Skip to main content

चार छोटुल्या...

लेखक वैभव देशमुख यांनी मंगळवार, 17/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
१ ठसे वाटेत बैलांच्या खुराचे दिसे डबक्यातले पाणी चहाचे उठे पाण्यावरी गोरे तरंग कुणाचे घासले पाण्यास अंग २ हवेचा येइ हिरवागार झोका झुले त्याच्यासवे डोंगरही अख्खा कसे हे साठवू सौंदर्य डोळी बहरल्या डोंगरावर रानकेळी ३ धुक्याचा सारला परदा हवेने उभे डोळ्यात हिरवेगार लेणे कळेना काय डोळ्यांनी टिपावे कळेना ओठ कोठे टेकवावे ४ निळा अंधार होता दाटलेला पिकांचा वास ओल्याशा हवेला कमी ना भासली कुठल्या दिव्याची अशी झगमग बघितली काजव्यांची... - वैभव देशमुख
लेखनविषय:

वाचने 2660
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

निळा अंधार होता दाटलेला पिकांचा वास ओल्याशा हवेला कमी ना भासली कुठल्या दिव्याची अशी झगमग बघितली काजव्यांची.. सुंदर ...! छान आहेत चौघीजणी .

मस्तच जमल्या आहेत ४ छोटुकल्या. काजवे पाहीले आहेत अनेक वेळा शेततळयापाशी पण असं लहिता यायला हवे,अभिनंदन

चारही छोटुल्या आवडल्या. (बालक)बेसनलाडू

निळा अंधार होता दाटलेला पिकांचा वास ओल्याशा हवेला कमी ना भासली कुठल्या दिव्याची अशी झगमग बघितली काजव्यांची... सुरेख... :)

उठे पाण्यावरी गोरे तरंग कुणाचे घासले पाण्यास अंग हायकूच्या जातीचा अनुभवचित्रांचा आविष्कार आवडला.

सुन्दर ! ! खुपच आवडल्या ४ छोटुकल्या ! ! !.

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद...