Skip to main content

कविता

जीवन

लेखक विदेश यांनी बुधवार, 18/01/2012 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाच्या ह्या ऋतूत तुम्हाला हवे म्हणून- माझ्याजवळचे पाने फुले फळे आणि फांद्याचे सर्वस्व देण्यासाठी- मला जगावेच लागेल ! दु:खाच्या त्या ऋतूत तुम्हाला हवे म्हणून- कुणाच्या तरी जगण्यासाठी चुलीत जळण्यासाठी- कुणाच्या तरी मरणानंतर चिता जाळण्यासाठी- माझे अचेतन खोड मला जपावेच लागेल !

एक कविता आठवतांना...Why Me?

लेखक मनिष यांनी बुधवार, 18/01/2012 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
आधीची कविता - My Sorrow ही अजून एक दुसरी जुनी, पण आजही आवडणारी कविता. आयुष्यात बर्‍याच वेळा 'पण मीच का?', 'Why Me?' हा प्रश्न सतावतोच. कधी अक्राळविक्राळ रूप धारण करून आपण आणि इतर ही दरी इतकी रुंद करतो की एकाकीपण, कोणी समजून गेऊ शकत नाही हा सल प्रत्यक्ष दु:खापेक्षाही जास्त त्रास देतो. Experiences are so personal, they can't make anyone else wiser! असं म्हणून गप्प व्हायचं. ही कविता अशाच काळत लिहिली आहे जेंव्हा मी खूप हताश आणि निराश झालो होतो.

झुरळे !!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 18/01/2012 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
कशी कुणास ठाऊक कोठून उगवते ही झुरळांची जमात कशी कोठे दडून बसते फटीत बाथरूममध्ये .... किचनच्या बेसिन खाली मध्यरात्री कधी उठलो तर दिसतात मस्त मजेने फिरत असतात इतस्तत: दिवां लागताच तुरुतुरु पळतात अदृश्य होऊन जातात भयंकर किळसवाणे वाटते त्याना बघतांना झुरळे असतात बारीक झुरळे असतात ढब्बू डौलदार ...बेढब झुरळे असतात चीनी माणसाच्या मिशी सारखी धीर गंभीर विचारवंत योग्या सारखी ध्यान लावून बसलेली किती नष्ट केली नष्ट झाली असे वाटले तरी ती उगवतात फिनिक्स पक्ष्या सारखी राखेतून उभी राहतात जिद्दीने .....! पायाने ठेचले की फट असा आवाज येतो नि ही मरून जातात मी पाहिलंय मुंग्यांनी त्याचा देह फ
काव्यरस

(सुटलेल्या पोटाची कहाणी)

लेखक यकु यांनी बुधवार, 18/01/2012 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: दमलेल्या बाबाची कहाणी घामेजून ताणलेला एक पट्टा कुणी काचलेला लालेलाल वळ उठे झणी रोजचेच झाले आता नवे काही नाही इन कशी करु आता मला सांगा कुणी झोपेतच हात जातो ढेरी वरी जरी निजेतच स्वप्नी भासे स्लीम झाली ढेरी सांगायचे आहे काही माझ्‍या मनातले मला सुटलेल्या पोटाची ही कहाणी तुला ना ना ना ना ना..

(बोंबाबोंब)

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 18/01/2012 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
महिना अखेरी, कैसा थाटमाट लागताच वाट, पगाराची सोशिक बायको, खिसे ती तपासे टाकोनी उसासे, दर्दभरे उधारी करोन, आणते किराणा शोधते बहाणा, सयुक्तिक सार्याच वस्तूंचे, वाढले हो भाव मनी काही हाव, धरवेना मूक वाचकाचे, सणके मस्तक काव्य हेच एक, प्रकटन पुढार्यांचे बूड, घट्ट खुर्चीवरी, फुकाचीच सारी, बोंबा बोंब
काव्यरस

