प्रेमाचा कोव्हीड!!

लेखनविषय:
(नम्र विनंती: कविता हलके वाचावी. न आवडल्यास विसरून जावी. भावना दुखवून वगैरे घेऊ नयेत. तितकी तिची लायकी नाही. दिवस हे असे आहेत. त्यात आपला जरा विरंगुळा, इतकेच!) -------- आठवतं तुला? तुझ्या अंगाला सेंटचा वास येत होता, सॕनिटायझरचा नाही.

वर्षादूत

लेखनविषय:
काळ्या झालरीची नक्षी नभी लोलक विजांचे वाजे चौघडा नगारे वाऱ्यासंगे हे ढगांचे आला,आला म्हणताना दारी येउनी ठाकला वर्षातला नवा ऋतु माझ्या डोळ्यात साठला किती किती त्याचा दंगा किती रूपे, किती रंग काळ्या फत्तराला देई एक ओलसर अंग त्याचे थेंब, त्याच्या सरी येती धावून धावून आर्त तापल्या भुईला भेटी कवेत घेऊन कोसळल्या धरेवरी जशा धारांवर धारा काळी माय झाली सर्द बिलगून लेकराला मग धावले बाहेरी तिच्या अंतरीचे काही वाहे भरून भरून जाऊ दश दिशा पाही मंद गंध जीवघेणा कसा पसरे भरारा गेला दाटून कोंदून ओल्या सृष्टीचा गाभारा वाटे हवासा हवासा पाहुणा हा अनाहूत निथळूनी गेले मन पाहुनी हा वर्षा दूत

तहान

लेखनविषय:
झाडांचे उंच पिसारे वारा हलतो जरासा माझ्याही ओठावरती थिजली शुष्क पिपासा पेटले आभाळ वरती दूरस्थ शीतल जाळ पाण्यावर मंद लहरींच्या पायी बांधले चाळ पोकळीत वैशाखाच्या तरंगते उष्ण हवा डोंगरात झाडामध्ये शोधते शांत विसावा दगड झाड अन पाणी मी याहून वेगळा नाही कोलाहलातून शहराच्या अलगद निसटू पाही बुडता सूर्य मावळतीला घरट्यात परतती रावे कणाकणात या सृष्टीच्या अलगद मिसळून जावे जाग झोपेमधुनी येता जाणीव याची व्हावी आकाशी डुलत्या फांद्या मुळे जमिनीत असावी रोकडा क्षण आत्ताचा जाणिवेत पूर्ण भरावा साजरे पुरे अस्तित्व अन जगण्याचा उत्सव व्हावा -अनुप

सोबतीण

लेखनविषय:
आज अंगणातच मला दुरावा दिसला, सगळयानी त्याला परक केल याची खंत सलत होती त्याला, त्याची ती अवस्था पाहवली नाही मला, मी दुराव्याला ही आपलेस केलं, असहायतेलाही साहय केलं, दुख ही दरात उभा राहुन पाहत होत सार. त्याच ही अगदी आनंदाने स्वागत केलं, तो मला विखुरताना पाहयला आला होता, त्यालाच मी प्रेमाच्या दोन शब्दांने सावरलं, ते एेकुन माञ त्याचे डोळे नभाळ झाले आणि दुख ही त्या क्षणी सुखावला, कसली तरी चाहुल लागली, कोण आहे तिकडे, पाहलं कोपरयात गुपचुप खाली मान घालुन एकटाच एकटेपणा बसला होता काय हवं तुला?

झड

लेखनविषय:
पावसाची येता झड जुने जातसे वाहून आठवणींचा दोदाणा आणि अंतरीची खूण धोधो पाऊस वाहता माझे मन स्वच्छ होई मागमूस किल्मिषांचा सापडेना कोण्या ठायी कडाडते वीज नभी लख्ख तेज चकाकते आठवणीतले हसू तिचे मज खुणावते झड थांबे घटकेने थंडगार आसमंत पाण्यातले प्रतिबिंब भासे मज शांत शांत (दोदाणा: पाण्याचा वेगवान प्रवाह)

शोध

लेखनविषय:
माहीत नाही कोणत्या देशी येऊन मी थांबले, ना ओळख या पाऊल वाटांशी, ना इथल्या संकेतस्थळाशी पण पाऊसात माञ ओळखीचा गंध परिमळे ना सोबती कुणी माझ्या, ना मी कोणाची सोबती पुसत सारया दिशांना, कापत अंतरातले अंतर स्वतः च्या दिशेने स्वतः ला दिशा देत चालले गाफिल राहिली माझ्यातली कविता माझ्यामध्येच, अन माझेच शब्द आता मला ओळखेनासे झाले डोहातल्या चांदण्यापर्यत मौन माझे पोहचले सारे शब्द अलगद तुझ्या ओंजळीत येऊन ओसरले -प्राजक्ता ( मी इथे नवीन आहे, आणि ही पाहिलीच पोस्ट आहे , काही चुकलं तर माफ करा)

सहजच...

लेखनविषय:
सहजच चुकुनी वाट तुझी तू चुकून माझ्यासमोर यावे, तुला पाहुनी हसून मीही तुझ्या चुकीला माफ करावे सहजच मग तू हसता हसता हातामध्ये हात विणावा, उगाच मग मी लटक्या रागे क्षणात तोही दूर करावा. सहजच तुझिया गाली तेव्हा खट्याळ कलिका फुलून यावी, पोक्त समंजस शब्दांची मग तिथेच नकळत वाट चुकावी. सहजच तुजला सोडायाला, तुझ्या घराशी मी पोचावे, कशी एकटी परतू मी? मग माझ्या सोबत तूही यावे. अशी सहजता अपुल्यामधली, नाव कोणते देऊ याला? जुने जाणते झालो तरीही सदैव खळखळ वाहत -हावी..

प्राणप्रिये

लेखनविषय:
काव्यरस
प्राणप्रिये, सात फेरे घेऊन जीवनात माझ्या आलीस , अन अंगणातील तुळस झालीस तू. हसून खेळून सुखी संसाराची स्वप्ने रंगवतेस, अन मला समाधानाचा गारवा देतेस तू. प्राणप्रिये, अंधाराच्या जाळ्यामध्ये ही प्रकाशाची फुंकर घालतेस, अन प्रितीच्या वाऱ्यावर झोका झुलवतेस तू. जिद्दीने उंच उंच भरारी घेण्यास शिकवतेस, अन मनाच्या गाभऱ्याचे दरवाजे उघडतेस तू. प्राणप्रिये, सहजीवनात आधार देऊन साथ निभावलीस, अन माझ्या घरची परसबाग झालीस तू. सुख दुःखाच्या प्रत्येक गोष्टीत भागीदारी केलीस, अन जीवन माझे रोशन केलेस तू. प्राणप्रिये, अमाप प्रेम करून वर्षोनुवर्षे संगत

प्रेम दिसावे

लेखनविषय:
तुझ्यासाठीच क्षण प्रत्येक जगावा माझ्या आधी 'तू ' होण्यात जगावा अस कस भरलं खूळ ,कोड पडावे सोडवण्याआधी मी आणखी गुंतावे साऱ्या दूनियेने कोठेही धावावे तुझ्या पावलांभोवती जग शोधावे खुडतांना दुःख होते फुलांनीही सांगावे नको त्यागाची 'वाहवाही' फक्त प्रेम दिसावे -भक्ती (२०१६)
Subscribe to कविता