भारत माझा देश आहे...........
लेखनविषय:
धन्य माझा भारत देश, आणि धन्य इथले लोक
दुसरयाला लावतात ठिगळं, पण स्वतःच्या खिशाला भोक
तूरडाळ भिडली गगनाला, सिमकार्ड फुकट गावतंय
ह्यांच्या बापसाची स्वप्नपूर्ती, पोरांचं उगाचंच फावतंय
ए.सी. शोरूममध्ये, पायीची वहाण ,बसली शेल्फावरी,
फळं आणि भाज्या, आजही बसलेत, विकत रस्त्यावरी.. कारण..
पिइझा पोचतोय वेळेत पण पोलिस येतात लेट
कारण त्यांचा कोणीच ठरवला नाही, वेळेत येण्याचा रेट
तंत्रद्यान पोचले घरोघरी, मोबाईलमध्ये टी.व्ही. अन नेट
घरच्यांसाठी वेळ नाही पण विसरत नाहीत क्रिकेट... कारण...
कार मिळते स्वस्तात, शिक्षणाच्या खर्चात होतो गार.
जाती जागा अडवतात, एडमिशनसाठी मारामार,
इथेच खाता,इथेच शिक्षण, परदेशाची नोकरी
इथेही परके , तिथेही परके, कायमची लाचारी... पण....
निम्मि जनता अर्धपोटी तरी, मंत्र्याच्या वाढदिवसाला नोटांच हार.
लोकशाहीचे दलाल सारे, खायला काळ आणि भुईला भार
यांनीच आधी झाडं तोडली, आता बघा यांचा शासकीय विचार
मग पुतळे झाले गल्लोगली, खरं आहे.. साली आपल्या देशात कबुतरंच फार... पण...
सगळं माहीत आहे जगाला, आंधळी आमची न्यायदेवता,
दीड वर्षं, कित्येक कोटी, अतिरेकी तो, कीड पोसता
दिसूनसुद्धा आंधळे, बहिर्यांचे सुद्धा कानावर हात,
तोंड ठेवतात झाकून, साली तीन माकडांची जात
वळत तर काहीच नाही पण सगळच यांना कळतंय
ओरडून कोणी सांगत नाही, पण आत काहीतरी जळंतय....पण आत काहीतरी जळंतय....
पण तरीही......
धन्य माझा भारत देश, आणि धन्य इथले लोक
धन्य माझा भारत देश, आणि धन्य इथले लोक
वाचने
7401
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
संदीप परांजपे जरा डोळे उघडून
काही दिवसांनी चीन माझा देश
In reply to काही दिवसांनी चीन माझा देश by मदनबाण
GOD KNOWS !!!!!!!! एक स्वैर
काही दिवसांनी चीन माझा देश
अतिशयोक्तीची हद्द झाली ही.
In reply to अतिशयोक्तीची हद्द झाली ही. by मदनबाण
सहमत.... साले हे मिचमिच्या
In reply to सहमत.... साले हे मिचमिच्या by विसोबा खेचर
बघून घ्यायचा मंजी नक्की काय
ज्या देशात कायदा आणि न्यायव्यवस्थेची
In reply to ज्या देशात कायदा आणि न्यायव्यवस्थेची by Arun Powar
शोर्ट मध्ये बोला ना कि भारत
मिपावर सध्या चिनोफोबिया पसरला
In reply to मिपावर सध्या चिनोफोबिया पसरला by परिकथेतील राजकुमार
चिंता या शब्दाची व्युत्पत्ती
In reply to मिपावर सध्या चिनोफोबिया पसरला by परिकथेतील राजकुमार
चिंता या शब्दाची व्युत्पत्ती
In reply to मिपावर सध्या चिनोफोबिया पसरला by परिकथेतील राजकुमार
लवकरच गेट्स , वारेन , चीनला