कृष्णार्पण
मूळ रंगांचा एकदा झाला मोठा वाद
सारे म्हणती मीच श्रेष्ठ हेच निर्विवाद
शांतीप्रीय आम्ही हिरवा, निळा, जांभळा,
भडक व गर्विष्ट, लाल, नारींगी, पिवळा
प्रत्ये्कजण केवळ गाती आपली महती
मी श्रेष्ठ म्हणतांना इतरांस नावे ठेवती
काहीच करून त्यांचा वाद नाही शमला
तेव्हा लोलक धरून पांढरा सरसावला
बघा जरा म्हणत लोलका मधून तो गेला
अनेक रंगांचा फ़ुलोरा दुसऱ्या बाजूने आला
वेड्यांनो तुम्ही सारे माझेच आहात अंश
पांढऱ्यानेच बनवले सगळ्या रंगांचे वंश
सारे रंग गप्प बसले, पांढरा आनंदे नाचला
म्हणे मीच विश्व विजेता निर्विवाद ठरला
कृष्ण रंग बघत होता गुपचूप तमाशा
म्हणाला सगळ्यांना या माझ्यासवे बसा
एकेक करून रंग सगळे कृष्णाकडे गेले
सगळे आत विलीन हो़उन कृष्णमयी झाले
भले, बुरे, लहान, थोर, रंगात रंग कृष्ण
उगम वा अंतीम फ़क्त कृष्ण. कृष्ण. कृष्ण.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
2562
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
अपेक्षा
भले, बुरे,
वा!
छान...
छान.
मस्त !!
सुंदर
धन्यवाद