Skip to main content

कविता

दिवाळी इथली आणि तिथली

लेखक VRINDA MOGHE यांनी शनिवार, 14/11/2020 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
*दिवाळी इथली आणि तिथली* बंगल्यामधे सगळीकडे विजेची रोषणाई गिफ्ट बाॅक्सेसमधून ओसंडते मेवे मिठाई खातील तरी किती..अर्धे वायाच जाई कशाचीच तमा इथल्या कोणालाच नाही !! झगमगाटात वाहतो पैशांचा महापूर, आसमानात पसरे हजारो फटाक्यांचा धूर ! तिजोरी भरून वाहिली तरी 'अजून' चा सूर, कोण करेल भस्मसात हा लालसेचा असुर !! तिकडे झोपडीमधे घडे रोजचाच उपास, हाती नाही काम, नाही पोरांमुखी घास, कामासाठी वणवण करून लागतो श्वास दिवाळी नाही की मिठाई नाही फटाके कपड्यांची तर बातच नाही एका पणती पुरतेही तेल घरात नाही , पोटाच्या आगीने नी अश्रुंनी जर पणती पेटेल तर अवघी झोपडी प्रकाशाने झगमगून उठेल !! किती भेद जगण्यांमधे..दोन टोकं
काव्यरस

दोघे आपण...!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शनिवार, 07/11/2020 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
दोघे आपण...!! परिणय आपुला, हे नवजीवन, त्यास प्रीतीचे, अनुपम कोंदण, जगा वेगळा वाटे साजण, तरी, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. मनी बांधते मखमली तोरण, छोटे घरकुल, मोठे अंगण, अनुरागाचे त्या, मधुर शिंपण, पण, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. दोन मनांची नाजूक गुंफण, जना मनाचे सुरेख बंधन, विवेक करितो अभिनव कुंपण, कां, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. दोन जीवांचे एकच बंधन, सुगंधी नाते, जणु ते चंदन, आता उरले अबोल क्रंदन, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. कलहामधुनि सदैव घर्षण, संघर्षाचे चर्वित चर्वण, कुठे हरवले ते आकर्षण, दोन ध्रुवांवर दोघे आपण.. संसारी या एक उणेपण, आनंदाची भासे चणचण, वादविवादाची ती तणतण, दोन ध्रुवा

ओळख!

लेखक राघव यांनी गुरुवार, 05/11/2020 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भः लहान मुलांकडे असलेल्या निरागसतेमुळे मी नेहमीच प्रभावित अन् अचंबित होत असतो. आणि खरंतर ते अत्यंत आनंददायी असतं! "अरे खरंच.. आपण असा साधा विचार का नाही करू शकलो?" असं स्वतःला अक्षरशः अनेकदा विचारण्याची वेळ येते ! त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन फार साधा आणि कुतुहलाचा असतो. सरळ स्वभाव असल्यामुळे केमिकल लोचा कमी असतो! परत, जरी त्यांची स्मृती चांगली असते तरी मनात अढी ठेवून वागण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. उलट ते फार सहजपणे गोड वागतात, माफ करतात आणि विसरूनही जातात. कदाचित याच कारणानं लहान मुलं सगळ्यांना हवीहवीशी वाटतात! ह्या अनुषंगानं विचार होत असता, काही ओळी सुचत गेल्या. ती ही रचना.

शहाणी मुलगी....

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 05/11/2020 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या समोर मी नेहमीच शहाण्यासारखं वागायचं ठरवते. खूप वाटंत असतं तुझ्याकड अनिमिष नेत्रांनी पहावं.. तुझ्या कपाळावर येणारी चुकार बट, तुझे भुरभुरणारे केस, तुझ्या गालावरची खळी, बोलताना हलणारे लोभस ओठ.. पण मी अगदी शहाण्या मुलीसारखी बसते, डोळे झुकवून. झुकलेल्या नजरेला दिसतात तू कोपरापाशी अस्ताव्यस्त दुमडलेल्या बाह्या, तुझी ती लांबसडक कलाकाराची बोटं, शर्टाच्या पहिल्या उघड्या बटणातून खुणावणारी तुझी रुंद छाती. मी नजर अजूनच आवरून घेते. मग दिसतो ऐकू न येणा-या तालावर हलकेच हलणारा तुझा पाय, त्याचा तो देखणा अंगठा, मृगमुखी! मी तिथेच हरवून जाते... भानावर येते तेव्हा तू माझ्या उत्तराची वाट पहात असतोस. "अं?"

