Skip to main content

माझी फुलबाग

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2011 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझी फुलबाग
किती हौसेने फुलझाडे लाविली पाणी देवून वाढवली जपली काही कळ्या आल्या मुक्या तर काही रंगीत फुले उमलली || परीसरात माझी फुलबाग एकटी नव्हती तसली दुसर्‍या कुणाची शोभेचे लावली तरूवर तेथे काही झाडांना लपेटल्या वेली || अपेक्षीले न मी जरी काही निसर्गाने तिला साथ दिली कोंब तरारून आले वरती अनेक कुसूमे भरभरून आली || येता जाता सारे बघती कष्टाचे कुणी कौतूक करती आनंदाचा ठेवा हा अनमोल परी नव्हता तयांच्यासाठी || अशीच एकदा वेळ ती आली नजर फुलांवर पडली काळी दृष्ट काढली त्याच फुलांची पण हाय! पुष्पांची गेली झळाळी || जीवन म्हणजे येणे जाणे येवूनी आयुष्याची बाग करणे जरी ही एखादी फुलबाग उखडली नविन फुलबागा करील मी माळी || - पाषाणभेद (दगडफोड्या) १७/०९/२०११
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1050
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया