Skip to main content

कविता

Soap Opera

लेखक संदीप-लेले यांनी रविवार, 30/08/2020 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
जमेल तसे जास्तीत जास्त स्वत:ला विकायला शीक दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक सगळ्या मालिका सारख्या त्यात दळली फक्त कणी पाझरती सा-या वाहिन्या जसे गटारातील पाणी निर्बुद्धपणा कळसाला सारे कैकयीचे वंशज कमरेचे अजून कमरेला तेही सुटेल लवकरच रोज त्याच घाणीमध्ये डुकरासारखं लोळायला शीक दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक पेराल तेच उगवते पहाल तेच निपजते तणासारखे वाढते TRP वर फोफावते पडद्यावर जे दिसेल ते सुख देवो मनाला अभिरुची सोडून दे डोकं बांध गुडघ्याला भरलं ताट टाकून कच-यावर पोट भरायला शीक दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक पुरुषांना साड्या नेसवून पाचकळ विनोद करूया पडद्यामागून जोरदा

जग जेव्हा ग्रँटेड घ्यायला लागते...

लेखक पंचमहाभूते आणि थोडं यांनी सोमवार, 24/08/2020 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
जग जेव्हा ग्रँटेड घ्यायला लागते... सूर्य ही थकतो कधी कधी... ज्या तेजाने पृथ्वी जगवतो... स्वतःही काजळतो कधी कधी... तेव्हा जे हात समोर येतात... सूर्याला लागलेलं ग्रहण ओढून... पुन्हा एकदा सूर्य धरतीच्या दारावर... तोरण म्हणून बांधायला... ते खरे दिन'कर'...

लघु गुरु कसे ओळखावेत - सूक्ष्मभेद आणि बारकावे

लेखक धष्टपुष्ट यांनी सोमवार, 24/08/2020 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
कळीचा नियम: ज्या अक्षराला उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो ते लघु, आणि जास्त वेळ लागणारं अक्षर गुरु. . पण अनेक वेळेला नियम खूप संक्षिप्त असेल तर तो पुरत नाही. पुढे आलेले उपनियम या एकाच नियमाहून ओघाने आलेले आहेत. त्यातले सूक्ष्मभेद आणि बारकावे थोड्या विस्तारानं पुढे देतोय. . १) आपण शुद्धलेखनात जे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहितो ते ढोबळमानानं लघु किंवा गुरु असतात. मुले आणि भिणे या शब्दांची पहिली अक्षरे ऱ्हस्व आली आहेत म्हणून ती लघु. मूल आणि भीत-भीत या शब्दांची पहिली अक्षरे दीर्घ आहेत म्हणून ती गुरु.
Taxonomy upgrade extras

गणपतीची लोकगीतं

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 22/08/2020 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
यावे नाचत गोरीबाळा हाती घेऊनी पुष्पांच्या माळा सर्वे ठायी मी वंदितो तुला | यावे नाचत गौरीबाळा ट चौदा विधयेचा तूं माता पिता सर्वे ठायी हाय तुजी सत्ता | चार वेदा ध्यावे वेळोवेळा ृ यावे नाचत गोरीबाळा | साही शास्त्रे अठरा पुराण तुझ्यापासून झाले निर्माण | भक्त देव येती मंडपाला यावे नाचत गोरीबाळा | मुळारंभी सत्व धरी पाया | संगे घेत सरस्वती माया.

वार्ता सुखाची घेऊन....

लेखक Vivekraje यांनी शनिवार, 22/08/2020 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
वार्ता सुखाची घेऊन , आता यावे घरी देवा..| ओढ भेटीची लागली, होई तगमग जिवा..|| काही कळेना जीवाला, मना धाव घेऊ कोठे..| ओढ तुम्हा दर्शनाची, धीर काळजात वाटे..|| तुमच्या येण्याची चाहूल, देवा आम्हा सुखावते..| अवघी चिंता दुःख सारी, जशी दूर घालवते..|| आहे संकट हे मोठं, नाही माणसाच्या हाती..| नाही श्रीमंतीचं मोलं, होते गरीबाची माती..|| वार्ता सुखाची घेऊन , यावे वाजत गाजत..| नको दुःखाची किनार, कुणा ओल्या पापण्यात..|| नाव तुझं मंगलमूर्ती, विघ्नहर्ता तुझी कीर्ती..| तुझ्या येण्यानं ही सारी, देवा उजळावी धरती..|| जरी झाली चूक थोडी, देवा स्वीकारून घ्यावी..| रीती परंपरा उत्सवाची, देवा पुन्हा सु
काव्यरस

.

लेखक एस.बी यांनी गुरुवार, 20/08/2020 03:19 या दिवशी प्रकाशित केले.

मध्यमवर्ग

लेखक पंचमहाभूते आणि थोडं यांनी बुधवार, 19/08/2020 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
मन मुंबई लक्ष्मी लॉटरी... मन खडखडीत तिजोरी... मन वैरी... मन डायरीतले मोरपीस... मन आहेराचा शर्ट पीस... मन कासावीस... मन मंदिरातला गाभारा... मन हातामधला गंडादोरा... मन भरारा... मन इमान धैर्य न्याय... मन दोन दगडावरती पाय.. मन हाय हाय...

॥ कृष्णतृष्णा ॥

लेखक मी-दिपाली यांनी शनिवार, 15/08/2020 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रलोकीचे दिव्य फूल ते द्याल मजला का श्रीहरी। हट्ट पुरवण्या भामेचा मग लावला पारिजात दारी ॥ क्षणिक ठरले सुख भामेचे हरिस प्रिय मी रुक्मिणीहुनी। गेले ते अवसान गळोनी सडा पाहता तिच्या अंगणी ॥ प्रासादी ना रमली मीरा प्रभूभजनी दंग जाहली। मनी वरोनी गिरीधारिसी विषप्यालाही सुखे प्याली॥ लावण्यासवे पाहुनी कृष्णा कुब्जा लपवी शापित याैवन। हरखुनी गेली उमगे जेव्हा शाम होता तिजसाठी पण॥ रंगुनीया रंगात साऱ्या एक झाला रंग अवघा । राधा होई का निळी हे अजुनी न कळे श्रीरंगा॥ कदंबतळी रासलीलेचे विलोभनीय दृश्य दिसे। हरेक गोपिकेच्या संगे कृष्ण दिसे...कृष्ण दिसे॥

अनुष्टुप/अनुष्टुभ सराव - हलकीफुलकी काव्यपूर्ती

लेखक धष्टपुष्ट यांनी सोमवार, 10/08/2020 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
गंमत म्हणून हा धागा. शाळेत गाळलेल्या जागा भरायचो तसंच. खाली अर्धवट लिहिलेली ओळ आहे - ती अनुष्टुप छंदामध्ये पूर्ण करता येते का बघा. दिलेल्या उदाहरणात माफक बदल केलात तरी चालेल. शब्द आकलनीय राहीपर्यंत लघु गुरु मध्ये स्वातंत्र्य आहे. बाष्कळपणाचे स्वागत. . आकृतिबंध पहिल्यांदा संदर्भासाठी देतोय.

अस्फुट

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 09/08/2020 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
नि:संग उदासीन नभ हे धरतीला भिडते जेथे त्या धूसर क्षितिजावरती अस्फुट काही खुणवीते मरुभूमीतुनी जडाच्या चैतन्य जिथे लसलसते त्या अद्भुत सीमेवरती अस्फुट काही खुणवीते शब्दांच्या निबिड अरण्यी अर्थाचे बंधन नुरते त्या अपार मुक्तीमध्ये अस्फुट काही खुणवीते
काव्यरस