धन्य माझा भारत देश, आणि धन्य इथले लोक
दुसरयाला लावतात ठिगळं, पण स्वतःच्या खिशाला भोक
तूरडाळ भिडली गगनाला, सिमकार्ड फुकट गावतंय
ह्यांच्या बापसाची स्वप्नपूर्ती, पोरांचं उगाचंच फावतंय
ए.सी. शोरूममध्ये, पायीची वहाण ,बसली शेल्फावरी,
फळं आणि भाज्या, आजही बसलेत, विकत रस्त्यावरी.. कारण..
पिइझा पोचतोय वेळेत पण पोलिस येतात लेट
कारण त्यांचा कोणीच ठरवला नाही, वेळेत येण्याचा रेट
तंत्रद्यान पोचले घरोघरी, मोबाईलमध्ये टी.व्ही. अन नेट
घरच्यांसाठी वेळ नाही पण विसरत नाहीत क्रिकेट...