Skip to main content

फोड रे मटका...

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 23/08/2008 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
धुंद हे काश्मिर सगळे, एकमेकां मारिती प्रश्न विसरूनी जनांचा, फोड रे मटका धुंद त्या पदकांत सगळे, सुवर्ण कवटाळती प्रश्न हरलेल्या क्षणांचा, फोड रे मटका धुंद त्या खुर्चीत सगळे, राजिनामा खेळती प्रश्न मॅडमच्या खुणांचा, फोड रे मटका धुंद त्या नोटांत सगळे, राज-का-रण आहुती प्रश्न विकलेल्या मतांचा, फोड रे मटका धुंद ते मुंबईत सगळे, वीजपाणी सांडती प्रश्न विझलेल्या दिव्यांचा, फोड रे मटका धुंद अभिषेकांत सगळे, दुधदही अर्पिती प्रश्न सुकलेल्या घशांचा, फोड रे मटका धुंद त्या माडीत सगळे, साकीपेले रिचवीती प्रश्न चुरलेल्या कळ्यांचा, फोड रे मटका धुंद ते तंत्रात सगळे, दो करांनी उपसती प्रश्न वितळत्या हिमाचा, फोड रे मटका धुंद हे गोपाळ सगळे, गोपिका न्याहाळती प्रश्न कसला रे थरांचा, फोड रे मटका सर्व वाचकांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!! -ऋषिकेश
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 6483
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

आयला! लै भारी काव्य रे ऋषिकेशा! जियो...! तात्या.

ऋषी, तुझी दहीहंडी आवडली रे !!! 'फोड रे मटका' हे पालुपद तर लै भारी. अवांतर : अगोदर वाटले ते कल्याण मटक्याच्या आकड्यावर काही लिहिले की काय ?

कविता सुंदर आहे, प्रासंगिक असूनही ! पण आणखी छान होऊ शकली असती. "राज-का-रण" हे सर्वात बेश्ट. -- वैद्य

ऋषिकेश, प्रासंगिक कविता आवडली. स्वाती

धुंद त्या खुर्चीत सगळे, राजिनामा खेळती प्रश्न मॅडमच्या खुणांचा, फोड रे मटका वा वा ! मस्त जमली आहे ही ओळ ! कविता आवडली. राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

ऋषिकेशा! जिंकलस रे !!!

मीटर काही ठिकाणी गडबडतोय पण अशा प्रासंगिक काव्यात ते चालून जाते. छान... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कविता फारच सुंदर आहे !! धुंद अभिषेकांत सगळे, दुधदही अर्पिती प्रश्न सुकलेल्या घशांचा, फोड रे मटका व्वा... धुंद ते तंत्रात सगळे, दो करांनी उपसती प्रश्न वितळत्या हिमाचा, फोड रे मटका क्या बात है..व्वा.. (देवकीनंदन भक्त) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

धुंद ते मुंबईत सगळे, वीजपाणी सांडती प्रश्न विझलेल्या दिव्यांचा, फोड रे मटका धुंद अभिषेकांत सगळे, दुधदही अर्पिती प्रश्न सुकलेल्या घशांचा, फोड रे मटका हे आवडले...

त्येन्लाच मटका बराब्बर लागतुय. प्रकाश घाटपांडे

कविता मस्तच आहे आणि वेगळी आहे. -------- एक आगाऊ सूचना -- >> धुंद त्या नोटांत सगळे, राज-का-रण आहुती ह्या पेक्षा 'धुंद त्या नोटांत सगळे, राज-का-राणे आहुती' असं वापर्‍यालाने जास्त इफेक्टिव होईल का? :)

ऋषिकेश, सुंदर कविता. प्रत्येक शेर सुंदर आहे.. अतिशय अर्थपूर्ण. अभिनंदन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

छान कवीता ! आवडली. --लिखाळ.

सर्व रसिक प्रतिसादकर्त्यांचे अनेक आभार :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

काय मारलंय राव... पार जोड्यानं हाणलंय म्हणा की :) झक्कास... जियो... राघव एक आमचाही - धुंद, पैशाच्या मिषाने, देह विकणारी दलाली... प्रश्न सुकल्या आसवांचा, फोड रे मटका!!

धुंद त्या माडीत सगळे, साकीपेले रिचवीती प्रश्न चुरलेल्या कळ्यांचा, फोड रे मटका यांचा नुसता मटका नाय फोडायचा...... त्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या करून माती करायची... आणि या मातीत या 'धुंदा'वलेल्यांना पुरुन टाकायचं........ धुंद हे गोपाळ सगळे, गोपिका न्याहाळती प्रश्न कसला रे थरांचा, फोड रे मटका हा मटका गोपिकाच आपापल्या रवी-लाटण्यांनी फोडतील..... बाकी मस्त!!!!! राघवजी...... आपल्या कवितेतून सामजिक सत्यतेचं भान परिवर्तित होते.... :) येऊ देत.....

राघवजी...... आपल्या कवितेतून सामजिक सत्यतेचं भान परिवर्तित होते.... येऊ देत..... माफ करा... ऋषीकेशजी.......... नावात थोडा गोंधळ झाला....... (पण त्यामुळे...आपल्या काव्य-प्रतिभेची उंची, खोली तसूभर ही कमी होत नाही...) :)

;) कवितांवरील माझे अगाध प्रेम ठाऊक असल्याने ऋषीकेशा तुला प्रत्यवाय नसावा. ;) मस्त कविता आहे! आवडली. प्रत्यवाय!!!!! वाण नाही पण गुण लागलेला दिसतोय.