Skip to main content

कविता

फ़ुलझडी..........!!!!

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 24/08/2010 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ुलझडी..........!!!! तो.... चार शिष्य,चार चेले, चार चमचे मागेपुढे चालायला, उदोउदो करायला कायम आपल्या दावणीला बांधून स्वत:च स्वत:विषयी लिहिलेले पोवाडे गाऊन घेतो त्यांचेकडून आणि एवढ्या शिदोरीच्या बळावर वाढवू पाहतो.... आपल्या श्रेष्ठत्वाच्या कक्षा......!! ते.... ते भक्तही तल्लीन होतात लोळवून घेत स्वत:ला त्याच्या चरणावर वारंवार त्याच्या पायाच्या धुळीचा मस्तकाच्या मध्यभागी टिळा लावत... होतात बेभान जणुकाही त्या चरणाखेरीज अन्य सर्वकाही निस्तेज,निष्प्रभ अशी स्वत:चीच मनसमजावणी करत... सदासर्वकाळ....!! क्षणिक का होईना पण चित्तवेधक ठरत असतेच फ़ुलझडी..........!!!! . .

बापं

लेखक चिंगुसविकॄतजोशी यांनी सोमवार, 23/08/2010 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
कधी रागाने फटकारलं, तरी नंतर समजूत काढणाराही तोचं असतो. त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी share करता याव्या असा best friend ही तोचं असतो. आपल्या वाईट संगतीबद्दल रागावणारा तोच असतो. पण चांगल्या friends सोबत जाण्याची मोकळीक देणाराही तोचं असतो. अपयशात धीर देऊन नवीन उमेद जागवणाराही तोचं असतो. आणि यशाच्या आनंदात आपल्या बरोबर नाचणाराही तोच असतो. आपल्याला स्वावलंबी व सक्षम बनवण्यास प्रयत्नशील असणाराही तोचं असतो. स्वतः उपाशी राहून आपल्याला जेवू घालणाराही तोचं असतो. जरी त्याला आईसारखी माया दाखवता येत नसली तरी मुलांच्या काळजीने पोखरला जाणाराही तोचं असतो. मुलांकडे कुणी वाकड्या नजरेने बघितले, तर मुलांचे
काव्यरस

गणित (पक्कं)

लेखक प्रा.विद्याधर घैसास यांनी सोमवार, 23/08/2010 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
गणित माझं पक्कं आहे. देण्यातले भागाकार ,घेण्यातले गुणाकार अधिक उण्यांचा हा व्यवहार , नित्य करतो निर्विकार. बेरजेत मी तरबेज आहे वजाबाकीत मी हात्चा आहे अधिक उण्याच्याच्या या व्यवहारात , मी मोठा लुच्चा आहे . गणिताकडून अगणिताकडे , जाण्याची मनी आस आहे विश्वरुपी कोड्याच्या , उत्तराचा ध्यास आहे. गणित जमलं उत्तर जमलं , ताळा काही जमेचना व्यवहारातला हत्च्चा , या गणितात रमेचना. ईश्वराच्या अस्तित्वाचं , गणित मग मांडून पाहीलं गुणाकार भागाकार अन् घनमुळाने , त्याचं मूळ शोधू पाहिलं . घननिळाचं घनफळ , गणितात त्या मावेचना भक्तीनं भरलेलं माझं मन , मन गणितात रमेचना.

माझा एक मित्र हरवलाय

लेखक अनुप्रिया यांनी रविवार, 22/08/2010 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
कृपया आंतरजालीय आथवा प्रत्यक्ष मैत्रीचा ह्या कवितेशी काहीही संबंध जोडू नये माझा एक मित्र हरवलाय मीच घातलेल्या पसा-यात एकदा चालत होतो रस्त्याने घालून हातात हात मधे खड्डा, खड्ड्यात मी हातातून सुटलेला हात इतकच आठवतय मला त्यानंतर दिसलाच नाही परत माहीत आहे मला आहे तो इथेच माझ्या आसपास पहातोय मला टपो-या डोळ्यांनी हसतोय गालातल्या गालात देतेय हा friendship band ---------XXXXXXXX------- त्याच्यासाठी म्हणाव रूसू नकोस ये परत परत नाही रे करणार असं नाही सोडून जाणार हात वाट पहातेय तुझी मी तुला तुझीच मैत्री परत करण्यासाठी !!! - सोनाली

इच्छा

लेखक चिंगुसविकॄतजोशी यांनी रविवार, 22/08/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांची सोनेरी किरणे कष्टांच्या दवबिंदूवर पडू दे. त्यातून उज्ज्वल यशाचे इंद्रधनु दिसू दे. कल्पनांच्या सागरी लाटावर स्वैरपणे स्वार होवू दे. त्यातून निसर्गाचे अनेक पैलू उलगडू दे. जिज्ञासेच्या पावसात नेहमीचं चिंब भिजून जाऊ दे. मनाच्या उत्तुंग भरारीला अगदी आकाशही कमी पडू दे. असेच काही माझ्या हातून घडुन जाऊ दे. त्या यशाने मायबापांच्या कष्टाचे पांग फेडू दे. अंतर्मनातील सुगंध गुलाबपरी सार्‍या आसमंतात दरवळू दे. ज्योतीप्रमाणे अखंड कार्य करण्याची सुबुद्धी लाभू दे. प्रेमाच्या व माणूसकीच्या प्रकाशाने सारे जग दिपून जाऊ दे. काय मागू तुजजवळ देवा... जे आहे त्यातचं समाधानी असू दे.

