भक्ती........
उधळीत गुलाल, बडवीत मृदुंग,
सोहळा भक्तीचा, सुंदर सजतो ||
नाव घेती कोणी, कोणी धुंद होता
कल्लोळ भक्तीचा, दूर पसरतो ||
दूर पहा तिथे, बैसे कोणीतरी
हातातील नाणी, उगीच मोजतो ||
पोटाचेच जिथे, रोजचे सायास
कैसा भक्तीभाव, तयाला सुचतो ||
उडवती नाणी, ओवाळिती नोटा
सारे त्या भगवंता, लाच दाखविती ||
येई कोणी शेट, मागाहून पुढे
देवाहून जास्ती, सलाम ठोकिती ||
हा परी इथे, खातो शिळेपाके,
देवाच्या वाटी, साधा नमस्कार ||
भक्ती मनी दाटे, परी भूक लागे,
पोटापुढे नसतो, मनाचा विचार ||
कोणी मागी देवा, धनधान्य पुत्र
कोणी आरोग्य, आयुही मागिती ||
सारी असली जरी, देवाचीच पोरं,
एक दुजियाचा, नाशही मागिती ||
देव येई निघुनी, याच्यापुढे उभा,
"मला लेका तुझा, नमस्कार भारी ||
येती लाखो माझ्या, सामोरी आडवे
भक्तीपरी मात्र, पैशाची मुजोरी ||
बदलती देव, कपड्यासारखा
भावापेक्षा यांची, धनाची सलामी ||
पैशाच्या तोडीचा, हवा आशीर्वाद
देवालाही लावी, कराया गुलामी ||
पुंडलिक तूच, दामाजीही तूच
पैशाची श्रीमंती, नाही मला प्यारी ||
जोडी दोन हात, घेई माझे नाम
तृप्ती माझ्या मनी, तयाचीच सारी" ||
देव जाई निघुनी, मंदिरी कल्लोळ
सारेची निष्फळ, प्रयत्न यांचे ||
दोषारोप चालू, पोलीसा सांगिती,
पूरची लोटिती, हरेक उपायांचे ||
अखेरीस कोणी, आणिती पाषाण
शेंदूर फासून, "देव" सारी म्हणे ||
पुनश्च चालू, दगडाचा जयघोष,
देव परी दूर, पाहतो विषण्णे ||
वाचने
2106
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
नमस्कार
छान आहे...कवितेवर संत
In reply to छान आहे...कवितेवर संत by अत्रुप्त आत्मा
अ आ
छान रचना!
छान रचना!
उत्तम
In reply to उत्तम by मीनल
धन्यवाद
काव्य रचना छान जमली आहे
In reply to काव्य रचना छान जमली आहे by जाई.
:)
कविता मस्त ! प्रत्येक ओळीत
In reply to कविता मस्त ! प्रत्येक ओळीत by गणेशा
धन्यवाद
तुमचे कविता विभागात स्वागत!
In reply to तुमचे कविता विभागात स्वागत! by पैसा
धन्यवाद पैसा,