मिसळ पाव मिसळ पाव

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 01/11/2020 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ पाव मिसळ पाव खा रे खा मिसळ पाव मिसळ पाव मटकीची उसळ तिची करा मिसळ उसळीत घातला शेव कांदा त्यात पिळला लिंबू अर्धा रस्सा टाका त्यात चांगला पावाबरोबर खाऊन टाका मिसळ पाव मिसळ पाव झणझणीत तर्री अर्धी वाटी ओता त्यात होईल खाशी नाकातोंडातून येईल धुर मग दह्याने बदला नूर असली मिसळ अन दहा पाव खाऊन तर पहा राव मिसळ पाव मिसळ पाव एकदाच खा अन ढेकर द्या उगाच नंतर जेवायचे काम नाय नको ते इडली सांबर पुन्हा घ्याल का पराठे नंतर? मिसळीत आहे सारे गुण एकदा खाल तर व्हाल टुन्न हातावरचे अन पोटावरचे एकच झाले मिसळीवरचे केवळ नाव तुम्ही घ्याल मिसळ खाल मिसळ खाल मिसळ पाव मिसळ पाव - पाषाणभेद ०१/११/२०२०
काव्यरस

हसरतों का ज़नाज़ा..!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शनिवार, 31/10/2020 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
हसरतों का ज़नाज़ा...! लुटा रही थी खुशियाँ, मैं तो सारे जहाँ में, सौगात कोई गम की, मुझें भीख दे गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. दिल की मुराद लिखने, बैठी थी नाजुक कलम से, बेवफ़ाई की स्याही, कोई उनपे गिरा गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. लिखे थे मैंने इम्तेहाँ, बड़े लगनों-इमान से, सफ़ल उन्हीं में मगर, कोई गैर हो गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. जुड़ी थी साँसे जिनसे, मेरी ही जिंदगी की, चुराके मुझसे उनको, कोई मौत दे गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. मुझे मुहब्बत थी जिनसे, जाँ से भी ज्यादा, वो शख्स भी तो मुझसे, रुठकर चला गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. मिलने से

कोजागिरी

लेखक VRINDA MOGHE यांनी शुक्रवार, 30/10/2020 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
*कोजागिरी* पुनवेचा चंद्र उगवता चांदणे निथळते भूमिवरी, आली शरदाची पौर्णिमा, आनंदभरली हि कोजागिरी !! आबालवृध्द सारे जमूनी, पुजन ध्यान लक्ष्मीचे करती लक्ष्मी बसूनी विमानी, पुसते, "कोजागर्ती" "कोजागर्ती" ? !! एकत्र सारे खेळ खेळूनी, गाणी गाऊनी, फेर धरूनी.. आनंदे जागवा रात्रीला, बदाम केशराचे दुध आटवूनी, नैवेद्य दाखवा चंद्राला !! केशर दुधाने भरूनी प्याले, चंद्रकिरणं त्यात पडूद्या, आरोग्यदायी शितल दुध, चवी चवीने रिचवून घ्या !! अशी आनंदी कोजागरी, साजरी होईल ज्या ठिकाणी, लक्ष्मी वसेल सुखाने, नांदेल कायम त्या ठिकाणी !! -©सौ वृंदा मोघे *कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा*

महारास

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शुक्रवार, 30/10/2020 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
महारास..!! इतकी वर्ष झाली आता, थांबव लपंडावाचा फार्स, नटून थटून आलेय मी, दिसतेय एकदम क्लास, जन्मभर वाट बघतेय, संपले घड्याळाचे तास, कृष्णा, खेळशील माझ्याशी रास..? खूप वर्ष रेटला रे हा, भातुकलीचा संसार बास, आयुष्याच्या सांजवेळी, कधी होई मन हे उदास, दमल्या थकल्या ह्या जीवाचा, निरवी संसार त्रास, गोविंदा, खेळशील माझ्याशी रास..? क्षणोक्षणी संपत जाती, माझे जीवन श्वास, हिरा नसे तरी ह्या कोळशा, मारशील का रे तास, वेड्या माझ्या स्त्री हट्टाला, खुशाल मनोमनी हास, मुकुंदा, खेळशील माझ्याशी रास..? विषय विकार अन् अहंकाराचा, अलगद सोडव फास, किती अवघड तुझ्या परीक्षा, होईन ना मी पास,

कुणीतरी, केव्हातरी, कधीतरी, कुठंतरी ...

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 29/10/2020 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाच्या सावलीत सावलीतल्या उन्हात कधीतरी वेडं मन भिजतं ना? गप्पांच्या नादात नादावल्या जगात कुणीतरी गोलगोल फिरतं ना? चहाच्या कपात कपातल्या चहात काहीतरी गोडगोड घडतं ना? मनातल्या प्रश्नाचं मनातलं उत्तर केव्हातरी कुठंतरी मिळतं ना? कसंतरी कुठंतरी कुणीतरी केव्हातरी कधीतरी प्रेमात पडतं ना? पडतं ना?