Skip to main content

कविता

विजयादशमी शुभेच्छा

लेखक VRINDA MOGHE यांनी रविवार, 25/10/2020 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
कोवळी आंब्याची पानं विणली तोरणात, पिवळी, केशरी झेंडूची फुलं ओवली दो-यात! तयार केले भरगच्च तोरण, बांधले घराच्या दारात , आज दसरा ! विजयाची जाणीव जागते मनामनात !! आपट्याचं पानं सुवर्ण म्हणून वाटून परंपरा जपतो, अन् मैत्रीचा भाव एकमेकांच्या मनांत जागवतो !! सर्वांना आठवणीने शुभेच्छा देऊन आनंदीत करतो, छोट्या छोट्या अनेक गोष्टींनी नाती बांधून ठेवतो !!

बात हुई ही नही

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी रविवार, 25/10/2020 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
पिछली चांद की रात तो बरसी बहुत हम फिरभी अपनी तिश्नगी साथ लिये लौटे अजीब है ये वाक़या, मगर बात हुई ही नही दूर उफ़क की लकीर सुर्ख हो चली थी उनके आमद की खबर गर्म हो चली थी सुनते है वो आये तो थे कायनात पे छाये तो थे हम न जाने किस चांद की याद मे मसरूफ़ थे के बात हुई ही नही जो बात रात रात भर बारीशे करते है इस जमी से शायद आसमा के पैगाम हो इस जमी के नाम जैसे ऐसे ही वो बात जो हमे उनसे करनी थी रातें गुजरी मगर बात हुई ही नही ना चांद रुका ना उफ़क पंछि रुका और ना ही बारीशे रुकि रातें बिती, हा हमपे बिती मगर आखिर बात हुई ही नही |-मिसळलेला काव्यप्रेमी-| (२४/१०/२०२०) उफ़क = क्षितिज आमद = येण्या

एक तरी गज़ल अनुभवावी # ०२

लेखक अमर विश्वास यांनी गुरुवार, 22/10/2020 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
गालिब - गुलज़ार - जगजितसिंग या आधीचे भाग एक तरी गज़ल अनुभवावी - प्रस्तावना एक तरी गज़ल अनुभवावी # ०१ --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- होगा कोई ऐसा भी कि 'ग़ालिब' को न जाने शाइर तो वो अच्छा है पर बदनाम बहुत है एका गझलेत गालिब ने स्वतः विषयी लिहून ठेवलं आहे "गालिब" ला ओळखत नाही असे कोणी आहे का?

पाऊस...

लेखक श्रिया सामंत यांनी गुरुवार, 15/10/2020 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक आलास आणि सगळं काही चिंब करुन टाकलंस तु येशील याचा अंदाज होता खरंतर पण तरीही अवचितच आलास खिडकीच्या काचेतून पलीकडे बघत होते मी तुला कोसळताना आणि माझ्या लक्षात आलं की मी तर फक्त पाहतेय मी दुसरीकडे बघितलं तेव्हा मला तो दिसला पावसात भिजताना त्याला बघून माझ्याच डोळ्यात पाणी आल्याचं जाणवलं कडा ओलावल्या आणि मन पुन्हा आठवणींपाशी गेलं न भिजूनसुद्धा भिजवून टाकलंस तू ते म्हणतात ना बुंदे कुछ यूह गिरी की कुछ खयाल भिग गये पावसात भिजणारा तो आता दिसत नाहीये खाली मला आणि मी मगाशी लावलेले पडदे बाजूला सारले वीज चमकली आणि क्षणभर का होईना पण प्रकाशुन गेलं सारं YouTube वर स्वानंद किरकिरेंचं बावरा मन ला
काव्यरस

आणखी काय हवं?

लेखक Pratham यांनी बुधवार, 14/10/2020 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
मावळणाऱ्या दिवसाची संध्याकाळची वेळ वाहणाऱ्या वाऱ्यामुळे सरसरणारी पाने कडाडणारे ढग आणि चमकणाऱ्या विजा पावसाचे पाणी व मातीचा सुगंध बरसणाऱ्या थेंबाचा रपरपणारा आवाज गरम चहा बरोबर आवडते पुस्तक बोला आणखी काय हवं?

