Skip to main content

कविता

सरदार सरदार

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 27/01/2012 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
सरदार सरदार सरदार सरदार तुम्ही माझं अंमलदार काळजी तुमची करते लवकर परतावं सवत चाकरी झाली माझी ओढून नेई तुम्हा युध्दावर वाट पाहिल तुमची दारी दासी सेवा करीते थोडं शेजघरी पडावं तुम्हाविण व्याकुळ चिमणा जीव काय घडलं तेथे कुणी सांगावं मन लागेना कामी दिसभर घास जाईना ओठी काय करावं धिर करून देते निरोप आता माझी काळजी आहे उलीशी महाराष्ट्राचा पसारा मोठा पुर्‍या ताकदीनिशी युध्द लढावं चला नाही अडवीत, तुम्ही जावं तेज तलवारीनं दुष्मना मारावं मस्तकी मोती शिरपेच खोचावं विजयी विराला पंचारतीनं ओवाळावं - पाषाणभेद (दगडफोड्या)
काव्यरस

" भारतीय मी, या देशाचा बाळगतो अभिमान ! "

लेखक विदेश यांनी गुरुवार, 26/01/2012 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वधर्मसमभाव सुखाने रमतो येथे माणुसकीला जपण्या जो तो बघतो येथे अतिथी आदर सन्मानाने घडतो येथे भारतीय मी, या देशाचा बाळगतो अभिमान ! |१| प्रतिकूल निसर्गातही चढाई शत्रूवरती जवान जखमी होउन लढतो सीमेवरती बलिदानाचा गर्व सांडतो भूमीवरती येथ जन्मलो, येथ वाढलो, बाळगतो अभिमान ! |२| सणवारांचे महत्व जपणे आहे एकीसाठी लहान मोठा भेद विसरणे जाणिव नित्यासाठी वैरभाव मतभेद विसरणे घडता भेटीगाठी संस्कारांचे वैभव अमुचे, बाळगतो अभिमान !

शरपंजरी

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 25/01/2012 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
ओढाळ स्मिताची रेष रेशमी फुलली रचना हुरहुरली; काहुर गुंता; दृष्ट जाहली ओली रज्जूंस पावली ऊर्जा मेघांमधली दाटून श्वासभर अक्षत अंकित झाली हे दूर-देखणे स्वर होते यक्षांचे पारणे लाभले; फिटले; ज्वर अक्षांचे राहिल्या मागुती गंधखुणा झुळुकेच्या पापणीबंद सार्‍याच छ्टा प्रतिमेच्या मग वाट पहाणे आठवणे गत उरले नुरले भवताल; लयींवर; भुलले अंबर-झूले एकांत झुरे भेटीसाठी लक्षण हे नच भवभोळे पंजरी शरांच्या; भीष्म; स्मृती हळवेले .........................अज्ञात
काव्यरस

प्रचंड गारठा

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी सोमवार, 23/01/2012 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
------ भाग १: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! बर्फ़च घेऊन जणु बाहेर वाहतोय सुसाट वारा ! सूर्यकिरणांनी चकाकतोय दवबिंदू... की पारा? निसर्गाने उघडलाय बघ! सौंदर्याचा गाभारा.... माझ्या हातात तुझा हात उबदार जरा... तुझ्यासवे चालत चालत सरावा जन्म सारा.... प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! तुझ्यासह घालवलेला क्षण क्षण न्यारा....! ------ भाग २: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! झोपावे जरा, अजून कामाचा शीण नाही गेला सारा.... पहाटे पहाटे पेपरवाल्याने बेल वाजवली कराकरा.. सकाळी सकाळी "ही" का आवरतेय आज घरातला पसारा? आज रविवार!

