प्रोफाइलवरती बाई..!!
लेखनविषय:
(टीप: अनाहितांची साष्टांग माफी मागून)
प्रोफाइलवरती बाई
अशि काही दिसते धासू
तो फोटो पाहुन येती
झुंडीने चावट वासू
कुणी भोजनपृच्छा करतो
कुणी थेट घालतो डोळा
बाईच्या भवती जमती
भुंगे सतराशे सोळा
बाईचे आशिक मुबलक
कुणि पुतण्या तर कुणि काका
रंगेल एकसे एक
बाईस मारिती हाका
मेसेज पटापट येती
गालात हासते बाई
पाहता गड्यांची गर्दी
तिज हसू अनावर होई
ती विचार करुनी लिहिते,
पुसते, -अन पुन्हा लिहिते
ते 'टायपिंग..' दिसताच
वासूंचे भान हरपते
डोळ्यात प्राण आणूनी
व्याकूळ पाहती वाट
कंठाशी येती प्राण
वासूंची हालत 'ताठ'
दो अशाच घटका जाती
मग 'टिंग!' वाजतो फोन
वासूंच्या टोळ्या येती
तो वाचण्यास धावून
उघडता फोनचा पडदा
बाईचे उत्तर दिसते
मितभाषी ती मुलखाची
'Hmm' इतुकेची लिहिते!
गर्दीचा पोपट होतो
पण उसने घेती हासू
आशेला नसते मरण
वासू जातीचे वासू!!
वाचने
8429
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
=))
मस्तच जमली आहे.
In reply to मस्तच जमली आहे. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
:-)
भारीच!
जबरदस्त !!
In reply to जबरदस्त !! by बाजीगर
:-)
'आचरट' रस.
In reply to 'आचरट' रस. by चित्रगुप्त
:)
In reply to :) by चलत मुसाफिर
टायपो
भोजनपृच्छा
In reply to भोजनपृच्छा by चलत मुसाफिर
J1 jhal ka
In reply to J1 jhal ka by तुषार काळभोर
अगदी अगदी..
In reply to अगदी अगदी.. by गवि
वा!
मस्तच कविता
In reply to मस्तच कविता by विवेकपटाईत
धन्यवाद
हा हा हा. मिस झाली होती ही
In reply to हा हा हा. मिस झाली होती ही by गवि
पुनर्जन्म
कवितेचे पुनरागमन वा पुनर्जागरण कसे झाले
In reply to कवितेचे पुनरागमन वा पुनर्जागरण कसे झाले by चित्रगुप्त
धन्यवाद
कविता आवडली. कशी काय मिस्
In reply to कविता आवडली. कशी काय मिस् by वामन देशमुख
धन्यवाद
In reply to कविता आवडली. कशी काय मिस् by वामन देशमुख
कविता आवडली. कशी काय मिस् झाली होती बुवा?
In reply to कविता आवडली. कशी काय मिस् झाली होती बुवा? by चांदणे संदीप
:)