सुखाचे स्वागत...
लेखनविषय:
- Read more about सुखाचे स्वागत...
- १ प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
दारात थबकलेल्या सुखाचे
ये म्हणून स्वागत केले ;
उत्साहाने उंबरठयावर
पाऊल त्याने ठेवले !
आत येता येता
सुख..तिथेच घुटमळले
कुणास ठाऊक काय झाले ?
सुखाचे पाऊल अडखळले !
पाठीशी वळून जरा
मी डोकाऊन पाहिले-
तेव्हा कुठे माझ्या
सारे लक्षात आले !
एवढे मोठे माझे घर
दु:खानेच भरले-
सुखाच्या बोटालाहि
स्थान नाही उरले !!