Skip to main content

गौळण: असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 08/09/2010 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
गौळण: असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा
असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा उगा खोड्या काढी मज सोड ना ||धृ|| गोड बोलणे तुझे लाघवी यमुनातीरी वेणू वाजवी करशी मग तु रे बळजोरी मीही सांगे यशोदेला तुझा खोटा गुन्हा ||१|| दह्यादुधाचे विरजण लावले लोणी सारे विकण्या निघाले वाट अडवण्या आडवा येई उपकार कर माझ्यावरती आता जावू दे ना ||२|| तुझ्या रुपात एकरूप झाले माझे मी पण हरवून गेले उरला नाही भेद कसला कोण गौळण कोण कान्हा ओळखू येईना ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०८/०९/२०१०
काव्यरस

वाचने 2705
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया