मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

स्मशानात जागा हवी तेवढी

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
स्मशानात जागा हवी तेवढी कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे? तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे? पुन्हा आज होऊ नये तेच झाले, कशा थांबवाव्यात वाताहती? हवेनेच केला जिथे कोंडमारा, तिथे प्राण जाणे टळावे कसे? तुझा पिंड आहेच विश्वासघाती, तसा एक अंदाज आहे मला तरी जीव गुंतून जातो तुझ्याशी, मनाचे पिसे कुस्करावे कसे? जरी सत्य तू बोलतो मान्य आहे, परी त्यास आहे कुठे मान्यता? सही आणि शिक्क्याविना व्यर्थ सारे, पुरावे तुझे मान्य व्हावे कसे? कशी एकटी हिंडते रानमाळी, जरी अर्धवेडी न भीते कुणा तिला फ़क्त भीती जित्या माणसांची, पशूंना तिने घाबरावे कसे?

चार छोटुल्या...

वैभव देशमुख ·
लेखनविषय:
१ ठसे वाटेत बैलांच्या खुराचे दिसे डबक्यातले पाणी चहाचे उठे पाण्यावरी गोरे तरंग कुणाचे घासले पाण्यास अंग २ हवेचा येइ हिरवागार झोका झुले त्याच्यासवे डोंगरही अख्खा कसे हे साठवू सौंदर्य डोळी बहरल्या डोंगरावर रानकेळी ३ धुक्याचा सारला परदा हवेने उभे डोळ्यात हिरवेगार लेणे कळेना काय डोळ्यांनी टिपावे कळेना ओठ कोठे टेकवावे ४ निळा अंधार होता दाटलेला पिकांचा वास ओल्याशा हवेला कमी ना भासली कुठल्या दिव्याची अशी झगमग बघितली काजव्यांची... - वैभव देशमुख

आठवणींच्या गाठी

रणजित चितळे ·
लेखनविषय:
आठवणींच्या जुन्या गाठी सोडवु, पुर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।। परत एकदा लहान होऊ, पुन्हा आपण वर्गात बसू। वह्या उलगडुन रोजच्या प्रश्नांना, मग्न व्यापातून उत्तरं लिहीताना। थोडं थांबुन वस्त जिवनात, हरवुन जाऊ स्नेह बंधनात। सर्व जगच जिथे शाळा, पुर्ण आयुष्य त्याचा फळा। जे मिळाले ते नशिब कोरले, जे गमावले ते हसुन पुसले। आठवणींच्या जुन्या गाठी सोडवु, पुर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।।

बोल कसा वागु................

शानबा५१२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती खुप खास असते,अत्यंत महत्वाची असते.कधी कधी जीवनात त्याच व्यक्तीकडुन ईतक्या ईतक्या अनपेक्षित प्रतिक्रीया/प्रतिसाद्,उत्तरे,टीपण्या येतात की वेड लागयची पाळी येते. ह्याच पार्श्वभुमीवर,एक कथा कथन करत आहे. मी तुला सर्वच दील, तुझ्याकडुन कधीच काही न मागता, तु ह्याला 'वासना' हे नाव दीलस, बोल कसा वागु मी शहाण्यासारखा? आपण रोजच भेटत होतो, एकत्र घरी जात होतो, थोड्या दीवसांनी तुला मला बघायचही नव्हत, बोल कसा वागु मी शहाण्यासारखा? तुला कोणीतरी त्रास देत होतं, मी त्याला चुकीची 'आठवण' करुन दीली, तु ह्याला 'गुंडागिरी' बोललीस, बोल कसा वागु मी शहाण्यासारखा? तुझ्या एका मैत्रीणीची अड

कलाकारी

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
कलाकारी
विशाल मनाच्या कॅनव्हासवर मी शब्दांचे चार फटकारे मारतो हळुहळु शिल्प तयार होते अन वेडी लोकं म्हणतात "व्वा! छान कविता करतो!"

हे स्वातंत्र्यदेवते!

