आयुष्यातील वळणे....
आयुष्यातील वळणे,
कधी पाऊस, कधी जळणे...
काही नाती ओली-हळवी-
काही फक्तं दळणॆ !
कित्ती सारे मोसम आलेले,
भोगलेले, क्वचित – उपभोगलेले...
काही फुले फुललेली तनात –
काही करपून गेलेले !
तरी पण पुढच्या क्षणात,
क्षणातील एक-एक कणात...
खूप काही जपण्याचे –
पण मनातल्या मनात !
आयुष्यातील वळणे,
कधी पाऊस, कधी जळणे...
काही कोडी सुटल्यासारखी, अन..
काही कधीच न कळणे...
कधीच न कळणे !!!
वर्गीकरण
कविता आवडली
In reply to कविता आवडली by बेसनलाडू
+१
छान आहे