स्वरकिंचित

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 18/01/2012 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द एक पडला कानी उठल्या कुठल्या लहरी रानी चाळवले रुधिरामधले रण अमृतमय झाले पाणी कंठ कोरडा गहिवरला ओघळले यमुनाजळ नयनी वात कोंडला उरी हुंदका फुटला श्वासामधुनी भिजले काजळस्वप्न लोचनी उत्सव काहुर मन सदनी भेट दाट घडली स्वरकिंचित बहर पावली अवनी ............................अज्ञात
काव्यरस

प्रेमरस

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 18/01/2012 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे पायी, गळे अभिमान इथेच निधान, कैवल्याच शब्दही निमाले, अश्रु ओघळले कैसे हे उमाळे, अंतर्यामी कारुण्य वात्सल्य, सखे तुझे प्रति प्रिती की आसक्ती, ठाव नाही एक मज ठाव, अंतरी जो भाव त्याचे नाव गाव, पुसू नको हृदयाची भाषा, न जाणे मस्तक मौन मात्र एक, प्रकटन असा हा ईश्वरीय , अनुभव सारा प्रेममरस धारा, चिंब चिंब
काव्यरस

मन मौज कराया उडते....

लेखक मनमौजी यांनी मंगळवार, 17/01/2012 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी इथे नवीन आहे. हि माझी पहिलीच कविता आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा करतो... मन मौज कराया उडते.... भिरभिरणारा वारा होते... खळखळणारा ओढा होते.. दाटल्या मेघामधुनी... झरझरणार्‍या धारा होते... मन मौज कराया उडते.. किलकिलणारी पहाट होते.. सळसळणारे पाते होते... घनदाट वनराई मधले.. किलबिलणारे पक्षी होते... मन मौज कराया उडते..

भक्ती........

लेखक निशदे यांनी मंगळवार, 17/01/2012 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
उधळीत गुलाल, बडवीत मृदुंग, सोहळा भक्तीचा, सुंदर सजतो || नाव घेती कोणी, कोणी धुंद होता कल्लोळ भक्तीचा, दूर पसरतो || दूर पहा तिथे, बैसे कोणीतरी हातातील नाणी, उगीच मोजतो || पोटाचेच जिथे, रोजचे सायास कैसा भक्तीभाव, तयाला सुचतो || उडवती नाणी, ओवाळिती नोटा सारे त्या भगवंता, लाच दाखविती || येई कोणी शेट, मागाहून पुढे देवाहून जास्ती, सलाम ठोकिती || हा परी इथे, खातो शिळेपाके, देवाच्या वाटी, साधा नमस्कार || भक्ती मनी दाटे, परी भूक लागे, पोटापुढे नसतो, मनाचा विचार || कोणी मागी देवा, धनधान्य पुत्र कोणी आरोग्य, आयुही मागिती || सारी असली जरी, देवाचीच पोरं, एक दुजियाचा, नाशही मागिती || देव येई निघुनी,
काव्यरस

जे काही आहे ते सगळंच 'तत्त्वमसि' आहे!

लेखक मेघवेडा यांनी सोमवार, 16/01/2012 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज कित्येक दिवसांनी आलोय तुझ्याजवळ निवांतपणे. तुझं हे सौंदर्य नेहमीच मला भुरळ घालतं, आजही घालतंय! हे मोहक रूप डोळ्यांत साठवून घ्यायला उभा जन्मही अपुरा पडावा. तुझ्याजवळ कधीही येऊन बसलो की खूप शांत, प्रसन्न वाटतं. हलकेच तुझ्या कुशीत गाढ झोप लागते नि रोजच्या दगदगीने थकलेल्या मनाला खूप आराम मिळतो. डोळ्यांना सुखावणारी ही दाट वनश्री, सोनसळी नव्हाळी ल्यालेली ही साळीची शेतं, भयाण गडगडाटांनी आसमंत भरून टाकणारे ते कृष्णमेघ, जीवाच्या आकांताने कोसळणार्‍या त्या जलधारा, त्या तिकडे मखमली गालिच्यावर लकाकणारी सोनेरी उन्हं, ही अवखळपणे डोंगरदर्‍यांना गुदगुल्या करत बागडणारी नदी - अरे आणखी किती वेड लावशील?!