उमेश कोठीकर ·
लेखनविषय:
हे स्वातंत्र्यदेवते, आज सालाबादाप्रमाणे, परत टाळ्या वाजवितांना.. तुला स्वतंत्र आकाशात फडकतांना पाहून, तुझ्या वाढदिवशी विचार येतोय्... काय वाटत असेल तुला? साठी ओलांडलीस तू, वय झाले तुझे, दृष्टी अधू झाली असेल तुझी..अश्रू ढाळून, बघून; झालेला रौरव नरक, या देशाचा, तुझ्या प्रतिष्ठापनेसाठी ते नंतरही...आजपर्यंत, अभिषेक सोसत आणि पाट पाहात...फक्त रक्ताचे! रक्त बालकांचे, आयांचे, बहिणींचे, मुक्यांचे, वेड्यांचे, गांधींचे, शांतीचे, मनाचे..... तुझे, का? का?

गगनावरी तिरंगा ....!!

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
काव्यरस
तिरंगा गगनावरी तिरंगा ....!! गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!! तू प्राण भारताचा, शक्‍ती ध्वजा-पताका संगे हिमालयाला येण्यास मार हाका समवेत घे सह्यांद्री, मेरूस ये म्हणावे ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!! साथीस ब्रम्हपुत्रा, गोदावरी नि यमुना धारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना कन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे ओलांडुनी नकाशे तू ब्रम्हस्थान घ्यावे ....!! तारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी ही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी आता अभय मनाच्या धुंदीस

मोरा मोरा नाच रे (बडबडगीत)

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
मोरा मोरा नाच रे (बडबडगीत) मोरा मोरा नाच रे अंकलिपी वाच रे वाचता वाचता बोल रे पृथ्वी कशी गोल रे गोल चेंडू उडला सुर्यावरती पडला कान त्याचा कापला म्हणून सुर्य तापला ऊन, हवा आणि गरम झाले पाणी पाणी गरम झाले वाफ़ होऊन आले सोडूनिया धरती वाफ़ गेली वरती आभाळात मगं तिचे झाले ढगं ढग वाजे गडगड वीज चमके कडकड वारा सुटला सो-सो पाऊस आला धो-धो मोरा मोरा नाच रे श्रावणाचा मास रे नाचता नाचता सारा फ़ुलवून दे पिसारा गंगाधर मुटे ...................................

आई - माझं जग

चिंगुसविकॄतजोशी ·
लेखनविषय:
काव्यरस
तुझ्या प्रेमळ स्पर्शाने सारा आसमंत कवेत येतो. आई, तुझ्या रागावण्याने जणु देवचं माझ्यावर रुसतो. तुझ्या कौतुकाच्या शाबासकीने आनंदाला पारावर उरत नाही. आई, तू उमेद दिल्यावर अशक्य असं काहीचं राहतं नाही. आई, तुझ्या कुशीत, मला मायेची ऊब मिळते. तू खेळ्वू लागल्यावर संध्याकाळही हसून बघते. तू गोष्ट सांगताना तारेही गोष्ट ऐकायला येतात. आई, तुझ्यासोबत असताना भीतीचे 'राक्षस'ही मला घाबरतात. तुझा प्रसन्न चेहरा बघुनचं माझ्या दिवसाचा सूर्य उगवतो. आई, तू नाराज असल्यावर वाराही घोंगावण्यास घाबरतो. मला महागडी खेळणी नको, भरजरी कपडे नको. हवा फक्त तुझा सहवास, तू भरवलेला गरम भाताचा घास. माझं जगं तुझ्यापासुन सुरु

गणेशा वंदन तुजला आता

पाषाणभेद ·
लेखनविषय:
काव्यरस
गणेशा वंदन तुजला आता गणेशा वंदन तुजला आता तुझ्या चरणी ठेवीतो माथा ||धृ|| कुशल बुद्धीचे दैवत तू रे आम्हां मुढास सुबुद्धी दे रे सुगम होवूदे गौळण वग कथा गणेशा वंदन तुजला आता ||१|| मुर्ती तुझी तुंदील तनू हासरी आनंदे भरती येई बघता नाचरी नृत्य गायने हरू दे रसीक व्यथा गणेशा वंदन तुजला आता ||२|| कला चौसष्ट चौदा विद्या पारंगत असशी विघ्नहर्ता सफल कार्य होई गण तुला अर्पीता गणेशा वंदन तुजला आता