आमची प्रेरणा: प्राजुताईंची सुंदर कविता- "सहज चाळले"
--------------------------------
सहज चोळले मी पाठीला जाता जाता
क्षणात सगळ्या आठवल्या बसलेल्या लाथा.. :(
किती राहिलो अवतीभवती तुझ्या तरीही,
मनासारख्या झाल्या नाही कधीच बाता =((
मच्छर भलते.. म्हणून मी रात्री जागवल्या
अफवा झाल्या जागरणाच्या मला पाहता! (|:
लोकांच्या डोळ्यात कितीदा येत राहिले..
कळवळणे, अवघडणे माझे उठता-बसता :B
'स्पर्श' तुझ्या भावाचा अजुनी दुखतो आहे
अजुनही 'कळ' उठते आहे तो आठवता.. :
डोळ्यांमध्ये दाटून आली अशी आसवे..
लोक टाळती 'डोळे आले' म्हणता म्हणता @)
अधुनमधुन मी सासरकडच्या गावी जातो..
अन वेड्यागत रुसून बसतो 'गाडी'करता! >:)
किती पसारा आवरण्याचा सोस तुला हा?
धांदल माझी होते ना तो करता करता ! ;)
-ज्ञानेश.
-------------------------------------
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3162
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
(सहज
मी बरोब्बर
चांगला प्रयत्न
साबण चोळले
(विषय दिलेला नाही)
स्माईलींच
+१
In reply to स्माईलींच by कानडाऊ योगेशु