Skip to main content

रिमझीम रिमझीम...पाउस आला

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 27/09/2010 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
रिमझीम रिमझीम...पाउस आला


हं...अं.....हं...अं....
हं...अं.....हं...अं....
रिमझीम रिमझीम...रिमझीम रिमझीम
रिमझीम रिमझीम...रिमझीम रिमझीम
पाउस आला...
पाउस आला ||

झाडावरती पक्षी गाती
हिरव्या वेली वरती जाती
नाचाला ताल देवून
आनंद घेवून आला पाउस
आनंद घेवून पाउस आला ||

सुर्यकिरणे वर चमचम करती
दुत रवीचे इंद्रधनू रेखीती
आकाशात बघा उंच एकदा
पडले उन असूनी धारा ||

गरगर फिरूनी ओली झाले
आभाळातूनी मोती आले
भिजल्या अंगी शिरशीर ओली
थेंब ओठी नकळत गेले ||

हं...अं.....हं...अं....
हं...अं.....हं...अं....
रिमझीम रिमझीम रिमझीम रिमझीम
रिमझीम रिमझीम रिमझीम रिमझीम
पाउस आला...
पाउस आला ||

- पाषाणभेद (दगफोड्या)
२७/०९/२०१०

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1277
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मस्त मस्त !!! पाषाणाला पाझर फुटला म्हणायचा...!!!


मस्त मस्त !!! पाषाणाला पाझर फुटला म्हणायचा...!!!