Skip to main content

कविता

मिसळपाववरील कवितांची रसग्रहणं # माझं हे सारं सामान गं सखू...

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 22/09/2011 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
घासू गुरुजींनी सुरु केलेल्या कविता रसग्रहणाच्या उपक्रमाने प्रभावीत होवून आपणही तिथे एखाद फुल सोडाव असं बरेच दिवस वाटत होत, पण योग्य फुल गवसत नव्हत, इतक्यात मिपाचे ताज्या दमाचे, नव्या रक्ताचे तरुण ताठर कवी श्री धनाजीराव वाकडे यांची माझं हे सारं सामान गं सखू... ही कविता वाचनात आली आणी योग्य फुलं गवसल्याचा आनंद झाला. खरतर ही कविता इतकी रसरशीत आहे, की मधमाशीच्या मकरंद गोळा करण्याच्या कौशल्याऐवजी लहान व्रात्य मुलाच्या बर्फगोल्यातून रस ओढायच्या कौशल्याचीच येथे गरज पडावी..
काव्यरस

लावणी: लग्नाचं वय माझं झालं

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/09/2011 03:42 या दिवशी प्रकाशित केले.
लावणी: लग्नाचं वय माझं झालं
नक्षीदार कुयरी पदरावरची......... हळद कुंकवानं भरलेली सोळा सिनगाराचा साज लेवूनी... ऐन्यापुढे उभी मी राहीली पुढ्यात तुमच्या जवळ आले माळून मी मरवा लग्नाचं वय माझं झालं; आता तारीख ती ठरवा ||धृ|| मुसमुसलेली ज्वानी माझी कळीदार ती काया हाताला हात लावा अन पारखून घ्या तिला राया अंग माझं सोन्यावानी तिस हजारी की हो झालं! चांदीवानी चमचम करूनी उजळून ते आलं तुमच्या मिठीत घ्या या रुप्याच्या रुपाला लग्नाचं वय माझं झालं; आता तारीख ती ठरवा ||१|| पावसाळ्यामदी मोरलांडोरी
काव्यरस

अर्घ्य

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 21/09/2011 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ इतक्यात कशी झाली, काही कळलंच नाही. आत्ता आत्ता डोक्यावर दिसणारा सूर्य उतरला क्षितिजाकडे कधी? कळलंच नाही. आणि अचानक अंधार झाला, मिणमिणत्या पणत्यांनी जेमतेम दिसणारा, थरथरणारा केविलवाण्या, धूसर सावल्या हलवणारा एकएक करून त्याही विझल्या.
काव्यरस

पाहटंची शेती

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/09/2011 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटेची शेती
सक्काळच्या धुक्यात रं चुलीचा धुर गेला रं भाकरी थापल्याचा आवाज त्याच्यात मिसळला रं पान्ह्यासाठी सोडली रं कालवड ल्हान तान्ही रं कासंडी धुवूनशान दूध काढलं म्हशीचं रं उठावं थंडीगारठ्याचं रं काम करावं कष्टाचं रं शेणमुत काढावं जनावरं आपलीच रं सर्जा राजा उठला रं पाचट खाऊन तयार रं औत वढाया, जुपाया खांद्यावर जू ठेवलं रं रामपारी देवाचं रं नाव घ्याव तोंडांनं रं न्यारी करून शेताला चालू लागावं पाहटंला रं - पाषाणभेद (दगडफोड्या) २१/०९/२०११

बत्तीस तारखेला

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 21/09/2011 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
बत्तीस तारखेला


भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला
नादान सद्गुणांनी अवसानघात केला

जागून रात्र सारी, उपयोग काय झाला?
सावज रणात येता, कुत्रा पळून गेला

सांगू नकोस भलते सलतेच तू बहाणे
उरलाय शब्द केवळ, का ओल आटलेला?

नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला

समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले

चुकीचे मोबाईल रिचार्ज

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/09/2011 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
चुकीचे मोबाईल रिचार्ज
गट्टू अन गिट्टी जात होते एकाच कॉलेजात तेथेच जुळले त्यांचे; गुंतले दोघे एकमेकात गट्टू स्वभावाने वांड होता गावात सोडलेला सांड होता याच्याशी भांड त्याच्याशी भांड असले उद्योग करत होता गिट्टीला तो खुपच सोज्वळ भासे कच्च्या लिंबाप्रमाणे कोवळा वाटे कॉपी केल्याने कॉलेजमधून रस्टीकेट झाला अपेक्षेप्रमाणे गट्टू एस.वाय.ला फेल झाला मनापासून प्रेम होते त्याचे गिट्टीवर ती न भेटली तर जीव होई खालीवर इकडे गट्टूच्या बापाने त्याला घराबाहेर काढला काहीतरी कामधंदा कर तरच घरी ये म्हणाला काय करावे काय करा

हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 21/09/2011 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार सदाचार नाही हा तर आहे भ्रष्ट आचार भ्रष्ट आचार काम करण्यासाठी कुणी ऑफीसात येतो, ऑफिसर कारकुनाची विनवणी करतो आज ये उद्या ये म्हणून वेळ फुक्कट जातो, पैसे घेवूनच मग कामं तो करतो असल्या कामासाठी लाच खाणं झाला शिष्टाचार शिष्टाचार हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार गोरगरीबाचे कामं तुम्ही लवकर कराना, चिल्यापिल्यांचे तुम्ही आशिर्वाद घ्याना माणसातली माणूसकी आता जागवाना पैसे मागण्याचा खेळ आता संपवाना सदाचार, सुनीती, निष्ठा यांचा करा प्रचार, करा प्रचार हटव

माझं हे सारं सामान गं सखू...

लेखक धन्या यांनी मंगळवार, 20/09/2011 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराला निघालो मी घाई घाई, पिशवीची आठवण राहीलीच नाही सामान माझं सारं आहे थोडं खाली, तू जराशी वाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का? तालुक्याच्या बाजाराला लागलाय सेल, केली खरेदी मी बराच वेळ माझं सामान झालंय बरंच मोठं, पिशवी जराशी फाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का? वाण सामान आणि ताजा भाजीपाला, मासोळीचाही मी बाजारहाट केला ताजा, कडक बोंबील माझा, तुझ्या पापलेटनी झाकशील का? माझं हे सारं सामान गं सखू, तुझ्या पिशवीत टाकशील का? सांगत असतो धन्या तो मला, पिशवी नेत जा रे नेहमी बाजाराला वापरू नये कधी हात सामानाला, आतापुरतं तू झाकशील का? माझं हे सारं स

मिसळपाववरील कवितांची रसग्रहणं ४ - माफ

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 20/09/2011 05:36 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच एक कविता वाचण्यात आली, माफ नावाची. निखिलचं शाईपेन या आयडीने लिहिलेली. कविता छान आहे, तांत्रिक बाजूत सुधारणेला वाव आहे. मुक्तछंदात लिहून एक लय, एक चढत जाणारा टेंपो पाळण्याच्या बाबतीत काही दुरुस्त्या करता येतील. पण त्यापलिकडे कवितेचा आशय प्रभावी आहे. संपूर्ण कविता वाचून मला पहिल्याप्रथम जाणीव झाली ती एका एकतर्फी केविलवाण्या प्रेमभंगाची. या जळजळीत अनुभवानंतर जी एक विरक्ती येते तिचं वर्णन या कवितेत आहे. पण ही विरक्ती खरी विरक्ती नाही. वेदना भळभळत असताना तिच्याकडे बघत म्हणावं, केलं, या घाव घालणाऱ्याला मी माफ केलं.

वेळ लावू नका

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 20/09/2011 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ लावू नका
रात नवेली आली चालून विडा ठेवला चुना लावून तुमच्या येण्याचा नाही भरवसा वेळ लावू नका बेगीनं या राजसा वाट तरी पहावी कितीक बाई दिस गेला हि रात सरत जाई ऐन मोक्याला धोका कसला? जीव झाला येडापीसा वेळ लावू नका बेगीनं या राजसा लाडीगोडीचं तुमचं बोलनं गोडगुलाबी कोडं घालनं आधारासाठी हात उशाला पांघराया अंग द्या न विसरता वेळ लावू नका बेगीनं या राजसा शिनगाराचा असल्या येळी आठव तुमची डोळा आली दोन्ही पापण्या न्हाती पाणी विरह सहन होईना जरासा वेळ लावू नका बेगीनं या राजसा - पाषाणभेद (दगडफोड्या) २०/०९/२०११
काव्यरस