लपंडाव

लेखक kalyani B यांनी रविवार, 22/08/2010 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
देवा..... जिथ जाईल तिथ तुझ अस्तित्व आहे. तुला चुकवून लपाव ही माझी वेडी आशा आहे. म्हणूनच देवा तस करण्यासाठी मी गोठ्यात जाऊन लपलो, तर ३३ कोटी देव घेऊन गाय मला बघत होती... घरात जाऊन लपलो तर , माझी माय मला बघत होती... जिथ जिथ गेलो तिथ तिथ तुझ अस्तित्व होत... जिथ जिथ गेलो तिथ तिथ तुझ रुप मला हसत होत... म्हणूनच देवा मी हा लपंडाव सोडला आहे. तुझ अस्तित्व माझ्यासाठी प्रेमाचा आधार आहे...

स्पर्श

लेखक Bhushan11 यांनी रविवार, 22/08/2010 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्श वाटतं कधी कुणीतरी यावं नकळत पाठीमागून वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या पाठीवरून वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या केसातून वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या डोक्यावरून वाटतं कधी कुणीतरी यावं अन फिरवावा हात माझ्या चेहर्यावरून वाटतं कधी कुणीतरी यावं अन धरावा हात माझा आपल्या हातात वाटतं कधी कुणीतरी यावं अन पहावं माझ्या खोलवर डोळ्यात वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावा थोडा आपलेपणा वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावा थोडा लळा वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावा थोडा लडिवाळपणा वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळाव्या थोड्या गुददुल्या वाटतं कधी मिळावं थोडं सुख, मिळावं
काव्यरस

महा विडंबन स्पर्धा

लेखक आमोद शिंदे यांनी शनिवार, 21/08/2010 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एका चर्चेत एक महावाक्य वाचलं आणि लक्षात आलं की हा तर समस्त विडंबकांसाठी अफलातून कच्चा माल आहे. तेव्हा म्हंटलं आपणंच एक मिपावर छोटीशी स्पर्धा आयोजित करु. युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् || ह्या धाग्यावर जो ह्या महावाक्याचे सर्वात दर्जेदार बिडंबन करुन दाखवले त्याला ह्या आठवड्याचा बिडंबक पुरस्कार देण्यासाठी मी स्वतः सरपंचाकडे शिफारस करेन. तर लोकहो येउद्यात एक से एक विडंबने.

हायवे वरुन गाडी सरपटताना

लेखक माझीही शॅम्पेन यांनी गुरुवार, 19/08/2010 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
हायवे वरुन गाडी सरपटताना अगदीच शेजारच्या ट्रेकवरून तुझ्या आठवणींची झुळुक गेली माझ्या बंधनाचेही वायपर थांबवु शकली नाही पुढची सुरेल बरसात! प्रश्नाचे वादळ करू लागले तांडव स्टियरिंग अगदी घट्ट पकडून स्वता:ला काही नाजूक प्रश्न केले का होत आपल प्रेम होत खास ? कळेना सगळी उत्तर का फितूर झाली विचारांची एग्ज़िट तर केव्हांच मागे गेली आत डेकवर किशोरच गाण चालू होत दिल आज शायर है गम आज नॅग्मा है ! शब ये गझल है सनम....... --------------------------------------------------------------------------------------- शॅम्पेन (पूर्व-प्रकाशित)

कविता माझी होशील का ?

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 18/08/2010 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
कविता माझी होशील का ? भेटलीस तू अवचित मजला, प्रीतिचा नव वसंत फुलला, प्राजक्त होऊनी वसंतातले, कवनी माझिया बरसशिल का ? कविता माझी होशील का ? रिमझिम रिमझिम पावसातल्या, च्रोरून अपुल्या भेटीगाठी, आठवणीत त्या चिब होऊनी, कवनी ओलेती प्रगटशिल का ? कविता माझी होशील का ? काय जाहले गमे न मजला, आभासे तू ठायी ठायी, आभासांचे गंध होऊनी, कवना गंधित करशिल का ? कविता माझी होशील का ? सांगायचे मज बरेच काही, मनांत तुझिया तसेच विरले, उकलूनीया ती गुपिते सगळी , कवन सांगता करशील का ? निरंजन वहाळेकर
काव्यरस