(करमणूक)
सन्जोपरावांची 'मिरवणूक' बघून आमची करमणूक झाली आणी हे विडंबन प्रसवले! ;) गणपतीबाप्पा मोरया!! :B
असं कवितेशी इतकं तुटक राहून कसं चालेल
म्हणून चष्म्याची काच खाली घेतली
आणि लेखणीने ठेकाही धरला सूक्ष्म
एका अनोळखी नवकवीच्या कवितेवर
कवी आहेत, थोडी कविता करायचेच
म्हणून कौतुकाचाही प्रयत्न केला
काही बिचकणारी कडवी बघून
जरा कागदाचे कोपरे दुमडूनच
पण तरीही
आणि उलट्या पडलेल्या पेपरातल्या
एका मित्रांसह नवकवीलाही
हसून दाद दिली ओळखीची
बिचारा असेल कविगणांना
कवितांची रास दाखवायला आला
अशी समजूत काढत
स्वतःचीच
एरवी असतोच की आपण दर्दी
रसिक आणि काव्यप्रेमी
काही कविता अशाही
यमक, मात्रा, वृत्त यांचा संबंध नसलेल्या
असं म्हणत खोडून टाकली
ओघळणारी मुक्ताफळं
शेवटी कविता म्हणजे तरी काय
वगैरे वगैरे
आणि एका प्रतिक्रियेनं
हादरलो अचानक अंतर्बाह्य
टीकेचा एक ढग
विडंबनावर कोसळेपर्यंत
एक ललकारीही आली कानाशी, अंगाशी
गुरख्यांची, 'किंचित' नवकवींचीही
काच पुसता पुसता
पहिला सलाम केला तो
आपल्या बंडखोर बुद्धीभेदी वगैरे नवकवितेला
आणि दुसरा
खुद्द कवीलाच
म्हणालो मनापासून
विघ्नकर्त्या
ही उरलीसुरलीही नाळ
असलेली कवितेशी
कापून टाक बाबा
पुढच्या काव्यापर्यंत
मग लिही लवकर
किंवा तुला हवं तेंव्हा
'रंगाचं' विडंबन
तयार आहे
चतुरंग
वाचने
4172
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
करमणूक
आवडले
मिपाचे धोरण ?
In reply to मिपाचे धोरण ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सर्किटशेठ,
रंगा, उत्तम
In reply to रंगा, उत्तम by विसोबा खेचर
सुंदर विडंबन !
In reply to सुंदर विडंबन ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हेच म्हणतो
सुंदर कविता
In reply to सुंदर कविता by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राडॉ.धन्यवाद!
छान, आणि एक...
In reply to छान, आणि एक... by लिखाळ
धन्यवाद लिखाळशेठ!
फक्लास!
वा!!
एकदम छान.
रावांची