तोरण मरणाचे
लेखनविषय:
काव्यरस
नोट :मूर्ख या कर्नलतपस्वी यांच्या कवितेला रिप्लाय देताना हि कविता लिहिली गेली.. या कवितेचे श्रेय त्यांना आणि त्या मुळ कवितेलाच..
---
.
आयुष्याच्या क्षितिजापाशी
भावनांचा उडतो कल्लोळ..
मागे जीवनाचे सैल धागेदोरे
अन पुढे असते तोरण मरणाचे
पक्षी उडून जातात घरट्यात
अन स्तब्धता उरते मागे...
हसत दिवस जातो खोटाच अन
मग रात्र सावरण्यास येते..
प्रकाश शोधण्या जीवन संपते
अन क्षितिजावरती कळते शेवटी
अंधार असतो खरा सोबती
तोच सुरुवात..अन तोच शेवट..
- शब्दमेघ, मुक्त..स्वैर..स्वछंदी..जीवन
२१-०२-२०२१
वाचने
4329
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
लिहित रहा, वाचत आहेच.
हसत दिवस जातो खोटाच अन
काय चाललंय काय आज.. दिवस भारी
कविता आवडली.. . छान लिहिलीये.
अंधार असतो खरा सोबती तोच सुरुवात..अन तोच शेवट..
सर्वांचे मनपूर्वक आभार..
व्वा, व्वा....
खूपच छान कविता
प्रतिसाद