Skip to main content

कविता

यमकं बिमकं, कविता बिविता..

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 30/12/2020 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
तू म्हणालास , "यमकंबिमकं, कविता बिविता ऐकून होतो नुसता जाच माझ्यासाठी कधीतरी तुझीमाझी गोष्ट वाच." मला खुदकन् आलं हसू, आपली गोष्ट कशी वाचू? आगा नाही पिछा नाही, गोष्टीला त्या नावही नाही, अशी गोष्ट सांगतात का? आणि कुणी ऐकतात का? समजा जर सांगितली तर तुझं नाव घालू कसं? नावच जर बदललं तर मी पुढं बोलू कसं? तो तिला कुठं भेटला, सांगताना पापणी थरथरेल. कसा हात मागितला?
काव्यरस

योगेश्वर...

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी रविवार, 20/12/2020 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
योगेश्वर.... अज्ञानी जीव, होई वेडापिसा.. तयाचे समाधान, योगेश्वर. मनी असे नित्य, प्रश्नांचे आवर्त.. तयाचे उत्तर, योगेश्वर. भवनदी माजी, आशेचा भोवरा.. रक्षी तो सोयरा, योगेश्वर. देहाच्या ममत्वे, दु:ख निरंतर.. आनंद निधान, योगेश्वर. मानवी जीवन, वृत्तीचा पसारा.. तयासि निवृत्ती योगेश्वर. दासाचि इच्छा, चुको गर्भवास.. तयासि मुक्ती, योगेश्वर. साधकासी लागे, स्वरूपाची आस.. निजरूप त्याचे, योगेश्वर. भक्ती, ज्ञान, योग, मार्ग जरी भिन्न.. परब्रह्म एक, योगेश्वर. जयगंधा.. २४-११-२०१७.

मन तुझे-माझे

लेखक मन्या ऽ यांनी मंगळवार, 15/12/2020 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्याशी बोलता मन माझे जणु बेभान होते तुझ्याचं विचारात मन माझे विरते तु जवळ नसता मन तुझ्यासाठीच झुरते विरहात ही मी तुझ्यातच रमते तु कितीही दुर असावा तरी तुझ्या मनाला कधीही माझा विसर न व्हावा कितीही मैलांचे अंतर असले तरी मनाने तु सदैव माझ्या पास असावे तनाने दुर असलो तरी मनाने एकरूप व्हावे! -Dipti Bhagat 4 March, 2019

कविता

लेखक VRINDA MOGHE यांनी गुरुवार, 10/12/2020 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
मनमोहन कृष्ण येतो स्वप्नी मधुर पावा मनात गुंजतो. होते मी हि राधा वेडी. अंगणी चाफा डोलू लागतो !! चाफ्याच्या मधूर सुगंध लहरी , दरवळती दूर दूर रानी वनी गंधाने त्या वेडा होऊन कृष्ण येतो माझ्या स्वप्नी...!! चाफा माझा सोनसळी सुगंध अनुपम जगात , जीवा शिवाची भेट घडवतो, राधा कृष्णाच्या रूपात !! -वृंदा

सामान्य माणूस....

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी गुरुवार, 10/12/2020 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य माणूस... वर्गात लोकं म्हणती स्कॉलर, जपतो आमची स्वच्छ कॉलर, सहसा नशिबी नसतात डॉलर, खिशात फक्त ओंजळभर चिल्लर... रांगोळीत आमच्या सजते, आकांक्षांची नक्षी, स्वप्नांच्या झाडावर रोज, नव्या इच्छांचे पक्षी... मनातल्या नकाशावर, आयुष्याची रूपरेखा, वाळूत काढतो रेषा, ते आम्ही पांढरपेशा... सुख दुःखाच्या प्रसंगी, आम्हा सोडत नाही चिंता, डोळ्यासमोर सतत फिरतो, महागाईचा वरवंटा.. कोणतीही असो दशा, आम्ही सोडत नाही दिशा, कर्तृत्वाला झळाळी देते, आमच्या मनातली आशा.. गरजा कंठशोष करून सांगतात, तू क्षणभर नको थांबूस, छातीवरलं बिरुद अभिमानाने मिरवतो, "मी सामान्य माणूस"....! जयगंधा... १०-१२-२०२०.

