Skip to main content

सल ...

लेखक मनीषा यांनी शनिवार, 23/08/2008 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
सळसळते मनात काही सल हलकासा जागवी थरथरती पापण्यां वरती अश्रुंचे ओले मोती | त्या गूढ जलाशयावरी तरंग हळू उमटती जे खोल अंतरी काही अनामिक उमगत नाही | मेघ नभी दाटती कडकडती त्या दामिनी -हुदयात या धुमसती आवेग अनावर किती ? उसळते धूळही वरती दशदिशा कोंदून जाती पाचोळा वाटेवरती पाउल रोखिते धरती | बंध कसले बांधती? प्राणांस कसली भिती ? जोडण्या ईश्वरापुढती हे हात न माझे उरती |
लेखनविषय:

वाचने 2583
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मेघ नभी दाटती कडकडती त्या दामिनी -हुदयात या धुमसती आवेग अनावर किती ? उसळते धूळही वरती दशदिशा कोंदून जाती पाचोळा वाटेवरती पाउल रोखिते धरती | हे विशेष आवडले. शुभेच्छा! :) राघव

कविता ठीक वाटली... पुलेशु....

सळसळते मनात काही सल हलकासा जागवी थरथरती पापण्यां वरती अश्रुंचे ओले मोती | हे तर मस्तच.