Skip to main content

कविता

जो डाव आता, असे खेळला मी, तो दाविनच जिंकुनी

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 08/02/2012 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
कवी झाले अंतर, काव्यच वेदना ही, ही रात्र कविता जणू इतरांच्या कवितांना, ए ऐकणारे, हे काव्यही ऐक तू येऊन जरा बघ, मी प्रीत्यर्थ तुझिया, जगतो हे जीवन कसे अश्रुंच्या धाग्यांनी, शिवतो सदा मी, हे घाव जे तू दिले घेऊन तुझे दुःख, आसक्तीद्वारी, मी खेळलो बघ जुगार जरी जिंकलो जग, तरी हारलो तुजसी, हा खेळ झाला असा जे समरसुनी मी प्रेम केले, त्यासम उदाहरण न खास जरी काजवा मी, प्रेमात पेटून, जणू जाहलो सूर्य आज माझ्यामुळे प्रेम, जीवित असे आणि मैफिल तुझी रंगदार जेव्हा नसेन मी, रडत सारे जग हे, हुडकेल माझेच माग ग प्रेम हे, खेळणे मुळी नसे जे, कुणीही खरीदू शके माझ्याप्रमाणे, आयुष्य जळता, ये ध्यानी सारे
काव्यरस

असा अविचार करू नको

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 08/02/2012 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
[फरहाद शहजाद यांची मेहदी हसन यांनी गायलेली 'तनहा तनहा मत सोचा कर' ही गझल ऐकताना सुचलेले मुक्तक] निर्जन एकांती असे रे, भलते विचार करू नको जीवावर बेतेल मित्रा, असा अविचार करू नको खूप झाले क्षणभरासाठी, लाभली मुग्ध प्रीती तुला रे खोटी खरी याची आता, शहानिशा तू करू नको डसणे जिचा 'धर्म' आहे, डंख ती मारून गेली साहणे हे तुझे प्राक्तन, भोगताना विव्हळू नको एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको हरलास जरी बाजी जराशी ,सर्वस्व पणाला लावूनी कैफात धुन्द रहा जुगार्या, रूक्ष हिशेबी गुंतू नको जळो वांझ पश्चातबुद्धी, ऐक माझे जरा 'मुक्या' तू डाव नव्याने मांड आता, उगाच ते

एकांग

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 08/02/2012 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुझा; तुझ्याविण फास पारधी; हरलो तुज छबी मागुती वलय गणत उलगडलो तू मुक्त लोळ तडितेचा; मी वृक्ष जखडला मातीचा पसरून विशाखा ओंजळ होउन फुललो पाताळ शोधिले पाहिले न कधि मागे हृदयातिल स्पंदन अंकुर अजुनी जागे भ्रमणात; भ्रमाच्या छायेपाठी फिरलो नवक्षितिजावर मेघांकित दिनकर झालो पाहून पालखी पलकांची; मी फसलो बोलक्या स्मिताच्या लहरींवरती झुललो क्षण कांही पण अंतरास स्पर्शुन गेले एकांग रणी काजळात अंती विरलो ...........................अज्ञात
काव्यरस

इच्छा !

लेखक चैतन्य दीक्षित यांनी मंगळवार, 07/02/2012 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
कोणते शब्द वापरू तुझे गुण गाण्या, तू स्फूर्तीचीही मूळ प्रेरणा असशी, मी इच्छा करतो आणि कौतुके तूही लेखणीतून या सारे लिहवुन घेशी | मग शब्दांना त्या लाभे अमृत-उपमा, अर्थाला द्याया उपमा न चले बुद्धी, हे मी नच केले, घडले तुझ्या कृपेने, ही जाणिव होता मनास लाभे शुद्धी | हे सगळे तरिही शब्दरूप, बाह्यांगी, तू निसटुन जाशी मना मोहवुन माझ्या अन् पुन्हा एकदा तुझे रूप-गुण गाण्या, अन् तुला पकडण्याची मज होते इच्छा | - चैतन्य दीक्षित

भेट

लेखक प्रेरणा यांनी मंगळवार, 07/02/2012 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
जागे होण्याआधी गोकुळ शांत अजुन पानांची सळसळ चंद्र केशरी अजुनी आभाळी पहाटवारा वाहे अवखळ अजुन जुईची बंद पाकळी नसे अजुनही किलबिल जागी खट्याळ वारा घाली फुंकर होई हलके राधा जागी दाट सावळ्या केसांना मग हळुच सारुन मागे काना अर्ध्या मिटल्या लोचनात त्या पहिली आठवण होते कान्हा अधीर्‍या ओल्या अंधारातुन भारावून ती चाले वाट तिलाच ऐकू येतो आणिक यमुनेचा तो हिरवा काठ दिसते तेथे बाहू पसरुन तीच आकॄती ओळखीचा बांधा घुमु लागता त्याचा पावा राधा नुरते आता राधा

मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शनिवार, 04/02/2012 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी सूर लावूनी मस्त जगत गेलो मी रडण्यासाठी नाही जन्माला आलो मी दुख पाहिले तरीही नाही खचलो मी शांतपणे दुखही भोगित गेलो मी होतो कोठे..?
काव्यरस