Skip to main content

कविता

मैत्रीण

लेखक कमलेश पाटील यांनी बुधवार, 11/08/2010 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी शाळेत तुझी झाली भेट; एक नवी मैत्रीण म्हणून; जगण्याच्या संकल्पनाही न कळल्या तेव्हा; तुझा हात धरला आधार म्हणून. या माणसांच्या बाजारात; मला सगळंच अनोळखी वाटायचं; तुझं माझं मैत्रीच नातच फक्त; मला माझ हक्काच वाटायचं. तारुण्यातल्या नवथर गोष्टी; आपण एकमेकींना सांगत गेलो; आपल्या मैत्रीच्या विश्वात रमताना; क्षणाक्षणाला वाढत गेलो. सप्तपदी चालताना सुद्धा; माझी नजर तुलाच शोधितं होती; मनात होतो हुरहुर नव्या जोडीदाराची; पण तुझी नजर मात्र आश्वासक होती. रमत गेले मी ससांरात नकळत; तुझ्या पासून अस्तित्वाने मी दूर झाले; पण तुझ्या मैत्रीची ओढ इतकी की; तुझ्या आठवणींचीच मी मैत्रीण झाले. आ
काव्यरस

पाऊस

लेखक उमेश कोठीकर यांनी बुधवार, 11/08/2010 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
भेगाळ या धरेच्या, शिरतो तनात पाऊस मृदगंध भिनवितो, हसतो फुलांत पाऊस हिरवाच ढंग सगळा, हिरवी वसुंधरा ही हिरवेच कोंब येती, हिरव्या दिशांत पाऊस का आस ही फिटेना, का चिंब मी भिजेना? ही भूक जागवितो, कसली तनात पाऊस? हा मोर का विभोर, अतृप्त का चकोर? हे थेंब आठवांचे, स्त्रवतो मनात पाऊस भिजवून यौवनाला, कटी चिंब हा अकार जणू थाप ही मृदंगी, देतो दिलात पाऊस बरसून रेशमी हा, सुख गार गार देतो मनशिंपलीत माझ्या, शिरतो क्षणात पाऊस हे अर्घ्य सागराचे, वरदान हे प्रभुचे हा साद नित्य देतो, वसतो नसांत पाऊस

मुकी असेल वाचा

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 11/08/2010 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मुकी असेल वाचा कसा वाजवू टाळी, मी देऊ कशी दाद? पहिला चेंडू छक्का, दुसर्‍या चेंडूत बाद तुझे-माझे जमले कसे, करतो मी विचार भाषा तुझी तहाची, मला लढायचा नाद विसरभोळा असे मी सांगतो वारंवार भूल पडते देणींची, घेणे असते याद सरकारी खजिन्यावर मारून घ्यावा हात चिरीमिरी दिली तरी मिटून जाईन वाद "अभय" तुझे ऐकुनिया तो चिडला असेल; पण, मुकी असेल वाचा तर देणार कशी साद? . गंगाधर मुटे ………………………………………………

आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 11/08/2010 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली जास्वंदीचा रंग करा ग सख्यांनो रंग खेळू चला ग लाल रंग लावा गाली त्या रंगाची चढली लाली आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली ||धृ|| काढा ग काढा तिला घराबाहेरी ओढा ग ओढा तिला करा बळजोरी घ्या हाती रंग ओला नेम धरूनी मारा पिचकारी आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली ||१|| फेर धरूनी नाचू आता हात हाती धरू चला रंगाने माखू सार्‍या आज अंगरंगांची ओळख झाली आली गं आली होळीपुनवेची रंगपंचीम आली

जीणं

लेखक अमोल मेंढे यांनी मंगळवार, 10/08/2010 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
कुणीही येतं आणी ... भुकेलेल्याला अन्न मिळावं असं तुटुन पडतं... कुस्करुन जातं... पन्नासची नोट अंगावर फेकुन... त्याच्या प्रेमात मी पडले... अन् ... पळुन आले त्याच्या बरोबर... राजा राणीच्या सुखी संसाराच्या अपेक्षेत... पण शेवटी राजानेच राणीचा घात केला... आणी फक्त दहा हजारात माझा सौदा झाला... सुरुवातीला वाटायचं ... असल्या जीण्यापेक्षा.. आत्महत्याच करावी... पण आता सवय झालीय... अन् कालची सीता.. आजची सितारा म्हणुन बाजारात उभी राहलीय... तेव्हापासुन गल्लीत उभं राहुन... गिर्‍हाईकांची वाट पाहणं... आणी स्वत:ला कुस्करुन घेऊन... त्यांचं समाधान करणं... हेच आमचं जीणं.... हेच आमचं जीणं...
काव्यरस

घराकडे येताना मला काल पावसाने गाठले.......

