मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्यामसखा.

सौरभ वैशंपायन · · जे न देखे रवी...
कुणी नसावे दुरवर परी, श्यामसखा जवळी असावा, श्रावणधारांसवेच अलगद, श्यामसखा बरसुनी जावा - १ श्यामसख्याच्या निळाईत अन मग, गौरतनु हे रंगुन जावे, वेणु त्याने लावताच ओठी, सप्तसुरात दंगुनी जावे - २ श्यामसखा असा बरसता, चंद्र लाजुनी चुरुन जावा, सैलावल्या केसात अन मग, स्पर्श जरासा उरुन जावा - ३ - सौरभ वैशंपायन(मुंबई).

वाचने 2361 वाचनखूण प्रतिक्रिया 5

प्राजु 09/09/2008 - 23:20
अतिशय सुरेख रचना.. श्यामसख्याच्या निळाईत अन मग, गौरतनु हे रंगुन जावे, वेणु त्याने लावताच ओठी, सप्तसुरात दंगुनी जावे - २ क्या बात है! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पावसाची परी 10/09/2008 - 11:19
कस रे इतक छान सुचत तुला सगळ्याच ओळी खुप खुप आवडल्या "सैलावल्या केसात अन मग, स्पर्श जरासा उरुन जावा - ३" हे तर अगदी बेस्ट मस्तच -तुझी पन्खी