(रे मना ..)

गणेशा जे न देखे रवी...
मुळ गझल : http://www.misalpav.com/node/21076 - सांजसंध्या त्यावरुन पॉझिटीव्ह कविता : रे मना नभ पुन्हा उजळून आले शब्द भावनांची माळ माळून आले. आस रात्रीस, ह्या चांदण्या नभाची मेघ तेंव्हा मिठीत न्हावून आले हे श्वास होते भारलेले कधीचे क्षण तुझ्यासवे आज दरवळून आले देहात रुजलेली जाणीव मिलनाची तव स्वप्न मनी आज फुलून आले जीवनाचे डाव कित्येक खेळले मी तुझेच प्रितवार आज झेलून आले. --- शब्दमेघ
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

8 टिप्पण्या 1,569 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

पैसा नवीन

स्वतंत्र कविता म्हणून आवडली. पण संध्याने वापरलेलं वृत्त मुद्दाम वापरलंस नाही की काय कारण?

धन्या नवीन

ते वृत्तामधलं आपल्याला फारसं कळत नाही. "भुजंगप्रयाती य ये चार वेळा" हे रटण्याइतकाच आपला आणि वृतांचा संबंध. काव्य झकास आहे. सांजसंध्येच्या कातरवेळच्या निराशावादी भावनेला आपण दिलेलं सुंदर सकारात्मक उत्तर आवडलं.

प्रचेतस नवीन

रे गणा फोटो पुन्हा दिसून आले येताना पिकासाची कास धरून आले आस होती रे तुला किती बघण्याची फोटो तेव्हा फ्लिकर सोडून आले. ते क्षण होते कधीही नच दिसण्याचे आज पाहूनी डोळे पाणावून आले नयनांत रूजलेली जाणीव फोटो दिसण्याची आज दिसूनी अपुरे स्वप्न पुर्ण जाहले कितीदा तरसलो मी पाहण्यास ते आज परी जालावर प्रकट जाहले.

चौकटराजा नवीन

शब्द मेघ वर्षावला आणि मी भिजूनीच गेलो काव्य भूमी ओलावली आणि मी रूजूनीच गेलो चौकट राजाकडे नाही शब्द कळा. नाही प्रतिभा. पण कौतिक मात्र जरूर आहे. अतः दोन ओळी आपल्या कवतिका खातर !