Skip to main content

कविता

अक्षय धन

लेखक निरन्जन वहालेकर यांनी सोमवार, 09/08/2010 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षय धन होतो आजवर रंक मी, प्रित तुजवर जाहली, अक्षयदौलत विरह वेदनांचि ईश्कांत मजला लाभली. राव सारे विश्वातले, गेले निष्कांचन मरणासवे, साथ नुरली संपन्नतेचि, रंक सगळे मृत्युसवे. ह्यापरी सामान्य आम्ही नव्हे अभिमान हा अंतरी दौलत अन्तिहि मजसवे धनवान मी सरणावरी निरंजन वहाळेकर

कुंडलीने घात केला

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 08/08/2010 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
कुंडलीने घात केला कसा कुंडलीने असा घात केला दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला असे वाटले की शिखर गाठतो मी अकस्मात रस्ता तिथे खुंटलेला विचारात होतो, अता झेप घ्यावी तसा पाय मागे कुणी खेचलेला खुली एकही का, इथे वाट नाही हरेक पथ येथे कुणी हडपलेला? पटू संसदेचा, तरी दांडगाई म्हणू का नये रे तुला रानहेला? दिशा दर्शवेना, मती वाढवेना कसा मी स्विकारू तुझ्या जेष्ठतेला? "अभय" चेव यावा अता झोपल्यांना असे साध्य व्हावे तुझ्या साधनेला गंगाधर मुटे ................................................... (वृत्त-भुजंगप्रयात)

रानवाटा शोधतांना

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/08/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
रानवाटा शोधतांना रानवाटा शोधतांना हरवले माझे मन ||धृ|| हरवले मीच मला, गेलो तुला सापडून सोनसकाळी एकेदिनी | एकांती रानीवनी नजरेच्या टापूमधे | अथांग निळे पाणी डोळा हलकेच दिसे | मुर्ती साजरी छान ||१|| गंध शोधीत जाता | रुप समोर येई वाटेतून चालतांना | शब्द सलज्ज होई अलगद थरथर | ओठी आली दिसून ||२|| चालतांना दशदिशा | मला न उरले भान आभाळाने धरतीस | दिले भरून दान सावलीत उन्हाच्या | तळपती जिव दोन ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०७/०८/२०१०
काव्यरस

जेजूरी गडावर नांदे मल्हारी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/08/2010 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
देवा तुझी सोन्याची जेजूरी जेजूरी गडावर नांदे मल्हारी देवा तुझी सोन्याची जेजूरी ||धृ|| देव बसलाय उंच गडावर चला जावू चढू पायर्‍या हजार गडकोट बांधला करण्या संरक्षण वेशीतून जावू घेवू देवाचं दर्शन बेल भंडारा उधळूनी बोला यळकोट यळकोट जय मल्हारी देवा तुझी सोन्याची जेजूरी ||१|| देव हा खर्‍या शुरांचा राजा शिवाजी, मल्हाररावांचा पराक्रमी उमाजी नाईकांचा गोरगरीब रयतेचा मेंढरासंग धनगरांचा अशा देवाची करू वारी देवा तुझी सोन्याची जेजूरी ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०७/०८/२०१०
काव्यरस

गण: वंदन करीतो गजाननास

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/08/2010 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
गण: वंदन करीतो गजाननास यावे गणास गणपती आज नमन करीतो आम्ही तुम्हास रसीक जमले तुमचा भास होवूद्या गौळणवग खास वंदन करीतो गजाननास ||धृ|| कार्यारंभी वंदन करूनी गणास आळवी शुभशकूनी हाती घेतली डफतुणतूणी द्यावा आशिर्वाद आम्हास वंदन करीतो गजाननास ||१|| सरस्वतीचे लेणं लिहूनी गान मंदिरी गाणं गावूनी नम्र होवूनी तिजला वंदूनी विनवितो बुद्धी देवीस वंदन करीतो गजाननास ||२|| कला आमची रसीका दाखवाया भाग्यवंत पुण्यवंत आम्ही ठराया लवकर येवूनी आम्हास पावा गणात नित भजतो तुम्हास वंदन करीतो
काव्यरस