शब्द

लेखक VRINDA MOGHE यांनी सोमवार, 12/10/2020 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
*शब्द* शब्द देतात आनंद दुःखही देतात शब्दच, शब्दानेच मिळते वेदना त्यावर मलम होती शब्दच !! शब्दातून मिळते प्रेम माया हि होतात शब्दच, शब्दच नात्यांतला दुरावा, नवी नाती जुळवतो शब्दच !! ह्रदयातून यावा शब्द, साखरमाखला गोड गोड, भावनेने ओथंबलेला , काही नको त्यात तडजोड !! कधी मुके होतात शब्द, अन् बोलू लागतात डोळे, भाव मनीचे याचे त्याला, जातात समजून सगळे !! झाडं वेली, डोंगर दरी पक्षी बोलतात मधुर शब्द मोहवणारं निसर्गाचं हरेक रूप. तेथे मात्र सारंच निःशब्द !! होई सारंच निःशब्द !!! -©सौ वृंदा मोघे 15/1/2020

पाऊस

लेखक मका म्हणे यांनी सोमवार, 12/10/2020 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस मनातला पाऊस आठवणीतला पाऊस तुषारांचा पाऊस वळवाचा पाऊस कडाडणाऱ्या विजांचा पाऊस घनगर्द काळ्या नभाचा पाऊस सरींवर सरींचा पाऊस भरून वाहणाऱ्या नद्यांचा पाऊस खळाळत येणाऱ्या ओढ्यांचा पाऊस धबधब्यातून कोसळणारा पाऊस निसर्गात भरून राहिलेला पाऊस छत्रीच्या किनारीवरून ओघळणारा पाऊस भिजलेल्या कपड्यांच्या वासाचा पाऊस झाडाखाली थांबलेला पाऊस पत्र्यावर टपटपणारा पाऊस सर्द काडेपेटीतला पाऊस मिठालाही पाझर फोडणारा पाऊस पापडाला मऊ करणारा पाऊस चपलेतून पाय सटकवणारा पाऊस वस्त्रे उंचावून चालवणारा पाऊस ओले केस निथळणारा पाऊस कौलांवर शेवाळ पांघरणारा पाऊस डोळ्यातलं पाणी हलकेच मिसळून घेणारा

विश्वास

लेखक VRINDA MOGHE यांनी रविवार, 11/10/2020 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
*विश्वास* तो कोसळतो, सहस्त्रधारांनी अविरत अखंड आपल्याच नादात.. तीच्या डोळ्यातली वेदना...

शब्द

लेखक राजा सोवनि यांनी शुक्रवार, 09/10/2020 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द..... शब्द हा शब्द छोटा ,शब्दाला अर्थ मोठा शब्दच देती आसू, शब्दच देती हासू शब्दच उडवती खटका, शब्दच करवती सुटका शब्दाने वाढतो मान,शब्दाने जाते शान शब्दाने होतो खुलासा, शब्दाने मिळ तो दिलासा शब्दाने मिळते धैर्य , शब्दाने स्फुरते शौर्य शब्दाने मिळते भिक्षा, शब्दाने मिळते शिक्षा शब्दाने फुलते धाम,शब्दाने फुटतो घाम शब्दाने मिळते माया, शब्दाने प्रफुल्लित काया शब्दाने येते विरक्ती, शब्दाने होते भक्ती शब्दाने मिळते ज्ञान , शब्दाचे ठेवावे भान शब्दात असावी गहराई ,शब्दात आसावी नरमाई शब्द चांगले ठेवा टिपून ,शब्द वापरा जरा जपून शब्दावर द्यावे ध्यान, शब्द वापरा छान डॉ.राजा सोवनी

slow down

लेखक अमलताश_ यांनी शुक्रवार, 09/10/2020 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
एका क्षणाचा निळा डोह आकाशातून पाहिलेला. त्याच क्षणाचा अरुंद काठ. काठाच्या हिरवळीवरून डोहाच्या पाण्यात पाय खेळवत बसायचय , पावलांनी आकाशाचे तुषार उडवत. जरा थांब ना.... slow down . मला तो क्षण पकडू दे.