्यालाही विडंबन म्हणू नये) अतिशय आवडली. - सर्किट

अनिल हटेला Tue, 07/22/2008 - 07:40
के सु !! आमच्या सर्वाच्या भावना तुमच्या पर्यन्त पोचल्या असतील , तर एक झका स विडम्बन येउ द्यात !!! म्हणून म्हणतो, बदला निर्णय; आणि म्हणा की- `आज नवी सुरुवात पुन्हा मी करतो आहे' आपल्या कवितेचा चाहता, -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

चेतन Tue, 07/22/2008 - 11:02
हक्कच होता! तुजला टाळ्या खूप मिळाल्या `कवी' तरीपण कशामुळे घुसमटतो आहे? हा प्रश्न मलाही पडलायं कसल्या प्रतिमा? कसले जाळे? मला कळेना लिहावेस तू पुन्हा म्हणूनी धडपडतो आहे हेच म्हणतो कविता नंतर; आधी विडंबन वाचत होतो मी ही हेच करतो बाकी कविता मात्र मस्तच् आहे चेतन

केशवसुमार Wed, 07/23/2008 - 11:40
ओगलेशेठ, सुंदर कविता...आवडली.. एकदम निरुत्तर केलेत.. (निवॄत्त)केशवसुमार