हळव्यांची गळवे
Taxonomy upgrade extras
मनावर यांच्या ठसठसणारी गळवे आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.
गैरसमज करुन घ्यायला हे नेहमी पुढे आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.
हे इतरांना टोचतील; प्रत्युत्तरे त्यांना नको आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.
हे नेहमीच बरोबर असतात; इतर लोकच चुकत आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.
भावनांना डिवचलेत? आता ते सूडाच्या तयारीत आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.
शब्दबाण मारलेत? ते ग्रुप सोडायच्या तयारीत आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.
यांना हवं तसं जगात घडत नाही.त्यामुळे अस्वस्थ आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.
त्रास फक्त यांनीच भोगला जगात.बाकीचे सुखात आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.
संयमाच्या नावे शिमगा आणि चिडचिडीचे टोक आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.
लावून थोडीशी संध्याकाळी; बडबडायला बसलेच आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.
कसं वागावं यांच्याशी? बघावं तेव्हा पेटलेले आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.
'माहिमचे हळवे' या आगामी काव्यसंग्रहातून.
वाचने
2514
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
असो , उडीदामाजी काळेगोरे !
आवडली कविता
डॉ.खरे साहेबांवर आहे वाटतं
खोडसाळ आहात हे मान्य केल्याबद्दल आभार! ;)