लेखक गुपचुप यांनी मंगळवार, 10/08/2010 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
घराकडे येताना मला काल पावसाने गाठले, जोरदार होता पाउस, सगळीकडे तळे साठले....! भिजत-भिजत जात होतो घराकडे...तेवढ्यात आवाज दिला कोणी, वळून बघता मागे, दिसली आमच्या कॉलेजची xyz...! जिच्यावारती झुरत होतो, जी देत नव्हती मला भाव, तिने साद घालून काळजावरती केला 'प्रेमळ' घाव...! तीही होती भिजलेली, अंगात थंडी भरलेली, लाल पंजाबी ड्रेस, अन् त्यावर matching लिपस्टिक लावलेली...! "भिजत कशाला जातोस...?

प्रेम कस असाव ?

लेखक गुपचुप यांनी मंगळवार, 10/08/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम कस असाव ? क्षमाशील धरती सारख, विशाल आकाशासारख, लांबवर पसरलेल्या सागरासारख... ! प्रेम असाव आईच्या हृदयासारख, सगली दुःख सहन करूनही दुसर्यासाठी आणखी सुखाची अपेक्षा करणार...! वास्तवतेच्या आगीत होरपळून निघालेल्या तुमच्या मनाला सुखाचा, आनंदाचा ओलावा देणार... ! दिसत तस नसत, प्रेम ही असच असत, न कळत हृदयात घुसत, न जाण्यासाठी घर करून बसत.

चंद्रकोरीपरी कोवळें हासणें.... वसंत बापट

लेखक शरद यांनी मंगळवार, 10/08/2010 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रकोरीपरी कोवळें हासणें कोणत्या कवीने आपल्या प्रेयसीचे वर्णन काव्यात केले नाही ? सर्व काव्यालंकारांचा उपयोग खरे तर त्यासाठीच. ( सुवर्णालंकार परवडत नाहीत म्हणून म्हणून तर कवींनी उपमा-उत्प्रेक्षा यांना काव्यालंकार असे गौरवावयास सुरवात केली नाही ना ? प्रियेला अर्पण करावयास खिशाला चाट नाही) तरीही प्रत्येक कवी वर्णनात आपली खासियत दाखवावयाचा प्रयत्न करतोच.

आईचं छप्पर.

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 10/08/2010 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
आईचं छप्पर. कडाक्यात भांडतात मेघ गडगड करून भरून येते नभाला अश्रू ढाळते वरूण ...! अश्रू बनती गारा वादळ तांडव करी गारठल्या हवेसवे विजेस हिंव भरी ...! हिंव भरल्या विजेस ताप चढवी गारा तिला पांघराया छप्पर नेतो वारा ...! छप्पर उडल्या संसारात ब्रम्हपुत्रा वाहते तेल मिरची शिदकुट पाण्यावरती पोहते ....! पोहतांना पुस्तक वही सरस्वती भिजते माती करून जीवाची चूल उल्हे निजते ....! गरजत्या पावसात चोळी झबले न्हाती पदराखाली लेकरं कवटाळती छाती ....! ...गंगाधर मुटे.. . ( शिदकूट = मोजक्या काळासाठी पुरेल एवढी अन्नसामग्री) ( उल्हा = एकप्रकारची कच्च्या मातीची चुलच पण लाकडा ऐवजी कोळशाचा जाळ घालत
काव्यरस

नकोना नकोना आता नकोना

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 10/08/2010 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
नकोन नकोना आता नकोना तो: ऐ ये ना ती: अंहं नकोना, नकोना तो: नकोना नकोना आता नकोना ||धृ|| ती: अवेळी या वेळी तू सतावी मला इथे नाही कुणी आवर स्व:ताला तो: नको करू बहाणे का छळशी मला छळण्याचा खेळ बरा जमतो तूला तू जवळ ये अथवा मला जवळ घे ना ||१|| ती: अंहं नकोना
काव्यरस