प्रवास
लेखनविषय:
काव्यरस
प्रवास
दुर पुढे जातांना सरलेली मागची
वाट नजरेच्या आवाक्यात येते.
किती चालायचे अजून बाकी
याची आठवण होते.
पायात रूतलेले काटे, दगड
लागणारा पाऊस वारा उन
प्रवासातला होणारा त्रास
निब्बर करतं त्वचा अन मन
तसल्या बेभरवशाच्या त्रासदायक प्रवासातही
एखादी वार्याची झुळूक,
एखादी गवती हिरवा जमीन
मनाला सुखावते.
तेथे थांबावस वाटतं
पण थांबता येत नाही
कारण
वाट संपलेली नसते
त्यामुळे चालावंच लागत.
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१७/०९/२०११
वाचने
1339
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
पाषाणभेद -छान जमलीय -
दुर पुढे जातांना सरलेली मागची
वाट नजरेच्या आवाक्यात येते.
किती चालायचे अजून बाकी
याची आठवण होते.
लागे राहो. शुभेच्छा !!
आवडली कविता.
आणि एक चित्रमय प्रतिसादः
(चित्रे जालावरून साभार).
(चित्रे जालावरून साभार).तेथे थांबावस वाटतं
पण थांबता येत नाही
कारण
वाट संपलेली नसते
त्यामुळे चालावंच लागत.
ब्येष्ट! आवडली!
The woods are lovely, dark and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep....
पाषाणभेद -छान जमलीय - दुर