अक्षयपात्र

लेखक अमलताश_ यांनी गुरुवार, 10/12/2020 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःशी कणभर असताना दोन्ही हातांनी मणभर द्यायची इच्छा असते तेव्हा तो भेटतो. कणभराने तृप्त होतो. अक्षयपात्र तिच्या काळजाचं झालेलं असतं . खळाळत उधळत वाहतो प्रेमाचा झरा आटत नाही. लाघवी हसरा चेहरा डोळ्यात तेवत राहतो विझतच नाही. अव्यक्ताचं हे महाभारत पेलायला पुन्हा कृष्णसखाच लागतो. कृष्णसखा भेटतो. फक्त त्यासाठी त्या अनवट वाटेवरची द्रौपदी व्हावं लागतं .

मी पाहिलंय...

लेखक आर्णव यांनी शुक्रवार, 04/12/2020 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी पाहिल्यात इच्छा आकांक्षांच्या कळ्या. उमलताना फुलताना, मस्त बहरताना. काहींना झाडावरच कोमेजताना. काहींना निर्माल्य होताना. मी पाहिलेत निर्धाराचे पाषाण. अविचल स्तब्ध असताना. प्रयत्नांचे घण चिकाटीने सोसतांना. मूर्ती बनून श्रद्धास्थानी बसताना. मी पाहिलंय सदा भुकेल्या अहंकाराला. अधाशीपणे सुख उपभोगताना. कधी सोयीस्कर मस्तक झुकवताना. कधी दैवाकडे जोगवा मागताना. मी पाहिलेत बुद्धीचे गगनचुंबी मनोरे. अंतराळाला गवसणी घालताना. हव्व्यासाच्या नादी लागताना. जमिनीशी नातं तोडून टाकताना. मी पाहिलेत प्रतिभेचे सूर्य. संपदेचं तेज उत्सर्जताना. काही उगवताना, आकाशात तळपताना. काही आळसाच्या अंधारात मावळुन हरवताना.

आरसा

लेखक आर्णव यांनी गुरुवार, 03/12/2020 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
झालं गेलं गंगेला मिळालं, विचार करू नये फारसा. बाकी सगळे ऐकतात हो, पण ऐकत नाही तो फक्त आरसा. आरशाची एक मोठी गंमत असते, त्यात पाहिल्यावाचून राहवत नाही. प्रतिबिंब नव्हे प्रखर सत्य ते, अधिक काळ पाहवत नाही. आरशावर का चिडू मी, तो थोडीच आठवणी साठवत होता. पण त्याच्या कडे पाहताना नेहेमी, मला माझा भूतकाळ आठवत होता. हल्ली आरशात मी बघतच नाही, कारण मग नंतर मन रमतच नाही. आता कल्पनेतच जगीन म्हणतो, सत्याला सामोरं जाणं जमतच नाही. आरशापासून पळत होतो, माझ्या सावलीला हसताना पाहून हबकलो. "स्वतःपासून कुठे पाळतोयस?" ऐकून ती व मी जागीच थबकलो.

चंद्रायण..!

लेखक सत्यजित... यांनी बुधवार, 02/12/2020 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
ही रात निळीशार, ओतीत चंद्र-धार... स्वप्नातल्या कळ्यांना देते नवा आकार! पाण्यात चंद्र-पक्षी, मांडून सौख्य-नक्षी... किरणावरी शशीच्या होतात मंद स्वार!

मुसाफिर..

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी सोमवार, 30/11/2020 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
मुसाफिर... अवचित एका मुसाफिरानं, जीवनात पाऊल टाकलं.. भूतकाळाच्या क्षणांचं पान, त्यानं अलगद पुसून टाकलं.. परीस स्पर्शानं त्याच्या, मनाला मोहरुन टाकलं.. आभार कसे मानू त्या योगेश्वराचे, ज्यानं माझं आयुष्यच उजळून टाकलं....!! जयगंधा.. ३०-११-२०२०.