मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आठवण....

सौरभ वैशंपायन · · जे न देखे रवी...
आठवते का? आकाशावर उमटुन गेली होती लाली, आठवतो का? तोच रक्तीमा फुलला होता तुझ्याच गाली. - १ आठवले का? हळवे स्पर्श, नीसटती त्यांची हुरहुर, आठवली का? उशीर होता लटक्या रागाची कुरबुर. - २ आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद, आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३ आठवली का? अधीर वचने अधराची अधराला, आठवले का? चुकार अश्रु बिलगते पदराला. - ४ आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली, आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५ - सौरभ वैशंपायन(मुंबई).

वाचने 2675 वाचनखूण प्रतिक्रिया 8

आनंदयात्री गुरुवार, 09/11/2008 - 15:52
आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद, आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३ चाफ्याचा गंध फिका पडला तर त्याने तुझा गंध चोरला !! वाह सौर्‍या वाह !! काय कल्पना आहे ! निहायत खुबसुरत !! आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली, आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५ काय बोलु ? साध्या शब्दात गुंफलेल्या साध्या साध्या सुरेख कल्पना.

प्राजु Fri, 09/12/2008 - 01:08
सगळ्याच ओळी छान. खास करून.. आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद, आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३ आठवली का? अधीर वचने अधराची अधराला, आठवले का? चुकार अश्रु बिलगते पदराला. - ४ एकदम सुंदर! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शितल Fri, 09/12/2008 - 03:46
आठवले का? हळवे स्पर्श, नीसटती त्यांची हुरहुर, आठवली का? उशीर होता लटक्या रागाची कुरबुर. - २ आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली, आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५ मस्तच :)