प्रेमरस
लेखनविषय:
काव्यरस
तुझे पायी, गळे अभिमान
इथेच निधान, कैवल्याच
शब्दही निमाले, अश्रु ओघळले
कैसे हे उमाळे, अंतर्यामी
कारुण्य वात्सल्य, सखे तुझे प्रति
प्रिती की आसक्ती, ठाव नाही
एक मज ठाव, अंतरी जो भाव
त्याचे नाव गाव, पुसू नको
हृदयाची भाषा, न जाणे मस्तक
मौन मात्र एक, प्रकटन
असा हा ईश्वरीय , अनुभव सारा
प्रेममरस धारा, चिंब चिंब
वाचने
2169
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
क्लास!!!
प्रत्येक ओळच कोटेबल झाली आहे.
आवडली कविता.
सुंदर कविता.
अत्यंत सुंदर रचना!!
एक मज ठाव, अंतरी जो भाव
त्याचे नाव गाव, पुसू नको
या ओळी तर फारच आवडल्या.
हृदयाची भाषा, न जाणे मस्तक
मौन मात्र एक, प्रकटन
सुरेख... :)
व्वाहवा..एक झकास काव्यानुभव..!

खुपच अप्रतिम ('टचिंग') ...
ह्या ओळि तर ... लाजवाब!
एक मज ठाव, अंतरी जो भाव
त्याचे नाव गाव, पुसू नको
हृदयाची भाषा, न जाणे मस्तक
मौन मात्र एक, प्रकटन
कविता आवडली!
वा! सुंदर कविता!
कविता मस्त
छान
अतिशय प्रासादिक झाली आहे. :)
किंचित छिद्रान्वेष - ६-६-६-४ असा ओवीचा आकृतीबंध परखडपणे सांभाळता आला तर जास्त मजा येईल.
उदा.
तुझे पायी (४), गळे अभिमान (६)
इथेच निधान (६), कैवल्याच (४) -------- ऐवजी
तुझे पायी सारा (६), गळे अभिमान (६)
इथेच निधान (६), कैवल्याचे (४)
In reply to सुरेख रचना! by चतुरंग
सहमत आहे.
मस्तं कविता.
क्लास!!! प्रत्येक ओळच कोटेबल