Skip to main content

मन मौज कराया उडते....

लेखक मनमौजी यांनी मंगळवार, 17/01/2012 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी इथे नवीन आहे. हि माझी पहिलीच कविता आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा करतो... मन मौज कराया उडते.... भिरभिरणारा वारा होते... खळखळणारा ओढा होते.. दाटल्या मेघामधुनी... झरझरणार्‍या धारा होते... मन मौज कराया उडते.. किलकिलणारी पहाट होते.. सळसळणारे पाते होते... घनदाट वनराई मधले.. किलबिलणारे पक्षी होते... मन मौज कराया उडते..
लेखनविषय:

वाचने 1347
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

छान जमलय..पण अजुन थोडं पुढे लिहिलं जायला हवं होतं... म्हणजे नाश्टा मिळाला,,,चवदार मिळाला,,,पण अर्धीच प्लेट,,असं वाटलं :-)

छान छान खुप आवड्ले...पण जरा जास्त असते तर पोट भरले आसते.हे म्हण्जे नुसते मन खवळ्ले..(हे तोंड खवळ्ले च्या चालीत घ्या..)