चंद्र-कळा
चंद्र फुलांचे हार गळा
रात्र सजविशी अंग-कळा || धृ. ||
धुंद धुंद मन, बहर-बंध तन
स्पर्श रेशमी, घुसमटतो घन
छेड काढता, लटक्या रागे
म्हणसी मजला 'कृष्ण-काळा'! || १ ||
देह उमलले, मिठीत रमले
श्वास केतकी, गुंफून पडले
रात्री मधुनी, कळीकाळाच्या
रंगला हा रास खुळा || २ ||
एकतनूता, एकतानता,
द्वैत मिटले, दोघांकरता
आसक्तीच्या मैफिलीत ह्या
जीव भोगे ब्रह्म-कळा || ३ ||
-पूर्वप्रकाशित
मिसळपाव