Skip to main content

शेत माझं सारं वाहून गेलं

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 27/09/2010 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
शेत माझं सारं वाहून गेलं

औंदाच्याला पानी आसं पडलं पडलं शेत माझं सारं वाहून गेलं ||धृ|| पानी घेवूनीया आलं माझ्या डोळा पानी साचून राहीलं सारं रानी वाहून गेलं डोळ्यातूनी हातातलं पीक सारं त्यात बुडून गेलं ||१|| कशी फुलल आता शेती? कशी पिकलं आता माती? नाही चूल आता पेटणार भुक पोटाची कशी मारणार? रातंदिस बसतो पोटाला फडकं बांधून ||२|| कशासाठी देवा तू रे पाउस इतका पाडतो? नशीबाने दिले पिक तु आता का बुडवीतो? वेळेवर न येवून अवेळी आभाळं फाटलं ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २७/०९/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 874
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया