Skip to main content

कविता

जागेपणी मिटून जायचे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 23/01/2012 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांच्या बाजारात मी काही शोधीत बसायचो तिच्यावर प्रेम करण्यासाठी काही शब्द शोधीत असायचो मला हवे ते शब्द मिळत नव्हते काय करावे कळत नव्हते..?
काव्यरस

काय सैपाक काय करू मी बाई

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 23/01/2012 06:13 या दिवशी प्रकाशित केले.
काय सैपाक काय करू मी बाई घरधनी उठलं सकाळी रामपारी उसतोडीची आमी केली तैयारी न्यारी डब्यासाठी आंग खंगाळूनी चुल पेटवली पाचट काड्या पेटवूनी हाताशी पोळपाट परात घेवूनी जाळ केला चुलीवर तवाठेवूनी धुर डोळ्यात जाई फुकनीनं फुकूनी पाण्याचा तांब्या शेजारी ठेवूनी भाईर धन्यानं गाडी केली बैलं जुपूनी ठेवला विळा कोयता दोर कळशीत पाणी "घाई कर" म्हनं पोराला उठवूनी रडत उठलं पोरं...रट्टा दिला ठिवूनी सारी तयारी झाली झालं त्यांचं आवरूनी चला उठा निघायचं हाळी आली शेजारूनी पिठाचा डबा घेई हाती करूनी घाई पाहते तर डब्यामधी बाजरीचं पिठच नाही ऐन वक्ताला काय करावं सुधरंना ब

नको रे कान्हा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 23/01/2012 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
नको रे कान्हा नको रे कान्हा आडबाजूला भेटूनी नको लगट दावू उगीचच खेटूनी || नार मी भोळी साधी सरळ हरणी रस्त्याने जाई येई सलज्ज तरणी सख्यांसवे मथूरा बाजारी निघाले अडवूनी दुध दही नको घेवू लुटूनी || गोरी माझी काया तू रे सावळा मनात दुजे काही चेहेरा भोळा नको छेडाछेडी दिसे मग सार्‍यांना ओढताच वस्त्र अंगाचे गेले सुटूनी || श्रीहरी मनमोहन कृष्णा रे मुकूंदा केशव मुरलीधर माधवा गोविंदा अनंत नावे तुझी येती माझ्या मुखी विनवीते गौळण पाया तुझ्या पडूनी || तुझ्याविण दुजे माझे आहे सांग कोण तुझ्याविण जग सारे होई वैराण यमुनेच्या वाळवंटी जीवन मज सापडले तुझ्यासवे

मी हुच्चभ्रू

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 22/01/2012 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
विकी वरची माहिती भाषांतरित करून मेगाबायटी प्रतिसाद देणार मीही हुच्चभ्रू होणार ||१|| धागे हायजॅक करून गोंधळ मी घालणार मीही हुच्चभ्रू होणार ||२|| राजकीय-धार्मिक मुद्यांनाच हात मी लावणार मीही हुच्चभ्रू होणार ||३|| ललित लेखनाला फाट्यावर मारणार मीही हुच्चभ्रू होणार ||४|| इतर धाग्यांना तुच्छ मी मानणार मीही हुच्चभ्रू होणार ||५|| मराठी संस्थळावर इंग्रजी प्रतिसाद मी देणार मीही हुच्चभ्रू होणार ||६|| संस्थळांवर लॉगिन न करता वाचनमात्र मी राहणार मीही हुच्चभ्रू होणार ||७||
काव्यरस

काळोखातली कासवे

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 22/01/2012 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
काळोखातली कासवे काळोखात का(?)सवे आली... सहज बादलीभर अंडी घातली... कोणती हिची? कोणती तिची? कळलेच न्हाई...!(म्हणुन मग एक दुसरीला पुढे म्हणते...) बाजी...मारलीस का..? तू ही... ;-) (विमान हॅलिकॉप्टर नाकात-नथ-यांच्या एका बालिश कवितेवरुन)
काव्यरस

गुरफटलेली आसवे

लेखक धनंजय यांनी रविवार, 22/01/2012 04:34 या दिवशी प्रकाशित केले.
गुरफटलेली आसवे
काळोखात आसवे आपली दिली-घेतली, गुरफटलेली. कोणती तुझी? कळलेच नाही. माझी ओळखलीस का, तूही?
(हुआन रामोन हिमेनेथ याच्या एका स्पॅनिश कवितेवरून)
काव्यरस

" यक्ष प्रश्न "

लेखक रघु सावंत यांनी शनिवार, 21/01/2012 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
" यक्ष प्रश्न " अश्याच एका सुंदर संध्याकाळी एकटाच होतो पण तू नव्हतीस तुझ्या आठवणींची एक एक गाठ उसवत चाललो होतो एकटाच पाखरं आपल्या घराकडे येत होती वाराही गारवा देत जात होता पुर्वीसारखाच मनात तुझ्या आठवनींच काहुर पण दैव या आठवनींना एकटेपणाची झालर रोजच्या वळणावरच होतो मी उभ
काव्यरस

" शोध तिचा लागेना ...! "

लेखक विदेश यांनी गुरुवार, 19/01/2012 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे शोधू तुला एकटीला किती शोधू तुला एकटीला तुझा विरह असह्य होतोय तुझ्याविना चडफडतोय ! येताजाता बाहेर फिरायला कामाला आणि उंडारायला तुझी साथ असायची ! लांब जवळ गेलो तरी तू बरोबरच असायची ! दारापासून कार्यालयापर्यंत- मंदिरापासून मद्यालयापर्यंत तुझ्याविना बाहेर पडायला लाज वाटते मला , तुझ्याशिवाय बाहेर जायला तोंड नाही मला , 'प्रिये'च म्

"आई"

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 19/01/2012 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
दहावी ला असताना आंम्हाला फकीरराव शिंदे यांची 'आई' ही कविता होती. शाळेत असताना आमच्या सर्वात जास्त आवडत्या कवितांमधीलच ही एक कविता! फ.मु. शिंदेंनी आपल्या प्रभावि अन् नेमक्या शब्दांत आई या शब्दाचा व्यापक अर्थ पटवुन दिला होता. तो खरोखरच हृदयाला स्पर्श करणारा होता. अशीच एक 'आई' या शिर्षकाची कविता याअगोदरच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये होती, काळाच्या ओघाने ती विस्मरणात गेली होती, पण फ.मु. च्या कवितेने- त्या कवितेची आठवण पुन्हा ताजी केली. 'यशवंत' यांची होती ती कविता! फ.मु.ची कविता जेथे हृदयस्पर्शी होती तिथेच यशवंत यांची कविता मनाच्या खोल गर्तेत सलणारी, हृदयाला चटका देणारी होती.
काव्यरस

थंडी माघाची

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 19/01/2012 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
थंडी माघाची थंडी पडलीया माघाची राया माघाची घाई करा तुमी येण्याची ||धृ|| लवकर या हो जवळ घ्या हो जरातरी फिकीर करा वेळेची || नका नका आसं करू नका जिव माझा फुका जाळू नका एकटेच का दुर र्‍हाता तिथं पेटवा शेकोटी माझ्या ज्वानीची || थंडीनं जिव केला येडापिसा उन उन उबेला जवळी बसा हातावर हात आन पायावर पाय पहा चोळून राहिलेय मी केव्हाची || कालचा दिस आठवा ना रुसवा गोडीनं मिटवा ना आणलय काय दावून जरा मुठ उघडा हाताची || - पाभे
काव्यरस