कविता
....पुन्हा!!
सांज साजरी
सखी लाजरी,
आठव बोचरी
रुतली पुन्हा...
पेटलेले रान
उन्हाला तहान
सुन्न वहीचे पान,
मिटले पुन्हा...
दमलेला श्वास
श्रमलेली आस,
अवघडले त्रास
दुर्मुखले पुन्हा...
तू असण्याचे भास
मनाचे खोटे कयास,
निराशेने खास
गाठले पुन्हा...
आशेनेच फसवणे
जगासवे हेलकावणे,
मिळवून गमावणे
घडले पुन्हा...
शुभ्र तेवती वात
काळावरही मात,
एक नवी सुरुवात
भरारले.... पुन्हा!!
-बागेश्री
मैफिल नववर्षाची
आसमंती हा बहर बसंती
सरे पानगळ शिशिराची
कोकील कंठी सुरु होतसे
मैफिल ही नव वर्षाची
नवे सूर अन् नवे तराणे
नव्या दिशा, उन्मेष नवा
नवीन स्वप्ने, नवी भरारी
नवी दृष्टी अन् जोश नवा
नवसूर्याचे तेज लेऊनी
सृष्टी गाई गीत नवे
उधळण होता सप्तसुरांची
इंद्रधनुवर रंग नवे
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !!
मालवणी गजाली बरो...
(मी कोकणातला असल्यामुळे एक मालवणी कविता)
असोच लोका उगाच देतत माका भाव
म्हणूण झालो माझा गावात नाव.
नाचु लागलो मनात मोर,
लोका म्हणती कवठा चोर,
म्हटला झाला अस माझा नाव,
मांडुन बघाया राजकारणी डाव.
मित्रान सांगितल्यानी, जाऊन तुझ्या बापाशिक विचार,
निवडणु़क लढवुचा असय, पैसो दे म्हणाव.
बापाशिक जाऊन विचाल्यानी,
पैसो देउक नाय, पण माझा मुस्काट फोडल्यानी.
आवशीच्या घोवान कधी निवडणुक लढवल्यानी,
गाववाल्यानी तुझो मामा केल्यानी.
पैसो कमवुची अक्कल नसा तुका,
शिक्षो म्हणुन कोंबडो केलो बापान माका.
जसा काय चांगल्या जेवणात मीठ जास्त पडता.
तसो मराठी माणुस आपल्याच माणसाचो पाय खेचता.
बापाशीच्या मारान घे
दर्द - ऐ - दात
मी आताशा ठरवुनच टाकलंय,
पुढचं प्रेम या डॉक्टरवरच करायचं.
सगळे दात काढले तिनं,
तरी तिच्यावरच मरायचं.
मी आताशा ठरवुनच टाकलंय...
एक दिवस काय झालं,
बासुंदी पिता पिता हाटेलात
पुढचा एक दात कर्रकन हलला
मला वाटलं त्याचा बेरिंगच निसटला
घरी येता येता दवाखान्यांत गेलो
तिथली रांग पाहुन मनोमन सुखावलो
बाहेर एक बाउन्सर बहुधा कंपाउंडर असावा
आत नाही जमलं की इथंच उपटत असावा.
शेवटी माझा नंबर आला, हळुच आत गेलो
बेसिनमधले गोरे हात पाहुनच गार झालो
या हातानी एक काय चार दात काढा
जमलं तर भरुन द्या मागच्या दोन दाढा
'येस,प्लिज, य, खुर्चीवर बसा,' आवाज बरा नव्हता,
काळी तिन पांढरी दोनच्या मध्ये अडकला होता
काय झालंय ते
काव्यरस
प्रतिशोध
काय कायदा काय वायदा कसले पोलिस ठाणे
ओलिस आहे मुके रांगणे गुंडच इथे शहाणे
डोंबाच्या हाती सत्तेचे उजवे चलनी नाणे
डावे पाठी री ओढे गुणगुणे पोरके अन गाणे
सारे गनिमी व्याध; अमीषे त्यांची मिठास वाणी
माया भरते दारी त्यांच्या अथक कृपेचे पाणी
कळसावर लखलखते सोने वार सोसते कोणी
आटपाटची नगरी ही तर; ताक चोरते लोणी
सांग विठू तू बद्ध करांनी का अजुनी रे मौनी
पायाखालिल वीट क्रयास्तव कलली पाहुन चैनी
रेत जाळते पाणी रानी चौखुर आणीबाणी
आक्रंदे प्रतिशोध; संयमी जनता केविलवाणी
..............................अज्ञात
काव्यरस
(रे मना ..)
मुळ गझल : http://www.misalpav.com/node/21076 - सांजसंध्या
त्यावरुन पॉझिटीव्ह कविता :
रे मना नभ पुन्हा उजळून आले
शब्द भावनांची माळ माळून आले.
आस रात्रीस, ह्या चांदण्या नभाची
मेघ तेंव्हा मिठीत न्हावून आले
हे श्वास होते भारलेले कधीचे
क्षण तुझ्यासवे आज दरवळून आले
देहात रुजलेली जाणीव मिलनाची
तव स्वप्न मनी आज फुलून आले
जीवनाचे डाव कित्येक खेळले मी
तुझेच प्रितवार आज झेलून आले.
--- शब्दमेघ
काव्यरस
बळी राजाच देण ह्याजन्मि तरी फीटणार नाही.
(मराठवाडा, कोकण व इतर जागीही शेतकरी जीव देत आहेत. म्हणुन ही कविता.)
आक्री त अस घडल, शेत करपुन गेल
सावकारी कर्ज, डोंगरा एव्हढ झाल.
वाट अशी खडतर, देव झाला गायब
देव भेटला तरी , राक्षस सरकारी साहेब.
पेरण्या आणल बी, सरकारवानी बोगस होत.
सरकारतरी कस, मा़झ नशिब फुटक होत.
विहिरीने घात केला , पाण्याने एकदम तळ गाठला.
त्रासामुळे मग संसारही भार वाटला.
पाणी आणायच कस? चिंतेत मन विटल
जीव संपवायच वादळ, डोक्यात पुन्हा उठल.
जीव दिला तरी , उत्तर मिळणार नाही.
बळी राजाच देण ह्याजन्मि तरी फीटणार नाही.
बळी राजाच देण ह्याजन्मी तरी फीटणार नाही.
काव्यरस
असाध्य स्वार्थ...!
वेदनांचे सण साजरे करण्याची
ना हिम्मत होती,
ना ऐपत..!
त्यांना पापण्यांमागे साठवून
अश्रु गाळण्याइतकी,
श्रीमंती कधी नव्हतीच!
उलट
त्यांची धार
बोथट करण्यासाठी
प्रसंगी काळाशीही
निग्रही स्पर्धा....!
सुखाशी जितकी सलगी,
तितकीच वेदनांशी फारकत!
तसं नुकसान फारंसं नाही
मात्र,
'वेदनेतले कंगोरे आज जपले,
तर उद्या काव्यही बहरेल'
हा स्वार्थ साधायचा राहूनच गेला!
-बागेश्री
उंच माझा झोका ..
झी मराठीवर सध्या चालू असलेल्या उंच माझा झोका ह्या मालीकेचे शीर्षकगीत मी लिहीले आहे.
चांदणचाहूल होती.. कोवळ्या पावली
माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली
खेळण्याचे होते वय.. अंगणाची होती सय
सोवळ्या मनात माझ्या ..भरे नभाचा आशय
थबकले उंबऱ्यात मी ..पाहुनी नवी पहाट
जणू जन्मले नव्याने ..भरता हा मळवट
हाती अमृताचा वसा , साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यात..
मिसळपाव