रेखीव

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 23/01/2012 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
घडे काय हे; ना कळे योजना ही उभा ज्येष्ठ रावा; कुणी हाक मारी मिळे कोपर्‍याला नव्याने उभारी उधाणून ऊर्मी उमलली दुपारी गाभ्या तळाशी किती रत्नराशी लयधुंद वलये तरीही उराशी अंगी दुरावा कसा हा म्हणावा रेखे कुणी पापणी-आत नक्षी स्मिताची कळी अंगणी अंग जाळी नयनी खुळी ओढ नवती निराळी अव्हेरू कसे आवरू वा कसे गुंतला व्याध पाशात भुलला अवेळी .....................अज्ञात
काव्यरस

जागेपणी मिटून जायचे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 23/01/2012 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांच्या बाजारात मी काही शोधीत बसायचो तिच्यावर प्रेम करण्यासाठी काही शब्द शोधीत असायचो मला हवे ते शब्द मिळत नव्हते काय करावे कळत नव्हते..?
काव्यरस

काय सैपाक काय करू मी बाई

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 23/01/2012 06:13 या दिवशी प्रकाशित केले.
काय सैपाक काय करू मी बाई घरधनी उठलं सकाळी रामपारी उसतोडीची आमी केली तैयारी न्यारी डब्यासाठी आंग खंगाळूनी चुल पेटवली पाचट काड्या पेटवूनी हाताशी पोळपाट परात घेवूनी जाळ केला चुलीवर तवाठेवूनी धुर डोळ्यात जाई फुकनीनं फुकूनी पाण्याचा तांब्या शेजारी ठेवूनी भाईर धन्यानं गाडी केली बैलं जुपूनी ठेवला विळा कोयता दोर कळशीत पाणी "घाई कर" म्हनं पोराला उठवूनी रडत उठलं पोरं...रट्टा दिला ठिवूनी सारी तयारी झाली झालं त्यांचं आवरूनी चला उठा निघायचं हाळी आली शेजारूनी पिठाचा डबा घेई हाती करूनी घाई पाहते तर डब्यामधी बाजरीचं पिठच नाही ऐन वक्ताला काय करावं सुधरंना ब

नको रे कान्हा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 23/01/2012 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
नको रे कान्हा नको रे कान्हा आडबाजूला भेटूनी नको लगट दावू उगीचच खेटूनी || नार मी भोळी साधी सरळ हरणी रस्त्याने जाई येई सलज्ज तरणी सख्यांसवे मथूरा बाजारी निघाले अडवूनी दुध दही नको घेवू लुटूनी || गोरी माझी काया तू रे सावळा मनात दुजे काही चेहेरा भोळा नको छेडाछेडी दिसे मग सार्‍यांना ओढताच वस्त्र अंगाचे गेले सुटूनी || श्रीहरी मनमोहन कृष्णा रे मुकूंदा केशव मुरलीधर माधवा गोविंदा अनंत नावे तुझी येती माझ्या मुखी विनवीते गौळण पाया तुझ्या पडूनी || तुझ्याविण दुजे माझे आहे सांग कोण तुझ्याविण जग सारे होई वैराण यमुनेच्या वाळवंटी जीवन मज सापडले तुझ्यासवे

मी हुच्चभ्रू

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 22/01/2012 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
विकी वरची माहिती भाषांतरित करून मेगाबायटी प्रतिसाद देणार मीही हुच्चभ्रू होणार ||१|| धागे हायजॅक करून गोंधळ मी घालणार मीही हुच्चभ्रू होणार ||२|| राजकीय-धार्मिक मुद्यांनाच हात मी लावणार मीही हुच्चभ्रू होणार ||३|| ललित लेखनाला फाट्यावर मारणार मीही हुच्चभ्रू होणार ||४|| इतर धाग्यांना तुच्छ मी मानणार मीही हुच्चभ्रू होणार ||५|| मराठी संस्थळावर इंग्रजी प्रतिसाद मी देणार मीही हुच्चभ्रू होणार ||६|| संस्थळांवर लॉगिन न करता वाचनमात्र मी राहणार मीही हुच्चभ्रू होणार ||७||
काव्यरस