Skip to main content

कविता

slow down

लेखक अमलताश_ यांनी शुक्रवार, 09/10/2020 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
एका क्षणाचा निळा डोह आकाशातून पाहिलेला. त्याच क्षणाचा अरुंद काठ. काठाच्या हिरवळीवरून डोहाच्या पाण्यात पाय खेळवत बसायचय , पावलांनी आकाशाचे तुषार उडवत. जरा थांब ना.... slow down . मला तो क्षण पकडू दे.

(...मारीला म्यां डोळा ;)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 05/10/2020 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा http://misalpav.com/node/47605 अनंतयात्रींची "...पाहिले म्यां डोळा" लैच अस्वस्थ करून गेली म्हणून वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न...

...मारीला म्यां डोळा 😉

पालथ्या मुठीत घट्ट पकडलेला गुलाब जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरा. घर्मबिंदूच्या ठिबकसिंचनाचा शशकासम कापऱ्या शरीरावरुन अविरत अभिषेक. बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित. धपापते विद्रोही तप्तश्वास. ओढणीने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल. स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जीव

स्थलांतर..

लेखक Vivekraje यांनी गुरुवार, 01/10/2020 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
भाकरी साठी शोधली चाकरी, चाकरीसाठी सोडलं गांव.. शहरात कुणी ओळखेना तरी , गावात राहायचं नाही राव.. रोजच्या साठी रोज कमवायचं, मिळेल खायला ते गोड मानायचं.. मजूर म्हणून असंच जगायचं, अन श्रीमंतीचं स्वप्न बघायचं.. थकलेलं मन रोज सांगायचं, एक दिवस मी मालक होईल.. माझ्या मालकीच्या गाडीतून माझ्या गावी परत जाईल.. तेव्हढ्यात कुठला आजार आला, धावणारा माणूस घरात कोंडला.. उद्योगधंदे बाजार बंद, अन वाहणारा रस्ता ओस पडला.. घरात खायला पुरणार किती, दुसरीकडं मागायचं किती.. आठवणीने परत गावच्या, मंद झाली होती मती.. जायला रस्ते भरपूर होते, पण साधन काही मिळणार नव्हते.. स्थलांतरित मजुरांचे हे दुःख कधी कुणा कळणार नव्हत

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे ....( आजकालचं)

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 01/10/2020 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी अगदी सेम असतं.. सक्काळी उठल्या उठल्या पहिला मेसेज चेक करता? झोपेतसुद्धा मोबाईल उशीपाशीच ठेवता? काय म्हणता, Last seen चेक करत उशीरापर्यंत जागता?? मिशीतल्या मिशीत किंवा गालातल्या गालात दिवसभर हसत असता? म्हणजे मग झालं तर! घोडं गंगेत न्हालं तर! व्हर्च्युअल जरी असलं, तरी बावनकशी जेम असतं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ज्या प्रोफाइलला आपण हळूच पहात असतो, तिथे typing दिसणं ...म्हणजेच feeling loved असतं. आणि online दिसूनही blue tick न दिसणं, काय सांगू?
काव्यरस

प्रतिभा

लेखक कुमार जावडेकर यांनी सोमवार, 28/09/2020 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुझ्या रोज भोवती असते एक अदृश्य सोबती असते मी कधी रिक्त शाश्वती असते... वा कधी दिव्य आरती असते! आसवांचे जुनेच लोलक, पण- मी नवी रंगसंगती असते सांजवेळी तुझा विसावा मी आणि दिवसा तुझी गती असते तू करू पाहतोस जे त्याची फक्त मी मूक संमती असते - कुमार जावडेकर

हळव्यांची गळवे

लेखक उपयोजक यांनी रविवार, 27/09/2020 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
मनावर यांच्या ठसठसणारी गळवे आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. गैरसमज करुन घ्यायला हे नेहमी पुढे आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. हे इतरांना टोचतील; प्रत्युत्तरे त्यांना नको आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. हे नेहमीच बरोबर असतात; इतर लोकच चुकत आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. भावनांना डिवचलेत? आता ते सूडाच्या तयारीत आहेत. यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत. शब्दबाण मारलेत?
Taxonomy upgrade extras

परतीचे प्रवास

लेखक मका म्हणे यांनी शुक्रवार, 25/09/2020 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
म्हातारी माणसे एकटीच बसून अश्रू ढाळतात. कधी सहजच पाणी येते त्यांच्या डोळ्यातून उगाच. अचानक विकल होतात ती मागचे काहीबाहि आठवून. सैरभैर होतात माना हलवत चेहेऱ्यावर अपराधी भाव घेऊन... काय बर होत असेल त्यांना ? कोण आठवतय आता या वयात ? कशाने असे बावरले जात असतील ? कसल्या वेदना पाझरताहेत मनातून? आता खूप दूर निघून गेलेल्या माणसांना काही सांगायचे असेल, का आता जवळ असलेल्यांना काहीच सांगता येत नसेल? भोगलेल्या वेदनाचे माप ओतायचय त्यांना कोणाकोणाच्या पदरात की दिलेल्या दुखांच्या डागण्या पुसायच्यात कापऱ्या हातांनि? खोटे मुखवटे ओरबाडायचेत उरल्या सुरल्या ताकतीने का पडलेले चेहेरे पुन्हा एकवार ठाकठीक करायचेत

भान

लेखक मका म्हणे यांनी सोमवार, 21/09/2020 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
ही कसली हळवी गीते मज स्मरति मागोमाग नात्यांवर जमली राख आतून देतसे ऊब ही असली कसली खेळी तू खेळून जासी सहजी हरताना जख्मी होतो तरी वाटे लावू बाजी स्मरणारे जुनेच डाव मी करतो अलगद चाल अन पहाता पहाता देही व्रण उठती लाले लाल या खेळाचे मैदान जरी भासे अंगण वाडी पण नियती लागता मागे पळता भुई वाटे थोडी हे नियम उलटे सुलटे मज कळो लागले जेव्हा बळ सरले त्राणांमधले संपला वेळहि तेव्हा सरले जरी अंतर आता परी देणे टळले नाही तो फेडून घेतो आधी जे दिलेच नव्हते काही

मन

लेखक Pratham यांनी शनिवार, 19/09/2020 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
मन हे कधी शांतपणे खळखळणारा झरा, तर कधी अथांग सागरी लाट. मन हे कधी कातळ खडकासारखे टणक, तर कधी कापसासारखं नाजूक. मन हे कधी आकाशात उंच झेपावणारे पाखरू, तर कधी अविचल,स्निथप्रज्ञ क्रौंच. मन हे कधी हिमालयासारखे भव्य, तर कधी लाजाळू सारखे संकुचित. मन हे कधी एक संथ पावसाची लहर, तर कधी धो धो कोसळणाऱ्या सरी. -प्रथमेश

कोणे एके काळी ...

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 19/09/2020 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
कोणे एके काळी जेव्हा लोक एकमेकांंना सहज भेटत असत, कारणाशिवाय.. तेव्हा मॉलच्या पाय-यांवर भेटलास. इकडचं तिकडचं बोललास. मी हसत होते वेड्यासारखी.