निसर्गाची भाषा

शुचि जे न देखे रवी...
आई फक्त माणूसच बोलू शकतो का? नाही बाळा, सारी सृष्टी बोलते आपल्याशी ऐक जरा. फक्त भाषा भिन्न असते. ____ चंद्राची भाषा चांदणे, सूर्याची भाषा रवीकिरणे वार्‍याची भाषा झुळकेची, समुद्राची अलवार गाजेची ||१|| पिंपळवृक्षाची सळसळ, नदीनाल्यांची खळखळ सार्‍यांचे मन उमगेल तुला, स्तब्ध शांत करशील मना||२|| कमळ बोलतसे उमलण्यामधुनी, मधमाशी ती कष्टांमधुनी पहाड बोले अचलपणांतुनी, नभ ते त्याच्या पोकळीतुनी||३|| मौन होउनी संवाद साध बघ, आकळेल निसर्ग तुला सार्‍यांचे मन उमगेल तुला, स्तब्ध शांत करशील मना||४||
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

5 टिप्पण्या 1,723 दृश्ये

Comments

अथांग नवीन

सुरेख कल्पना! आपल्य रोजच्या धबडग्यात हे निसर्गाचे शब्दं/भाषा निसटतच जातात नाही का, आपल्या जाणीवेतुन?

स्पंदना नवीन

सुं सुं बोले वारा , भरे आसमंत सारा, आहे ॐ काराचा नारा, सार्‍या विश्वामध्ये ...!! सुन्दर शुची, कुणाला मुलीला सांगते आहेस?

शुचि नवीन

In reply to by स्पंदना

>> सुं सुं बोले वारा , भरे आसमंत सारा, आहे ॐ काराचा नारा, सार्‍या विश्वामध्ये ...!! >> सुंदर!!!! हो ग मुलीला सांगतेय :)