चंद्रकोरीपरी कोवळें हासणें.... वसंत बापट
चंद्रकोरीपरी कोवळें हासणें
कोणत्या कवीने आपल्या प्रेयसीचे वर्णन काव्यात केले नाही ? सर्व काव्यालंकारांचा उपयोग खरे तर त्यासाठीच. ( सुवर्णालंकार परवडत नाहीत म्हणून म्हणून तर कवींनी उपमा-उत्प्रेक्षा यांना काव्यालंकार असे गौरवावयास सुरवात केली नाही ना ? प्रियेला अर्पण करावयास खिशाला चाट नाही) तरीही प्रत्येक कवी वर्णनात आपली खासियत दाखवावयाचा प्रयत्न करतोच.
मिसळपाव