कविता
माझं गाव
माझं गाव
याहो याहो पाव्हने तुम्ही; या हो माझ्या गावाला
वाहता ओढा ओलांडा; तेव्हा गाडी लागेल शिवेला
वेशीवरती आहे मारूतीचे मंदिर
दर्शन घ्या त्याचे; मुर्ती पुरातन सुंदर
थोडं पुढं या; तुम्हाला लागेल बावडी
वेशीतून शिरा आत; तिच्यावर आहे चावडी
डाव्या हाताला ईमारत नवी कौलारू
ग्रंथालय अभ्यासिका तेथे सुरू; तुम्ही बोला हळू
बँक अन व्यायामशाळा ती बघा समोर
पोरं खेळतात कब्बडी; ते गावाचे मैदान
या की जरा पुढे; पहा दवाखाना सरकारी
पंचक्रोशीचे रुग्ण इथं येती होण्यासाठी बरी
इथून पुढं लागेल माळी गल्ली, शिंपी आळी
फाल्गूना
काव्यरस
मोर्गे सेहर - हे बुलबुलांनो उठा !
हा फोटो टाकला आणि खालचे लिहिले ! या दोन्हीचा संबंध आहे का ? माझ्या मनात निश्चितच आहे.
का कोणास ठाऊक बुलबुल बघितला की मला हे गाणे आठवते. अर्थात मला ते अत्यंत आवडतेही. या कवितेतला भाव या गाण्यात आणि त्याच्या संगितात इतका भव्यपणे उतरला आहे की बस !
मोर्गे सेहर-एक लोकप्रिय इराणी गाणे. त्यांचे स्वातंत्र्यगीत !माझी फुलबाग
माझी फुलबाग
किती हौसेने फुलझाडे लाविली
पाणी देवून वाढवली जपली
काही कळ्या आल्या मुक्या
तर काही रंगीत फुले उमलली ||
परीसरात माझी फुलबाग एकटी
नव्हती तसली दुसर्या कुणाची
शोभेचे लावली तरूवर तेथे
काही झाडांना लपेटल्या वेली ||
अपेक्षीले न मी जरी काही
निसर्गाने तिला साथ दिली
कोंब तरारून आले वरती
अनेक कुसूमे भरभरून आली ||
येता जाता सारे बघती
कष्टाचे कुणी कौतूक करती
आनंदाचा ठेवा हा अनमोल
परी नव्हता तयांच्यासाठी ||
अशीच एकदा वेळ ती आली
नजर फुलांवर पडली काळी
दृष्ट काढली त्याच फुलांची
पण हाय!
काव्यरस
प्रवास
प्रवास
दुर पुढे जातांना सरलेली मागची
वाट नजरेच्या आवाक्यात येते.
किती चालायचे अजून बाकी
याची आठवण होते.
पायात रूतलेले काटे, दगड
लागणारा पाऊस वारा उन
प्रवासातला होणारा त्रास
निब्बर करतं त्वचा अन मन
तसल्या बेभरवशाच्या त्रासदायक प्रवासातही
एखादी वार्याची झुळूक,
एखादी गवती हिरवा जमीन
मनाला सुखावते.
तेथे थांबावस वाटतं
पण थांबता येत नाही
कारण
वाट संपलेली नसते
त्यामुळे चालावंच लागत.
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१७/०९/२०११
काव्यरस
क्षण
कालच्या सांजपुजेला लावलेल्या
कापूरवातीचा दरवळ अजूनही रेंगाळतोय
तशी पहाट झालीये, पण कालची संध्या
ती अजूनही घुटमळतेय इथे
.
हम्म... काल तू येऊन गेलीस.
.
लालकेशरी मावळतीला रेशिमधाग्यात धरून ठेवावे
असा तो क्षण
.
काही क्षणच असे असतात
आयुष्याचे दान देऊन जातात
.
क्षण तर सरून जातो
जाता जाता त्या दानाचे ऋण ठेऊन जातो
.
अन् मग ते फेडता फेडता
आपण क्षण क्षण मोजत राहतो
वाट पाहत राहतो
.
क्षणाचे ऋण फेडायला
आयुष्य वेचत राहतो.. नाही कां?
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१६/०९/२०११)
काव्यरस
निरोप ..!!
निरोप घेता घेता
निरोप घेणे ईतके सोपे नसते
निरोप घेताना
काळजात एक कळ उठते
निरोप घेताना
जसे आभाळ भरून येते
तसे मन भरून जाते
कधीपण कोसळू शकतो
आता हा पाउस
तसे मन होऊन जाते
निरोप घेता घेता
निरोप घेणे सोपे नसते ....!
कोठून कोठे आलो..?
काव्यरस
जग दर्शनका मेला
('उड जायेगा हंस अकेला' ही बहूधा कबीराची रचना अनेकदा कुमार गंधर्वांच्या आवाजात ऐकली होती. आज असेच सूचल्यावर पुन्हा ऐकली. तेव्हा सूचलेले काही विचार.)
मी हंस एकटाच काय टोळक्यात/नेही उडतांना पाहिलेला नाही. त/नेवरून आठवले. टोळक्याने की टोळक्यात? म्हणजे या दोन शब्दांत नेमका काय फरक असावा? 'टोळक्याने' म्हणजे 'रस्त्याच्या कडेने' किंवा 'धीराने तोंड दिले' किंवा 'साल्याने नाहीच दिले' सारखे असावे. टोळके - एक शस्त्र किंवा ढाल किंवा उगाचचपणा. 'टोळक्यात'म्हणजे 'जगात काहीच नाही', 'पावसाळ्यात चिखल', 'टेम्पोत बसवला' किंवा 'रिक्षात चिंतन' वगैरे. थोडक्यात छोटा, मर्यादीत. कशाततरी बसणारा.
जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा !!!
मंडळी आता आपल्याला वेध लागलेत दिवाळी अंकाचे. जालरंग प्रकाशनातर्फे आपणही दिवाळीचे स्वागत साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांनी करूया. आपण नवोदित असाल किंवा अनुभवी, आम्ही सगळ्यांना सामावून घेतो. तेव्हा चला,उठा आणि सज्ज व्हा आता.
आपल्या दिवाळी अंकासाठी कोणताही एक विशिष्ट असा विषय नाहीये.
रमा
समुद्रमंथनातून १४ रत्ने बाहेर आली. कौस्तुभ मणी, पारीजातक, कामधेनु गाय, अमृत , ध्न्वंतरी, वीष, चंद्र वगैरे वगैरे. पैकी लक्ष्मी ही देवी सुद्धा या १४ रत्नांतच गणली जाते. ती प्रकट झाल्यानंतर तिने विष्णूस वरमाला घालण्याआधी च्या काही क्षणांवर ही लहान कविता आहे.
कोमला सुलक्षणा शुभा, कमनिय लावण्या चंचला
क्षीराब्धीतुनी प्रकटे रमा.
पद्महस्ता पद्मसंभवा, क्षीराब्धीतनया चंद्रवदना
जिचा अनुज असे चंद्रमा,
अवघड होणे ही स्थिरा, वर शोधा अनुरूप तिजला.
चंचल चंद्र जिचा भाऊ आहे अशी ही स्वतः अतिशय चंचल रमा, शेवटी विष्णूच्या चरणांशी स्थिर झाली, लीन झाली.
काव्यरस
मिसळपाव