सामर्थ्यवान

लेखक चिंगुसविकॄतजोशी यांनी शनिवार, 07/08/2010 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
घट्ट काळोखातून वाट काढत प्रकाशाचा पाठलाग करणारा मी आहे. अथांग सागरातून बुडी मारुन अनमोल मोती मिळवणारा मी आहे. अवघं आसमंत माझ्या मुठीत बंदिस्त करु शकणारा मी आहे. स्वतःच्या तेजाने सूर्यालाही झाकोळून टाकणारा मी आहे. माझी गती एवढी प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करणारा मी आहे. मुठीत आहे माझ्या सामर्थ्य... दुनियेला चकीत करणारा मी आहे. तल्लख बुद्धीच्या जोरावर सार्‍या जगावर अधिराज्य गाजवणारा मी आहे. नवनवीन संशोधन करुन निसर्गाचे गुपित उलगडणारा मी आहे. स्वतःच्या स्वप्नातलं छोटसं घरं चंद्रावर बांधणारा मी आहे. माझा प्रभाव इतका वाहत्या पाण्याला थांबवणारा मी आहे. कोणत्याही परिस्थितीत खचुन न जाता पर्वता
काव्यरस

लख्ख

लेखक अर्धवट यांनी शनिवार, 07/08/2010 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
लेकराला मायेच्या ह्या मायेची तहान मायेनेच दिला सूर, उजळाया रान आजीच्या कवतिकाचा सोनियाचा तोडा, आईच्या पदराचा आधारही थोडा मायेच्या गावाला या नाहीच किनारा मऊशार पंखाखाली साजिरा निवारा. थोडी आभाळात आता नवी दिशा दिसे. नव्या क्षितिजाचे मला लागलेले पिसे. नव्या नव्या पंखाना या भरारीची आस कधी स्वच्छ सूर्य, कधी ससाण्याचा भास खोलखोल दरी आणि माणसे निश्चेत प्रेमानेच सावरले पुन्हा घेऊन कवेत मायेनेच दिले लख्ख, मायेनेच प्राण मायेचाच ठेवा आता, नाही काळा क्षण.
काव्यरस

(चटेपटेरी चड्डीचा हा दोष असावा)

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 07/08/2010 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच मिपावरच्या पौगंडी विचारसरणीच्या लेखनाची परखड टीका केशवसुमार यांनी एक समर्थ विडंबन लिहून केली. ती वाचून शब्दांच्या गुणसूत्रांचाच दोष वगैरे कारणं देण्यापेक्षा तसल्या लेखकांनी आत्मपरिक्षण करावं असं आम्हाला वाटलं. (ते लोकांनी करण्याआधी आपणच केलेलं बरं, नाही का? कारण काही काही वेळा सिगार हा फक्त सिगार असतो) त्यातून या स्वडंबक कवितेचा जन्म झाला. प्रेरणा अर्थातच अभ्यंकरांची उत्तम कविता.
काव्यरस

(हा रात्रीच्या जागरणाचा दोष असावा)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 06/08/2010 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्धची 'हा शब्दांच्या गुणसूत्रांचा दोष असावा' ही गजल वाचतात आमच्या विडंबनाच्या गुणसूत्रांच्या दोषाने लगेच डोके वर काढले नसते तरच नवल, ईर्षाद!
काव्यरस

हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी शुक्रवार, 06/08/2010 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा स्वप्नलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा कधीतरी झाडांची भाषा मला कळावी कधीतरी मज अबोल चाफाही उमजावा जन्म-मरण ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये जगण्याचा सारांश कसा सांगा बसवावा युगे बदलली काळ बदलला अरे विठ्ठला एक आयडी ट्विटरवर तूही उघडावा किती खोल मी अजून जावे मनात माझ्या कधीतरी तळ मला अता त्याचा लागावा उगाच चर्चा मी तेव्हा केली माझ्याशी चुकले माझे अखेर हा निष्कर्ष निघावा अता एकदा संपावी काव्याची वेणा मेंदूमधला शब्दांचा दंगा थांबावा